Money Saving Tips In Marathi | पैसे कसे साठवावे यासाठी काही टिप्स

पैसे कसे साठवावे यासाठी काही टिप्स | Money Saving Tips In Marathi

Money Saving Tips In Marathi देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भले आपले नियंत्रण नसो, परंतु आपण आपली सॅलरी, उत्पन्न आणि पैशांना नक्कीच कंट्रोल करू शकतो. आपल्यातील बरेचसे लोक जे पैसे तर खूप कमवतात परंतु सेविंग करू शकत नाहीत, पाहायला गेलो तर खर्च करणे स्वाभाविक असते परंतु सेविंगचा थोडासा अभ्यास असणे आवश्यक आहे. तर इथे प्रश्न येतो की money saving Kashi karavi, अशी कोणती पद्धत आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे पैसे सेव करू शकता, तुम्हाला यासाठी कोणत्या फायनान्शिअल ॲडव्हायझर ची गरज लागेल का? Money saving tips in Marathi हे आर्टिकल वाचून तुम्ही नक्कीच तुमचे पैसे सेव करू शकता. चला तर मग पाहूया…Money Saving Kashi Karavi 

जर तुम्ही देखील त्या लोकांमधले असाल जे पैसे वाचवू शकत नाहीत, सेविंग करू शकत नाहीत, किंवा भविष्यासाठी कोणतीही सेविंग केलेली नाही, तर तुम्हाला या गोष्टीचा विचार करायची आवश्यकता आहे, कारण सेविंग केल्याशिवाय किंवा फायनान्शिअल प्लॅनिंग शिवाय भविष्यात येणाऱ्या गरजांना सामोरे जाणे तुमच्यासाठी सोपे नसेल.

तर हे आर्टिकल यासंबंधीतच आहे जे तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरू शकते, कारण यामध्ये आम्ही तुम्हाला money saving ची पद्धत सांगणार आहोत. भले तुमची कमाई जास्त नसेल, परंतु जर तुम्ही या सांगितलेल्या money saving tips अमलात आणल्या तर निश्चितच तुम्ही पैसे सेव करू शकाल, चला तर मग याबद्दल विस्तारित माहिती जाणून घेऊ.

Money Saving Kashi karavi । How To Save Money In Marathi । पैसे कसे साठवावे 

आजच्या आधुनिक काळामध्ये पैशाचे महत्व खूप जास्त वाढलेले आहे, आपल्या प्रत्येक छोट्या गरजांसाठी आपल्याला पैशांची गरज असते, लोकं पैसे कमावण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत आणि वेगवेगळ्या  प्रकारे आपल्या उत्पन्नाला वाढवायचा प्रयत्न करत आहेत. तर अशा स्पर्धेच्या कलियुगात  जर आपण आपल्या मेहनतीने कमावलेले पैसे मॅनेज करू शकत नसाल किंवा आपली कोणतीही फायनान्शिअल प्लॅनिंग (Financial Planning Tips In Marathi )  नसेल तर या गोष्टी आपल्या भविष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम्स चे कारण बनू शकतात.

तर भविष्यामध्ये अशा परिस्थितीपासून वाचण्यासाठी तुम्हाला आज आणि आत्तापासूनच पैसे Save करण्याचा अभ्यास करावा लागेल, खाली तुम्हाला money saving च्या काही महत्त्वपूर्ण पद्धती सांगितलेल्या आहेत, ज्यांना तुम्ही आज फॉलो करा, आणि नंतर बघा की काही वेळानंतर तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकाल आणि ही तुमची एक सवय बनून जाईल.

लक्षात ठेवा की पैसे सेव करण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या गरजेच्या गोष्टी देखील दुर्लक्षित कराल, याउलट तुम्ही तुमच्या आवश्यकता असलेल्या गोष्टी मर्यादित ठेवा, जरुरी नसणारे खर्च टाळा, आणि स्वतःमध्ये बचत करण्याची सवय करून घ्या, असे केल्याने तुम्ही आरामात प्रत्येक महिन्याला काही पैसे सेव करू शकता, कारण जाणाऱ्या काळाबरोबर तुमची सेविंग वाढली जाऊ शकेल, चला तर मग monthly salary saving tips in Marathi च्या काही उपयुक्त पद्धती जाणून घेऊ.

Money Saving Tips । महिना अखेर पैसे वाचविण्यासाठी काही टिप्स 

१) आपल्या खर्चाचा हिशोब ठेवा :- Note Down Your Expenses

financial tips in marathi
financial tips in marathi

सर्वप्रथम तुम्हाला तुमचा खर्च ओळखायचा आहे आणि त्याचा हिशोब ठेवायचा आहे, यामुळे तुमचे पैसे नेमके कुठे खर्च होतात हे समजू शकेल, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामध्ये तुमचे पैसे खर्च होतात. ध्यानात असू द्या की प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या खर्चाचा तुम्हाला हिशोब ठेवायचा आहे, कारण कोणताही खर्च सुटायला नको आणि एकदा का हे सर्व खर्च तुम्ही नोंद  केले त्यानंतर त्या खर्चाला वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभाजित करा, जसे की गॅस, भाज्या, राशन, लोन, शॉपिंग, ट्रॅव्हलिंग, एंटरटेनमेंट etc आणि यानंतर सर्वांची टोटल करा.

२) अनावश्यक खर्चावर लगाम लावा :- Avoid Unnecessary Expenses

how to save money in marathi

how to save money in marathiजेव्हा महिन्याच्या खर्चाची लिस्ट तयार होईल त्यानंतर आता वेळ आहे की यामध्ये अनावश्यक खर्च ओळखण्याची आणि त्याच्यावर लगाम लावण्याची. उदाहरणार्थ जसे एखाद्या Application Subscription  किंवा मेंबरशिप आपण घेतो, पण त्याचा उपयोग अजिबात होतं नाही, घरी wifi असले तरीही मोबाईल फोनवर आपण अधिक डेटा चा रिचार्ज करतो, बरोबर प्रत्येक महिन्यात मूवी बघायला जाणे, बाहेरचे जेवण खाणे, यासोबत वीज बिल, ट्रॅव्हलिंग, ऑनलाइन शॉपिंग, इत्यादी.

जर तुमची सेविंग होत नसेल आणि तुमचे पैसे अनावश्यक गोष्टींवर खर्च होत असतील तर अशा प्रकारच्या अनावश्यक खर्चांना ओळखून ते त्वरित बंद करा. आणि महिन्याचे एक बजेट निश्चित करा आणि त्या बजेटच्या आतमध्येच खर्च करण्याचा प्रयत्न करा, जोपर्यंत तुम्हाला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये खर्च करावा लागत नाही.

३) सेविंग करणे सुरू करा :- Start Saving Money 

वर सांगितलेल्या दोन्ही स्टेप्स जेव्हा तुम्ही पूर्ण करता, तर निश्चितपणे तुमचा खर्च कमी होईल, आणि काही पैसे वाचू शकतील, तर अशा परिस्थितीमध्ये दर महिन्याला एक निश्चित राशी तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा करणे सुरू करा आणि शक्य असल्यास ही अमाऊंट दर महिन्याला वाढवत जा.

तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही सेविंग कराल त्यावेळेस पैसे आपोआप वाचायला लागतील, शक्य असल्यास Golden Rule Of Money Saving अनुसार सेविंग करायचा प्रयत्न करा ज्यामध्ये दर महिन्याला तुमच्या एकूण कमाई पैकी 20% तुम्हाला सेविंग करायची आहे, शक्य असल्यास यापेक्षा अधिक सेविंग देखील तुम्ही करू शकता. एकदा का सेविंग करायची तुमची ही सवय झाली, तर त्या फंड मधील तुम्ही पैसे वेगवेगळ्या ठिकाणी इन्वेस्ट करू शकता, ज्यामुळे तुमचे पैसे वाढू शकतील जसे की म्युच्युअल फंड, SIP, PPF, फिक्स डिपॉझिट, etc.

पैसे वाचवण्याचे 10 सोपे मार्ग. :- Top 10 Easy Money Saving Tips In Marathi

start money saving

start money saving

  • तुमची सॅलरी किंवा कमाई मधील  सेविंग चा पैसा वेगळा काढल्यानंतर जे पैसे वाचतील त्यातून घर खर्च भागवण्याचा प्रयत्न करा.
  • EMI वर एकाच वेळी जास्त गोष्टी विकत घेऊन कर्जबाजारी होऊ नका, म्हणजेच आपल्या मासिक EMI ला कमी ठेवा.
  • EMI किंवा ऑनलाइन बिल भरतेवेळी लागणाऱ्या पेनल्टी पासून वाचा, आणि तुमचे बिल वेळेवर भरा.
  • सतत हॉटेलमध्ये जाऊन खाणे किंवा मौज मस्तीचा अधिक खर्च टाळा आणि त्याच्यावर लक्ष ठेवा.
  • आपला व आपल्या परिवाराचा मेडिकल इन्शुरन्स जरूर काढा कारण कोणत्याही वेळी medical emergency मध्ये तुम्हाला याचा फायदा मिळेल.
  • आपले कोणतेही काम करतेवेळी agent लोकांपासून सावध रहा, कारण एजंट किंवा मध्यस्थी करणाऱ्या लोकांसाठी लागणार पैसे तुम्ही वाचवू शकाल.
  • जर तुमचे वीज बिल खूप जास्त येत असेल, तर ही वेळ आहे की तुम्ही आजपासूनच वीज बचत सुरू करा. आपल्यातील बरेच लोक रूम मध्ये नसताना देखील लाईट आणि फॅन चालू ठेवतात, किंवा उन्हाळ्यामध्ये दिवसभर AC चालू असतो, या गोष्टींमुळे विज बिल जास्त येते, यापासून सावध रहा.
  • फिरणे कोणाला आवडत नाही, पण फिरण्यासाठी शक्य असल्यास बजेट हॉटेल निवडा किंवा मग home stay मध्ये राहा त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग साठी Cab ऐवजी लोकल पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा.
  • ऑनलाइन शॉपिंग करून देखील तुम्ही पैसे वाचवू शकता, कारण आजकाल ऑनलाईन खरेदी केल्यानंतर बऱ्याच वेळा तुम्हाला कॅशबॅक मिळतो त्याचबरोबर प्रॉडक्ट प्राईज ची तुलना तुम्ही बऱ्याच वेबसाइट्स through करू शकता, त्याचबरोबर 0% इंटरेस्टवर EMI वर देखील वस्तू खरेदी करू शकता.
  • मनाला भुरळ घालणाऱ्या गोष्टी विकत घेण्यापासून स्वतःला वाचवा, बऱ्याचवेळा गरज नसताना देखील आपण अशा बऱ्याच डील बघतो आणि विकत घेतो, हे बऱ्याच वेळा कपड्यांच्या डील मध्ये दिसून येते, जसे की पाच शर्ट बरोबर एक फ्री जीन्स.
    सिबिल स्कोर कसा चेक करायचा

निष्कर्ष :-

पैसे कसे साठवावे यासाठी काही टिप्स या पूर्ण माहिती नंतर आपण एका निष्कर्षावर येऊन पोहोचतो, की जर तुम्ही पैसे वाचवण्याचा निश्चय केला तर नक्कीच तुम्ही पैसे वाचवू शकता. तुम्हाला  फक्त थोडी प्लॅनिंग ची गरज आहे.

आम्ही आशा करतो की money saving Kashi karavi हे आर्टिकल तुम्हाला नक्की आवडले असेल. top 10 easy way to save money in marathi, financial planning 2023-2024 in marathi, 2023 financial tips in marathi, money saving plan in marathi, Monthly balance sheet in marathi.

धन्यवाद.

8 Financial Tips for Young Adults

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment