शिवरायांचा पाळणा | Palana Bal Shivajicha | shivaji palna lyrics
१. पहिल्या दिवशी राजदरबारी आला वंशाला असा क्षत्रिय बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रे जो
२. दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नानापरी न्हाऊ घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो
३. तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरमध्ये आनंद मोठा उठा बायांनो सुंठोडा वाटा जो बाळा जो जो रे जो
४. चवथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजीस शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो
५. पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावुनी आली जयप्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो
६. सहाव्या दिवशी लावुनी लळा कानी कुंडल गळा मोत्याचा माळा गंध केसरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो
७. सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईंचा पोटी जन्मला हिरा त्याचा टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो जो रे जो
८. आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवतो पट्टा जो बाळा जो जो रे जो
९. नवव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोत्याने गुंफिला तारा त्यांचा स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो रे जो
१०. दहाव्या दिवशी करून साज घोड्यावर रेशमी जीन फेटा काढावा वरती बसून जो बाळा जो जो रे जो
११. अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहुनी बाळाला सेना झाली दंग पाची हत्यारे राजाच्या संग जो बाळा जो जो रे जो
१२. बारावे दिवशी बोलवा माळी केली आरास लाऊ केळी नाव शिवाजी एका मंडळी जो बाळा जो जो रे जो
१३. तेराव्या दिवशी चला मंदिरी पाळणा बांधुनी रेशमी दोरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जो जो रे जो
१४. चौदावे दिवशी लावुनी ध्वजा शहाजीं राजांनी जमवल्या फौज बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो जो रे जो
१५. पंधराव्या दिवशी नौबत वाजे बाळ अंबारीत करीत साज सांग सेनापती लष्कर फौजा जो बाळा जो जो रे जो
१६. सोळाव्या दिवशी सोळावा केला रामदास स्वामी विद्या बोलले धन्य शिवाजीचा पाळणा गाईले जो बाळा जो बाळा जो जो रे जो
हे पण वाचा –