[150+] Marathi Shabdakode | मराठी कोडी व उत्तरे | Marathi kodi | Marathi Shabd Kodi
Marathi kodi: मित्रांनो आजच्या या लेखात आम्ही काही निवडक मराठी कोडी/Marathi Kodi तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत या मराठी कोड्यामधील किती मराठी कोडी तुम्ही सोडवलीत आम्हाला नक्की कळवा. सर्व कोड्याची उत्तरे तुम्हाला शेवटी दिली आहेत. पण प्रयन्त करा कि प्रत्येक कोड उत्तर न बघता सोडवण्याचा. तसेच हि Marathi Shabd kode तुमच्या मित्रांसोबत शेअर करून त्यांना सुद्धा विचार करायला लावा.
मित्रांनो कोड्यांमुळे आपल्या डोक्याला चालना भेटते आणि एखाद्या गोष्टीसंबंधी दुसऱ्या वेगळ्या बाजूने विचार करायला मदत होते.
1. नका जोडु मला इंजीन, लागत नाही मला इंधन, मारा पाय भरभर धावते मी, सरसर ओळखा पाहु मीकोण आहे?
2. हिरवी पेटी काट्यात पडली, उघडून पाहिली तर मोत्याने भरली. ओळखत का मला.
3. तुमची अशी कोणती गोष्ट आहे जी बाकी लोक जास्त वापरतात.
6. दोन बैल होते एक मेला एक विकला मग किती राहिले?
7. मी सर्व वस्तुंना उलटे करु शकतो,
पण स्वताला मी हलवु ही शकत नाही,
ओळखा पाहु मी कोण?
8. रोजच असतो तुमच्या घरी मी, पण काही जणानांच आवडतो,
9. तो कोण ज्याला आपण दिवसा पाहु शकतो,
10. उन्हाळयात तुम्ही मला घाबरता,
पण हिवाळयात मलाच खाता,
तुम्हाला एक इन्द्रधनुष्य,
11. दिवसा ढवळयामुक्काम करूनी, बाहेर पडतो रातीला,
12. गळा आहे, पण डोकं नाही, खांदा आहे पण हात नाही सांगा मी कोण.
13. एवढसं कार्ट घर कसं राखतं.
14. दोन भाऊ शेजारी भेटनाही जान्मांतरी.
15. चार खंडाचा एक शहर,
चार विहरी बिना पानी 18 चोर त्या शहरी,
सगळ्यांना मारून मारूत विहरीत टाकी….!!
16. आधी लाल लाल मग गोल गोल मग थंयागथताळांग सांगा मी कोण?
17. कपीली गाय तिला लोंखडी पाय, राजा बोंबलत जाय पण थांबत नाय.
18. वेडा नाही पण कागद फाडतो,
पोलिस नाही पण खाकी कपडे घालतो,
19. एकदा का बापाने मुलाल एक वस्तु दिली आणि
सांगितले भुक लागली तर खा,
सांगा पाहु ती वस्तु कोणती?
20. अशी कोणती वस्तु आहे की जी ओढल तितकी छोटी होत जाते.
21.एक पाच अक्षरी पदार्थ, पहिले 3 अक्षरे एका फुलाचे नाव,
22. मी तुमच्या शरिराचा एक भाग आहे,
23. गावभर हिंडतो पण देवळात जायला घाबरतो, ओळखा पाहु मी कोण?
24. एक जन वाढायला बारा जण जेवायला.
26. बारीक लांब पण काठी नाही दोन तोंडाची पण गांडूळ नाही श्वास घेतो पण तुम्ही नाय.
27. मातीशिवाय उगवली कपाशी लाख मन, मुसळधार पावसात पण भिजला नाही एक कण.
28. दात आहेत पण चावत नाही गुंता होता काळ्या शेतात सगळे सोपवतात माझ्यावर.
29. बस मध्ये 100 लोकं बसली होती पुढच्या थांब्यावर निमी उतरली तर बसमध्ये किती लोक राहिले?
30. एक तारेवर 10 पक्षी बसले होते 1 बंदुकीने मारला तर मग किती राहिले?
31. एक शर्ट वाळायला 1 तास लागतो तर 10 शर्ट वाळायला किती तास लागतील?
32. लाल गाय लाकूड खाय पाणी प्याय मारून जाय.
33. दोन भाऊ जुळे एक रंगाचे एक उंचीचे एक हरवता काय काम दुसऱ्याचे.
34. पाय नाही चाक नाही तरीही चालतो खात नाही पण प्यायला रंगीत पाणी लागत.
35. आठ तोंड जीभ नाही तरी शब्दाची गोडी मधापेक्षा कमी नाही.
36. पांढरी जमीन काळे बीज देता ध्यान होऊ सज्ञान.
37. खडक फोडला चांदी चमकली चांदीच्या विहरीत मिळते पाणी आम्ही म्हणतो देवाजींची हीच करणी.
38. रास्ता आहेत पण वाहने नाहीत घरे आहेत पण माणसे नाहीत.
39. अशी कोणती गोष्ट आहे जी आजारी पडत नाही तरी गोळी द्यावी लागते?
40. एक म्हतार्याला बारा पोरं काही लहान काही मोठी काही तापलेली काही थंड.
41. हात लावता गोल होतो शंभर पाय नाव कोणते?
42. रात्र होता दडून बसतात सकाळ होता सारे हसतात.
43. जिकडे तिकडे उजेड गाणी सांगा सणांची कोणती राणी.
44. एव्हढं मोठं माझं पोट साठून ठेवतो खबरी खास रोज सकाळी मी येतो सर्वजण पाहती माझी वाट.
45. पांढरे पातेले पिवळा भात न ओळखेल त्याच्या कंबरेत लाथ.
46. काळ्या रानात उभी तलवार.
47. तिखट मीठ मसाला चार शिंगे कशाला?
48. सगळे गेले रानात झिपरी पोरगी घरात.
49. आटंगण पटांगण लाल लाल रान आन बत्तीस पिंपळांना एकच पान.
50. काट्या कुट्याचा बांधला भारा कुठे जातो ढबुन्य पोरा.
51. वीज गेली आठवण झाली मोठी असो व लहान डोळयांतून हिच्या गळते पाणी.
52. गळा आहे पण डोके नाही खांदा आहे पण हात नाही.
53. न बोलवताच येतो तुमच्या घरी मी न भाडे देताच दिवस दिवस राहतो पकडू शकत नाही मला जगु सुद्धा शकत नाही माझ्याविना.
54. जागेवरून न हालत एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो कधी मी वाकडा कधी सरळ कधी करडा कधी गरम.
55. सुपभर लाह्या त्यात एक रुपया.
56. तीन पायांची तिपाई वर बसला शिपाई.
57. पाटील बुवा राम राम दाढी मिशी लांब लांब.
58. हा एकदा खाल्यानंतर पुन्हा खात नाही.
59. पाने नाही पण हिरवा आहे माकड नाही पण नक्कल करतो.
60. सगळ्यांच्या जवळ आहे पण कोणी सोडू शकत नाही.
61. बत्तीस चिरे,त्यात नागीण फिरे
62. एवढीशी बेबी,चुलीपुढे उभी
63. अटांगण पटांगण,लाल रान,बत्तीस पिंपळांना एकच पान
64. आठ तोंडे,जीभ नाही,गाणे मात्र सुरेल गाई
65. काळी गाय, काटे खाय,पाण्याला बघून उभी ऱ्हाय
कोड्यांची उत्तरे –
1) सायकल
2) भेंडी
3) नाव
4) अहमदनगर
5) ताट
6) फसवा प्रश्न उत्तर एक किंवा शून्य
7) आरसा
8) कांदा
9) सुर्य
10 )ऊन
11) काजवा
12) मांडणी/आडणी
13) कुलूप
14) डोळा
15) कॅरम
16) उखळ-ठोंबा मिरच्या
17) रेल्वे
18) वाहक
19) नारळ
20) रबर
21) गुलाबजाम
22) उजवा कोपरा
23) चप्पल
24) घड्याळ
25) वांगे
26) बासरी
27) ढग
28) कंगवा
29) 99 3
30) शून्य
31) 1 तास
32) आग
33) चप्पल
34) पेन
35) बासरी
36) पुस्तक
37) नारळ
38) नकाशा
39) बंदूक
40) वर्ष
41) पैसा किडा
42) फुले
43) दिवाळी
44) वर्तमानपत्र
45) अंडी
46) उभे केस
47) लवंग
48) केरसुणी
49) जीभ, दात, तोंड
50) फणस
51) मेणबत्ती
52) शर्ट
53) हवा
54) प्रकाश किरण
55) चंद्र आणि चांदणे
56) चूल आणि तवा
57) मक्याचे कणीस
58) धोका
59) पोपट
60) सावली
61) जीभ
62) फुकणी
63) जीभ
64) बासरी
65) चप्पल
कोरड्या विहिरीत चोर बोंबलतो
१२ कुऱ्हाडी १२ जन तुटता तुटेना बागळबन
थांबून वाजते पण घड्याळ नाही, बारीक लांब पण काठी नाही,दोन तोंडची पण साप नाही, स्वास घेते पण तुम्ही नाही.
बासरी.
कारण बासरी थांबून वाजू शकते
बारीकआणि लांब असते.
दोन तोंडाची असते.
श्वास घेते म्हणजे ते वाजवण्यासाठी आपण फुंकर मारतो.
अस काय आहे ते वाजते पण आवाज येत नाही कोड
नाक
आई,मावशी,काकू,आजी ,पणजी कुणाचीही मदत घेतली तरी चालेल.
✅✅चला सोडवा ✅✅
१. काळा खडक,पिवळं पाणी,आत पोहते चंदाराणी =
२. काळी काठी,तेल लाटी,वाकते पण मोडत नाही =
३. तळ्यात तळं,तळ्यात खांब,शेपटीने पाणी पितो गंगाराम =
४. दोन भाऊ शेजारी,भेट नाही संसारी = डोळे
५. काळ्या कोठारात म्हातारी मेली,पाचजण असून दोघांनी नेली =
६. बत्तीस चिरे,त्यात नागीण फिरे = जीभ
७. सुपभर लाह्या,मधे रुपय्या =
८. घाटावरून आला भट,त्याचा काष्टा घट =
९. आकाशातून पडली घार,रक्त प्याले घटाघटा,मांस खाल्ले पटापटा =
१०. एवढसं पोर,घर राखण्यात थोर = कुलूप
११. एवढीशी बेबी,चुलीपुढे उभी = फुकणी
१२. तार तार तारले, विजापूर मारले,बारा वर्षे तप केले,हाती नाही लागले =
१३. पाऊस नाही,पाणी नाही,रान कसं हिरवं,कात नाही,चुना नाही,तोंड कसं रंगलं =
१४. लहानसे झाड,त्याला इवलासा दाणा, गरज पडली की धावत जाऊन आणा =
१५. जांभळा झगा अंगावर,मुकुट घालते डोक्यावर = वांगे
१६. अटांगण पटांगण,लाल रान,बत्तीस पिंपळांना एकच पान = जीभ
१७. हरण पळतं,दूध गळतं =
१८. आठ तोंडे,जीभ नाही,गाणे मात्र सुरेल गाई = बासरी
१९. काळी गाय, काटे खाय,पाण्याला बघून उभी ऱ्हाय = चप्पल
२०. वीस लुगडी,आतून उघडी = कणीस
२१. सरसर गेला साप नव्हे,गडगड गेला गाडा नव्हे,गळ्यात जानवे ब्राह्मण नव्हे =
धन्यवाद तुमची कोडी आम्ही आमच्या पोस्ट वर ऍड केलीत बाकीचे उत्तर मिळाल्यावर करू
अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला जिवनात दोन वेळा मोफत मिळते आणि तिसरा वेळी विकत घ्यावि लागतय
आपले दात
17 जात
3 दिवा
5 शेंबुड
7 बत्ताशा
13 पोपट
17 जाते
7) चंद्र बाजूला तारे
18) बासरी
Please give me answer
दात
नवरा बायको आम्ही दोघे मिळून करू काम , जोडीला असलो कि सगळ्यांना उबवतो जाम . काम करताना ही शिट्ट्या वाजवत गाणे आम्ही गातो , आवाजाने होऊन हैराण कोणी कधी मद्धेच थांबवतो . थंडी मध्ये काम नाही म्हणून आम्ही गुपचूप बसतो , गर्मी मध्ये आराम करायला वेळच कमी पडतो . आमच्या जोडीला कधी सवत मिळणे नाही , ह्यांच्या रागा समोर कुणीही तग धरत नाही .
Ghanti
15
Aandheri rati mathari meli 5 mul asun doghane neli ?
15
Aandheri ratri mathari meli 5 mul asun doghane neli ? Yach answers kay aahe
15.वांगे
२) केस
माझ्यामुळे परिस्थिती मधील विद्युत वाहकता रे मधील इलेक्ट्रॉनिक गतिमान होतात
आठ आठवडे / बारा गठुडे /चार चौकडे / दोन रोकडे / सांगा काय उत्तर आहे
थंडी
Flute
Basari