नमस्कार मित्रानो लेखामध्ये आपण बँकाचे चेक कसे भरायचे ते आपण पाहणार आहोत आपल्याला बऱ्याच वेळेला बँकेत गेल्यावर लक्षात येते की आपण या आधी कधी चेक मधील माहिती भरली नाही म्हणून आपल्याला थोडेसे घाबरल्या सारखे होते. पण आपण येथील माहिती वाचून कोणत्याही बँकाचा चेक भरू शकता.
तुम्ही चेकद्वारे आपल्या बँक खात्यातून इतर कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो. पण चेक भरताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे जर चुकीचा चेक भरला गेला तर चेक बाउंस होऊन बँक दंड आकारू शकते. त्या मुळे आम्ही येथे चेक कसे भरायचे याची सविस्तर माहिती दिली आहे.
चेकमध्ये भरवायचा आवश्यक गोष्टीं
1. दिनांक / Date – दिनांक चा चौकटीत दिनांक लिहा आणि लक्षात ठेवा या दिनांक पासून पुढे तीन महिने हा चे वैध असेल
2. देयकाचे नाव / Payee Name – तुम्हाला ज्या व्यक्तीला किंवा कंपनीला चेकने पैसे द्यायचे आहेत त्याचे नाव इथे लिहा
3. रक्कम अक्षरामध्ये / Amount in Words – रुपये जिथे लिहले आहे तिथे किती पैसे द्यायचे आहे ते अक्षरामध्ये लिहा.
4. रक्कम अंकात / Amount – चौकटीत किती रक्कम द्यायचे आहे ते अंकात लिहा
5. सही /Signature – या जागेवर तुमची सही करा पण लक्षात ठेवा तुमच्या बँक अकाउंटला जोडली गेलेली सही करा
टीप:- तुम्ही लिहिलेल्या तारखेपासून पुढच्या तीन महिन्यापर्यंत हा चे वैध असतो नंतर तो अवैध होऊन काही कामाचा राहत नाही.