आज आपण या लेखात पॅनकार्ड कसे काढायचे हे पाहणार आहोत. आज आपण घरबसल्या मोबाइल किंवा लॅपटॉप वरून घरबसल्या पॅनकार्ड कसे काढायचे /Pan Card Kase Kadhayche हे पाहणार आहोत.
तसेच या प्रक्रियेद्वारे तुम्ही पॅनकार्ड साठी अर्ज दिल्यावर तुमचे पॅनकार्ड तुमच्या घरी पोस्टाने आणून दिले जाईल. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. या लेखात आपण पॅनकार्ड काढण्याच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धती पाहणार आहोत.
1. ऑनलाईन पॅनकार्ड काढण्याची पद्धत
ऑनलाईन पॅनकार्ड काढण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी खालीलप्रमाणे खालीलपैकी कोणतीही एक गोष्ट नसेल तर तुम्हाला ऑनलाईन पॅनकार्ड काढता येणार नाही. तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने काढावे लागेल ऑफलाईन पद्धत खाली दिली आहे.
तसेच या पद्धतीमध्ये आधार वरती जो फोटो आहे तोच पॅन कार्ड वरती येईल तुम्हाला जर दुसरा फोटो पाहिजे असेल तर ऑफलाईन अर्ज करावा लागेल.
- आधार कार्ड
- आधार कार्डला चालु मोबाइल नंबर लिंक पाहिजे
- III.ऑनलाईन पैसे भरण्यासाठी क्रेडिट / डेबिट कार्ड किंवा UPI अकॉउंट
सर्वात आधी इंटरनेट असलेल्या मोबाइल किंवा लॅपटॉप वरून गुगल उघडा आणि गुगल मध्ये ‘online pan application ‘ टाईप करा. त्यानंतर पहिली जी NSDL लिहलेली वेबसाइट असेल ती उघडा.
त्यानंतर apply online वरती क्लिक करा. काही वेळेस ते ऑटोमॅटिक येते त्यानंतर application type मध्ये form 49A निवडा आणि category मध्ये individual निवडा.
त्यानंतर title मध्ये Shri,Smt किंवा Kumari निवडा आणि त्याखाली आडनाव, नाव, वडिलांचे नाव / पतीचे नाव भरा आणि त्याखाली तुमचा ई-मेल आयडी व मोबाइल नंबर भरा. त्यानंतर खाली दिलेल्या लहान चौकोनात क्लिक करा व submit वर क्लिक करा.
त्यानंतर continue with pan application वर क्लिक करा आणि पुढे उघडलेल्या पेज वर Submit digitally through e-KYC & e-Sign (Paperless) वर क्लिक करा.
त्यानंतर पहिल्या पानावर तुमच्या सगळ्या Personal Details व्यवस्थित वाचून भरा.
त्यानंतर दुसऱ्या पानावर contact & other डिटेल्स भरा म्हणजे या पानावर तुमचा पत्ता आणि मोबाइल नंबर भरा.
तिसऱ्या पानावर AO details भरा म्हणजे या पानावर तुम्हला तुमच्या जिल्ह्याचे कर ऑफिस निवडायचे आहे.
चौथ्या पानावर तुमचे आधार चे डिटेल्स भरा आणि त्यांनतर सगळे डिटेल्स बरोबर आहेत का चेक करा आणि सबमिट वर क्लिक करा.
त्यानंतर 93 रुपये तुम्हाला ऑनलाईन क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून भरावे लागतील.
त्यानंतर तुमच्या आधार ला लिंक असलेल्या मोबाइल वर OTP येईल तो OTP वेबसाईट वर टाका आणि submit करा आता तुमचा ऑनलाईन अर्ज पुर्ण झाला.
10 ते 12 दिवसात तुमचे पॅन कार्ड पोस्टाने तुम्ही दिलेल्या पत्यावर आणून दिले जाईल.
2. ऑफलाईन पॅनकार्ड काढण्याची पद्धत –
ऑफलाईन पॅनकार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे
- आधार कार्ड / मतदान कार्ड / ड्रायविंग लायसन
- शाळा सोडल्याचा दाखला
- फोटो २
वरील सर्व कागदपत्रे घेऊन आपल्या जवळच्या पॅनकार्ड काढणाऱ्या प्राधिनिधी कडे जा.
तिथे पॅनकार्ड साठी चा फॉर्म घ्या तो भर त्यावर फोटो चिटकवा आणि सही करा.
त्याबरोबर तुमच्या कागद पात्राच्या झेरॉक्स जोडा आणि पॅनकार्ड साठी लागणारे पैसे भरा आणि फॉर्म जमा करा.
ऑनलाईन पण कार्ड साठी 100 रुपये लागतात ऑफलाईन जास्त लागू शकतात.
त्यानंतर तुमच्या पत्त्यावर पोस्टाने पॅन कार्ड आणून दिले जाईल.
हे पण वाचा –
8767641101
DADA
BAHA
Rutuja Kinwtkar
Darshan