LIC चे पूर्ण रूप काय आहे? । LIC Meaning in Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात मी तुमहाला LIC बद्दल पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तुम्ही LIC बद्दल कुठेना कुठेतरी ऐकले असेलच, ही एक भारतीय जीवन विमा कंपनी आहे, जी सार्वजनिक क्षेत्रात विमा प्रदान करते. पण तुम्हाला त्याचे पूर्ण स्वरूप माहित आहे का, जर तुमचे उत्तर नाही असेल तर आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत, LIC म्हणजे काय? आणि त्याचे पूर्ण रूप काय आहे?

LIC चे पूर्ण रूप काय आहे?

 • L – life
 • I – Insurance
 • C- Corporation

LIC चे पूर्ण रूप – (“Life Insurance Corporation Of India”) म्हणजेच “भारतीय जीवन विमा निगम”. LIC ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे जी प्रामुख्याने गुंतवणूक योजना आणि जीवन विमा उत्पादनांशी संबंधित आहे. एलआयसीचे ब्रीदवाक्य आहे “योगक्षेम वहम्यहम” (Yogakshemam Vahamyaham) ज्याचा अर्थ असा होतो कि – तुमचे कल्याण ही आमची जबाबदारी आहे.

LIC म्हणजे काय? । What is LIC in Marathi

What is LIC in Marathi
What is LIC in Marathi

LIC कंपनी जी भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा जीवन विमा निगम म्हणून ओळखली जाते हि भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आहे आणि ती देशातील सर्वात मोठी गुंतवणूक कंपनी मानली जाते. मित्रांनो इथे एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो कि LIC हि कंपनी पूर्णपणे आपल्या सरकारच्या मालकीची कंपनी आहे.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे भारतातच 10 लाखांपेक्षा अधिक एजंट आहेत आणि क्षेत्रानुसार 700 पेक्षा अधिक कार्यालये आहेत. 100 हुन अधिक विभागीय कार्यालये आहेत. 2 हजाराहून अधिक कंपनीची शाखा कार्यालये वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत आणि इतर प्रकारच्या LIC कार्यालयांची संख्या देखील 1 हजाराहून अधिक आहे. हि भारतातील एक विश्वसनीय कंपनी आहे त्यामुळे आजच्या या वर्षापर्यंत 20 करोड पेक्षा अधिक लोकांनी भारतीय जीवन निगम कडून पोलिसी घेतली आहे.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आपल्या ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे चांगल्या सेवाआणि बर्‍याच सुविधा देखील प्रदान करते. भारतातील लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनला त्याच्या उत्कृष्ट सेवांसाठी भारतातील सर्वोत्कृष्ट विमा कंपनी मानली जाते.

LIC मध्ये तुम्हाला जीवन सुरक्षिततेसाठी जीवन विमा प्रदान केला जातो. सध्या LIC आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या विमा योजना ऑफर करते. ज्या अंतर्गत ग्राहकांना विमा मिळतो, येथे तुम्हाला हप्त्याच्या स्वरूपात हळूहळू पैसे द्यावे लागतील आणि गरज पडल्यास ग्राहकांना त्यांच्या विम्याची रक्कम निर्धारित वेळेत दिली जाते.

LIC ची स्थापना कधी झाली?

LIC ची स्थापना 1956 साली झाली. जेव्हा भारताच्या संसदेने भारतीय आयुर्विमा कायदा संमत केला. या कायद्यांतर्गत सुमारे 245 खाजगी विमा कंपन्याचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि त्यांचे विलीनीकरण करून जीवन विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. LIC चे मुख्यालय हे भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथे आहे.

विम्याचे प्रकार (Types Of Insurance )

विम्याचे अनेक प्रकार आहेत, एलआयसी जे आपल्या ग्राहकांना विमा प्रदान करते, त्यांची यादी खाली दिली आहे.

 • गृह विमा (Home Insurance)
 • अपघात विमा (Personal Insurance)
 • पीक विमा (Crop Insurance)
 • जीवन विमा (Life Insurance)
 • प्रवास विमा (Travel Insurance)
 • वाहन विमा (Vehicle Insurance)
 • वैद्यकीय आणि आरोग्य विमा (Medical & Health Insurance)

भारताच्या जीवन विमा कॉर्पोरेशनचे फायदे

 • भारताच्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये जर जीवन विमा केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या पश्चात पॉलिसीची ठेव रक्कम व बोनस त्या व्यक्तीच्या कुटूंबाला भेटते.
 • भारताच्या जीवन विमा कॉर्पोरेशनमध्ये इतर कंपनीच्या तुलनेत खूप चांगली पॉलिसी बोनस उपलब्ध करून देते.
 • भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन आपल्या देशात एक सुरक्षित योजना म्हणून अनेक वर्ष कार्यरत आहे.
 • भारताच्या जीवन विमा कॉर्पोरेशनमध्ये पॉलिसी मॅच्युरिटी नफ्याची सुविधा देखील आहे.
 • लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अन्य फायदे देखील आहेत जसे कि पोलिसी ला ४० वर्षे किव्हा ८० वर्षे झाली कि पोलिसी धारकाला खूप चांगले बोनस मिळते.
 • एक ठराविक वेळेनंतर तुम्ही तुमच्या पोलिसी च्या आधारवर LIC मधून लोन देखील घेऊ शकता.

एलआयसी सुरक्षित आहे का?

होय, एलआयसी कंपनी पूर्णपणे सुरक्षित आहे. २०२२ च्या इकॉनॉमिक टाइम्स ब्रँड ॲक्टिव्ह सर्वेक्षणानुसार, LIC भारतातील सर्वात विश्वासार्ह सेवा ब्रँडच्या यादीत सहाव्या क्रमांकावर होती.

LIC premium payment ऑनलाईन देता येतो का?

होय, तुम्ही नेट बैंकिंग, UPI, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड च्या मदतीने LIC अधिकृत website वर जाऊन तुमच्या premium चे ऑनलाईन payment करू शकता. तसेच LIC चे प्रत्येक शहरात एक तरी केंद्र तुम्हाला भेटूनच जाईल. त्यामुळे तुम्ही offline देखील LIC केंद्रात जाऊन तुमच्या premium चा हप्ता भरू शकता.

2023 मध्ये गुंतवणूक करण्याची बेस्ट एलआयसी प्लॅन्स

१. एलआईसी जीवन अमर

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ऑगस्ट 2019 मध्ये एलआयसी जीवन अमर पॉलिसीची सुरवात केली होती. ही एक टर्म लाइफ इन्शुरन्स योजना आहे. हि विमाधारकांना कोणत्याही प्रकारचे परतावा किंवा मैच्योरिटी अमाऊंट प्रदान करत नाही. त्याऐवजी, हि पॉलिसी विमाधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबास आवश्यक आर्थिक सहाय्य प्रदान करते. त्यामुळे जर फक्त तुमच्यावर तुमचे संपूर्ण कुटुंब अवलंबून असेल तर तुम्ही हि पोलिसी घेतली पाहिजेत.

२. एलआईसी टेक टर्म प्लान

एलआयसी टेक टर्म प्लॅन पॉलिसी हि एक टर्म लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे जी ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते. कोणत्याही दुर्दैवी किंवा अनपेक्षित घटनेच्या बाबतीत विमाधारकच्या कुटुंबाला संपूर्ण आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात हि पोलिसी कार्य करते. आपण केवळ ऑनलाइन अर्ज प्रक्रियेद्वारे ही टर्म पॉलिसी खरेदी करू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही एजंटची आवश्यकता नाही.

३. एलआईसी न्यू चिल्ड्रन मनी-बैक प्लान

एलआयसी न्यू चिल्ड्रन मनी-बॅक प्लॅन कि एक प्रॉफिट प्रदान करून देणारी एक पोलिसी आहे जी स्टॉक मार्केटशी जोडलेली नाही आहे. हि पोलिसी विशेषत: विवाह, शैक्षणिक आणि जीवन संरक्षणाच्या फायद्यांद्वारे मुलांच्या संगोपनाच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी बनवली गेलेली पॉलिसी आहे. आपण ईसीएसद्वारे किंवा एसएसएस मोडद्वारे दरवर्षी, अर्ध्या -वर्षाच्या, तिमाही किंवा मासिक नियमित प्रीमियम देऊ शकता. जर आपण प्रारंभिक तीन वर्षांसाठी प्रीमियम रक्कम भरली असेल तर पॉलिसीच्या कालावधीत पॉलिसी कोणत्याही वेळी तुम्ही Surrendar करू शकता.

४. एलआईसी जीवन आनंद प्लान

या पॉलिसीबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा मैच्योरिटी नंतर रक्कम दिली जाते आणि पॉलिसीधारक जिवंत असतो तरीही विमा रकमेसह चालू राहतो. ही योजना अशा स्त्रियांसाठी चांगली आहे जी आयुष्यात कधीही त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून दूर जात नाहीत कारण या योजनेच्या मैच्योरिटी नंतर देखील लाभ भेटत राहतो.

५. एलआईसी जीवन उमंग

एलआयसी जीवन उमंग एक सहभागी आणि संपूर्ण जीवन विमा योजना आहे जी बाजारपेठशी जोडलेली नाही. हि पोलिसी आपल्या कुटुंबाचे सुरक्षित भविष्य आणि कमाई सोबत दुहेरी फायदा करून देते. या योजनेत 100 वर्षांचे कव्हर प्रदान केले जाते जे या विमा पॉलिसीचे एक विलक्षण वैशिष्ट्य आहे. पॉलिसीच्या कालावधीच्या शेवटी पॉलिसीधारकास निश्चित विमा रक्कम दिली जाते. जीवन उमंग ही एक सर्वोत्कृष्ट एलआयसी योजनांपैकी एक आहे.

FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

Q. LIC म्हणजे काय?

A. LIC म्हणजे “लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया”. ही भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आणि देशातील सर्वात मोठी गुंतवणूक कंपनी मानली जाते.

Q. LIC पोलिसी आपण ऑनलाईन घेऊ शकतो का?

A. होय, भारतीय आयुर्विमामहामंडळे ऑनलाईन पोलिसी घेण्याची सुविधा देखील केली आहे यासाठी तुम्हाला त्यांची अधिकृत वेबसाइट https://licindia.in/ वर जाऊन करू शकता.

Q. एलआयसीची सर्वोत्तम पॉलिसी कोणती आहे?

A. एलआयसीची कंपनी च्या खूप छान पोलिसी आहेत या मधील LIC कंपनीचीसर्वोत्तम पॉलिसीचे नाव आहे jeevan anand policy.

Q. LIC वर किती व्याज मिळते?

A. येथे वैयक्तिक कर्जाचा व्याज दर 9% पासून सुरू होतो आणि या कर्जाची मुदत 5 वर्षे आहे.

Q. एलआयसी प्रीमियम आपल्याला आयकर वाचविण्यात मदत करू शकते का?

A. एलआयसीच्या नियमांनुसार, आयुर्विमा पॉलिसीला आयकर कलम 80 अंतर्गत  कर सवलतीचा लाभ मिळतो.

निष्कर्ष | Conclusion

आजच्या या लेखात आपण एलआयसी म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती पहिली आहे? तसेच आपण LIC फुल फॉर्म, LIC ची स्थापना कधी झाली ,2023 मध्ये गुंतवणूक करण्याची बेस्ट एलआयसी प्लॅन्स कोणते आहेत इ. बद्दल माहिती पाहिली आहे. आशा आहे की तुम्हाला हा लेख आणि माहिती आवडली असेल. जर होय, तर ते तुमच्या मित्रांसह आणि सोशल मीडियावर शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील LIC बद्दल माहिती मिळेल.

हे देखील वाचा

Paytm personal loan information in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment