व्हाटसअप स्टेटस व्हीडीयो डाउनलोड कसा करायचा आज आपण या लेखामधे पाहणार आहोत.
व्हाटसअप स्टेटस चा व्हिडीयो किवा स्टेटस वर असलेला फोटो किंवा इमेज कशी डाउनलोड करायची हे पण बघणार आहेत.
सर्वप्रथम व्हाटसअँप मधे जा किंवा तूमच्या मोबाईल वर व्हाट्सअँप उघडा.
त्यानंतर ज्याकुणाचे स्टेटस विडिओ किंवा फोटो डाऊनलोड करायची आहे त्याच्या स्टेरस वरती जा. जर स्टेटस व्हीडियो असेल तर तो व्हीडियो पूर्ण बघा.
कारण व्हीडियो पूर्ण बघीतल्या शिवाय तो तुमच्या मोबाईल मधे सेव्ह होणार नाही तो व्हिडिओ बघुन झाल्यानंतर व्हाट्सअँप बंद करा.
तुमच्या मोबाईल चे फाईल मॅनेजर उघडा फाईल मॅनेजेर उघडल्यानंतर फाइल मॅनेजर सेटिंग मध्ये किंवा वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा.
वरच्या साईटला जे तीन डॉट दिसतायत त्यावर क्लिक केल्यानंतर सेटिंग ओपन होईल त्यामध्ये जाऊन ‘Show hidden files’ हा पर्याय दिसेल त्यानंतर तो पर्याय इनेबल करा.
जर आधी पासुन इनेबल असेल तर उत्तम नसेल इनेबल करा किंवा चालू करा. त्यानंतर मोबाइल च्या इंटर्नल मेमरी मधे जाऊन ‘.Statuses ‘ नावाचा फोल्डर शोधा.
त्यामधे तुम्ही पाहिलेले स्टेटस व्हीडीयो आणि फोटो आपोआप सेव्ह होतात ते तुम्हाला दिसतील. संदर्भासाठी खाली दिलेला फोटो बघा.
जर तुम्हाला ‘.Statuses’ लिहलेला फोल्डर सापडला नाही तर इंटर्नल मेमरी मध्ये जा आणि सर्च बार वरती सर्च बटनामध्ये ‘statuses’ असे सर्च करा.
त्यानंतर तुम्हाला ‘.Statuses’ चा फोल्डर दिसेल त्या फोल्डर मध्ये चेक करा.
तुमच्या मोबाइल मधे एका पेक्षा जास्त फोल्डर असु शकतात अशा वेळेस सर्व फोल्डर चेक करा. कुठल्या ना कुठल्या फोल्डर मध्ये स्टेटस नक्की सेव्ह होत असतात.
त्यामुळे व्हाटस अप स्टेटस विडिओ डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला कुठेही न जाता फक्त विडिओ पाहुन सेव्ह करु शकता.
जर हे व्हिडीयो सेव्ह करताना काही अडचण येत असेल किंवा सेव्ह होत नसेल तर खाली कमेंट करा आम्ही नक्की उत्तर देऊ.
हे पण वाचा –
सातबारा उतारा शोधा | 7 12 कसा शोधायचा