प्रथमोपचार म्हणजे काय | Prathamopchar Mhanaje Kay

प्रथमोपचार म्हणजे काय
प्रथमोपचार म्हणजे काय | Prathamopchar Mhanaje Kay

मित्रांनो आज आपण या लेखात प्रथमोपचार म्हणजे काय व तो कसा करायचा हे पाहणार आहोत.प्रथमोपचार म्हणजे ते काय आपण पाहू रुग्णालयात जायच्या आधी केलेला घरगुती उपाय म्हणजे प्रथमोपचार.किंवा एखाद्या व्याधीवर वैद्योपचार करण्यापूर्वीची पायरी म्हणजे प्रथमोपचार होय.यासाठी प्रथमोपचार पेटीची आवश्यकता असते.

लक्षणे त्यानुसार करावयाचे उपचार

1) रक्तस्राव व जखमा :
अचानक अपघात किंवा इतर कारणामुळे रक्तस्राव होत असल्यास प्रथम तो थांबवायचा असतो रक्तस्राव छोटा असो वा मोठा तो थांबवायचा असतो.जेणेकरुन जास्त रक्तस्राव होऊ नये व अपघातग्रस्तला जास्त धोका वाढू नये पुष्कळ जखमांमधील रक्तस्राव जखमेवर बँडेज घट्ट बांधून थांबवता येतो परंतु बँडेज उपलब्ध नसल्यास स्वच्छ हातरुमाल, टॉवेल किंवा कोणताही कपडा वापरावयास हरकत नाही.परंतु लक्षात ठेवा तो कापडा एकदम स्वच्छ हवा अशा कपड्याच्या आतील घडीचा भाग किंवा अस्पर्शित भाग जखमेवर ठेवावा.काही लोक जखमेवर कापूस लावून नंतर कापड बांधतात पण हे चुकीचे कापूस हा प्रत्यक्ष जखमेवर ठेवू नये कारण त्याचे धागे जखमेच्या पृष्ठभागास चिकटून बसतात.एवढे करून रक्तस्राव तरी अपघातग्रस्तला दवाखान्यात लवकर नेणे आवश्यक असते.

2) चक्कर येणे उपचार :
मेंदूला होणार्‍या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास चक्कर येणे, भोवळ येणे किंवा जास्त वेळ उन्हांत फिरल्याने ही चकर येऊ शकते. डीहायड्रेशनच्या त्रासामुळे चक्कर येऊ शकते. अशाप्रकारचा त्रास होतो. चक्कर येण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. पण अशावेळेस काही उपचार तात्काळ मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या आसपास कोणाला चक्कर आल्यास घाबरून न जाता त्यांना ही मदत नक्की करा.चक्कर आलेल्या रुग्णाला पाठीवर, सरळ झोपवा. आणि त्याचे पाय थोडे वर उचला यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारायला मदत होईल.मात्र चक्कर आलेल्या व्यक्ती भोवती खूप गर्दी करू नये. हवा पुरेशी खेळती राहील याची काळजी घ्या.
चक्कर आलेल्या व्यक्तीचे कपडे खूप घट्ट असतील तर ते थोडे मोकळे करा. बेल्ट, कॉलर, बटणं, जॅकेट थोडे सैल करा.
रुग्णाशी मोठ्याने बोलून, त्याच्या चेहर्‍यावर हलकेसे मारत त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करा. रुग्णाचे ठोके, श्वासाची गती यावर लक्ष द्या. त्याला श्वास घेताना काही त्रास होतोय का ? अशा वेळेस रुग्णाला शुद्ध आल्यानंतर पाणी, लिंबूपाणी, फळांचा रस किंवा साखर-मीठाचे पाणी, द्या.

3) श्वासोच्छ्वास बंद असेल तर उपचार :
श्वासोच्छ्वास बंद असेल तर त्वरित उताणे करा. रुग्णाच्या तोंडात काही नाही हे पहा.तोंडाने श्वासोच्छ्वास द्या दोन्ही हातांनी छातीवर दोन्ही हातानी जोरदार दाब द्यायला सुरुवात करा एका – मिनिटात किमान 30 वेळा परत तोंडाने 2 श्वासोच्छ्वास द्या हा क्रम वैद्यकीय मदत मिळे पर्यंत सुरू ठेवा.लक्षात ठेवा कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि छातीवरचा दाब याद्वारे मानवी शरीर कितीही काळ जिवंत ठेवता येते. कारण मानवी ह्रदयाला रक्तप्रवाह सुरू राहील आणि त्यातून मेंदूपर्यंत रक्त पोहोचत राहील. यामुळे जीवनासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे अवयव जिवंत राहून प्राण वाचण्याची शक्यता तयार होते.

4) भाजणे :
जर एखाद्या व्यक्तीला भाजले असेल तर ताबडतोब त्या व्यक्तीच्या. भाजलेल्या भागावर खूप जास्त प्रमाणात थंड व स्वच्छ पाणी ओतावे म्हणजे भाजण्याची प्रक्रिया थांबेल व तो भाग थंड राहील. भाजलेल्या ठिकाणी काही चिकटले असेल तर ते काढू नये. वेदना शांत करणारे औषध वापरावे व तो भाग बँडेज किंवा स्वच्छ कापडाने बांधून त्वरित डॉक्टरांना दाखवावा.

5) बुडणे :
जर एखादी व्यक्ती बुडत असेल तर त्वरित त्या व्यक्तीला पाण्याबाहेर काढा. त्या व्यक्तीच्या तोंडात किंवा चेहर्‍यावर चिखल असेल तर चेहरा व तोंड जवळ असलेल्या कापडाने पुसून काढा. त्या व्यक्तीला खाली झोपवा, त्याचे पोट दाबा. त्यानंतर त्या व्यक्तीला उलटे वळवा व पोटाच्या मागच्या भागावर दाब द्या, म्हणजे पाणी शरीराबाहेर फेकले जाईल. अपघातग्रस्त व्यक्ती बेशुद्ध असेल श्वास घेत असेल तर त्या व्यक्तीला पाठीवर झोपवा व तिचे डोके थोडेसे एका बाजूला वळवा. त्या व्यक्तीच्या नाकपुड्या बंद करून त्याच्या तोंडात जोराने फुंकरीने हवा सोडा. खूप जोरात फुंकर मारा म्हणजे त्या व्यक्तीची छाती वर-खाली हलू लागेल. तीनपर्यंत आकडे मोजा आणि पुन्हा फुंकर मारा. ती व्यक्ती नीट श्वास घेऊ लागेपर्यंत हे चालू ठेवा अशा प्रथमोपचारानंतर त्या व्यक्तीला तातडीने दवाखान्यात जावा.

6) विजेचा शॉक :
एकाद्या व्यक्तीला विजेचा शॉक बसला असेल तर प्रथम वेळ न घालवता, त्या व्यक्तीला स्पर्श करण्यापूर्वी ताबडतोब वीजपुरवठा करणारा मेन स्विच बंद करावा.मेन स्विच जवळ नसेल तर त्या व्यक्तीला एका लाकडाच्या सहाय्याने विजेचा आणि या व्यक्तीचा संपर्क तोडावा जर त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल तर किंवा ती बेशुद्ध पडली तर त्या व्यक्तीला प्रथम नजीकच्या हॉस्पिटलात न्यावे.

प्रथमोपचार पेटीत काय काय असायलाच हवे साहित्य :

1. प्रथमोपचार माहिती पुस्तिका प्रथमोपचार कसे करावे अणि पेटीतील साहित्य कसे वापरावे याची माहिती असणारी पुस्तिका असायलाच हवी जेणे करून प्रथमोपचार सहज करता येईल.

2. चिकटपट्ट्या

3. स्वच्छ कापूस

4. जखमेवर बांधावयाची जाळीची पट्टी

5. छोटी कात्री.

6. रबरी हातमोजे

7. छोटा चिमटा

8. डेटॉल / सॅव्हलॉन

9. साबण

10. थर्मामीटर

11. मलम : मूव्ह, बरनॉल, आयोडेक्स,

12. स्वच्छ कपडाचे तुकडे

13. वेगवेगळ्या प्रकारचे क्रेप बॅन्डेज

14. पॅरासिटॅमॉल

Leave a Comment