आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे | How to Download Aadhar Card in Marathi

आजच्या लेखात आपण आधार कार्ड हे भारत सरकारने सर्व भारतीय नागरिकांना जारी केलेले एक ओळखपत्र आहे. हे डाऊनलोड कसे करायचे हे आपण पाहणार आहोत बऱ्याच वेळेला काय होते की आपण आधार कार्ड तर बनवतो पण आपण डाऊनलोड करायला विसरून जातो त्याचा तोटा असो होतो की आपण एखादे ऑनलाईन काम करत असताना त्याची गरज भासल्यास आपल्या कडे  ते उपलब्द नसते म्हणून आम्ही इथे आज सांगणार आहोत आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केलेल्या कार्डवर 12-अंकी क्रमांक छापला जातो. इंडिया पोस्टला प्राप्त झालेले आणि UIDAI वेबसाइटवरून डाउनलोड केलेले ई-आधार तितकेच वैध आणि ग्राह्य धरले जाते. ई-आधार कार्ड हे तुमच्या कडे असलेल्या आधार कार्डचे फोटोकॉपी किंवा आभासी स्वरूप आहे.जे तुमचा मोबाईल मध्ये राहू शकते. कोणत्याही कामासाठी तुम्ही हे आधार कार्डऐवजी ते वापरू शकता.यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, आधार कार्ड, छायाचित्र आणि बायोमेट्रिक डेटा यासारखी सर्व आवश्यक माहिती देखील समाविष्ट आहे. आम्ही तुम्हाला आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्याचा सर्वात सोपा मार्ग सांगणार आहोत.

आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे | How to Download Aadhar Card in Marathi

 

  • आधार कार्ड ऑनलाइन कसे डाउनलोड करावे

1. आधारच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ती उघडावी {ती वेबसाईट पुढे दिली आहे}  https://uidai.gov.in/.

2. My Aadhaar मेनू वर क्लिक करून  Download Aadhaar पर्यायावर क्लिक करा.

3. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही थेट या लिंकवर जाऊ शकता- https://eaadhaar.uidai.gov.in/

4. क्लिक केल्या नंतर येथे तुम्हाला तीन पर्याय दिसु लागतील – आधार, नावनोंदणी आयडी आणि व्हर्च्युअल आयडी

5. आपल्या कडे आधार कार्ड क्रमांक उपलब्द असल्यास, आधार पर्याय निवडा.

6. आता तुम्ही तेथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा.

7. पडताळणी साठी कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ओटीपी पाठवा बटनावर क्लिक करा.

8. आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP क्रमांक पाठवला जाईल. हा OTP टाका.

9. आता Verify आणि Download बटनावर क्लिक करा.

10. अशा प्रकारे आधार कार्ड तुमच्या डिव्हाइसवर आधार कार्ड डाउनलोड होईल.

लक्षात ठेवा आधार कार्डच्या डाउनलोड केलेल्या फाईलचा पासवर्ड आठ अक्षरांचा असेल. तुम्हाला आधार कार्डमध्ये दिलेल्या नावाची पहिली ४ अक्षरे आणि नंतर जन्म वर्ष लिहावे लागेल. तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा नावनोंदणी क्रमांक आठवत नसला तरीही तुम्ही तुमचे नाव आणि जन्मतारीख टाकून ई-आधार ऑनलाइन डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक UIDAI वेबसाइटवरून जनरेट करावा लागेल.

 

  • नाव आणि जन्मतारीख असलेले आधार कार्ड कसे डाउनलोड करावे

1. आपल्या आधार क्रमांक परत मिळवण्यासाठी https://resident.uidai.gov.in/ ही वेबसाईट उघडा

2. तुमचे पूर्ण नाव आणि नोंदणीकृत ई-मेल आयडी किंवा मोबाइल नंबर आणि पासवर्ड त्या ठिकाणी टाका.

3. आता तुम्ही एक वेळ “पासवर्ड पाठवा” बटणावर क्लिक करा

4. आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP नंबर पटवला जाईल तो नंबर त्या ठिकाणी एंटर करा आणि “Verify OTP” बटणावर क्लिक करा

5. तुम्हाला तुमचा स्क्रीनवर एक संदेश दिसु लागेल की आपला आधार नंबर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर वर पाठवला आहे.

6. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमचा आधार नोंदणी क्रमांक मिळाला की, UIDAI वेबसाइट वर जाऊन ई-आधार पेजवर जा.

7. “माझ्याकडे नावनोंदणी आयडी पर्याय आहे” वर क्लिक करा.

8. आधार नोंदणी क्रमांक, पूर्ण नाव, पिन कोड, उपलब्द असलेला कॅप्चा प्रतिमा प्रविष्ट करा

9. “वन टाइम पासवर्ड” या बटनावर वर क्लिक करा

10. तुम्हाला OTP नंबर मिळेल तो एंटर करा आणि आधार डाउनलोड करण्यासाठी ‘आधार डाउनलोड करा’ पर्याय निवडा

11.आशा प्रकारे तुमचे आधार कार्ड डाऊनलोड होईल.

 

हे पण वाचा –

 

Leave a Comment