ॲव्होकाडो फळाची माहिती व फायदे | Avocado in Marathi

ॲव्होकाडो फळाची माहिती व फायदे | Avocado in Marathi

आज या लेखात आपण अ‍ॅव्होकाडो / Avocado in Marathi या फळाची माहिती घेणार आहोत. या लेखात आम्ही अ‍ॅव्होकाडोची/Avocado सविस्तर पणे माहिती दिली आहे. अ‍ॅव्होकाडोची आरोग्यदायी फायदे पण आम्ही दिले आहेत.

 

ॲव्होकाडो फळाची माहिती / Avocado Fruit in Marathi
अ‍ॅव्होकाडो हे एक उष्ण कटीबंधीय फळ आहे. अ‍ॅव्होकाडो हे फळ दक्षिण मेक्सीको मधुन आले आहे. अ‍ॅव्होकाडो ला सुपरफळ असा दर्जा देण्यात आला आहे. अ‍ॅव्होकाडो हे आरोग्यसाठी अतीशय उपयोगी असल्यामुळे याला सुपरफळ असा दर्जा देण्यात आला आहे.

 

अ‍ॅव्होकाडो मधे अंड्याच्या आकाराची किंवा लहान एकच बी असते. अ‍ॅव्होकाडोचे झाड जास्तीत जास्त ६५ फुटापर्यंत वाढते. अ‍ॅव्होकाडो हे फळ कच्चे असतानाच झाडावरून तोडले जाते. अ‍ॅव्होकाडो हा कच्चा असताना हिरवा असतो व पिकल्यावर थोडांसा तपकिरी होतो.

 

भारतात अवकोडी ची शेती उत्तराखंड मधे केली जाते. अ‍ॅव्होकाडो ला मखन फळ असेही म्हणतात. अ‍ॅव्होकाडो चा वापर भारतापेक्षा बाहेरील देशात जास्त केला जातो. भारतात अ‍ॅव्होकाडो चा सरासरी दर हा ४०० ते ६०० रूपये किलो आहे.

 

Avocado in Marathi
Avocado in Marathi

Health Benefits of Avocado in Marathi

 

अ‍ॅव्होकाडो मधे असणारे आरोग्यदायी घटक
अ‍ॅव्होकाडो मधे फॅटी ॲसीड मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच अ‍ॅव्होकाडो मधे पोटॅशिअम, व्हिटॅमीन, आयर्न, कॅलरीज, अँटी ऑक्सीडंट, पण असतात. १०० ग्रॅम अ‍ॅव्होकाडो मधे ६० ते ८० कॅलरीज असतात. या आरोग्यदायी गुणधर्मामुळे अ‍ॅव्होकाडो ला सुपरफळ म्हणतात.

 

अ‍ॅव्होकाडो चे आरोग्यदायी फायदे / Avocado Fruit Benefits In Marathi

 

१. हृदय सुदृढ बनवते – अ‍ॅव्होकाडोमधे बीटा-सिटोस्टेराॅल हा महत्वाचा घटक आढळतो. जो कोलेस्ट्राॅल नियंञनात ठेवण्यासाठी मदत करतो आणि आपल्या हृदयाला सुदृढ ठेवण्यासाठी मदत करतो.

 

२. डोळ्यासाठी फायदेशीर – अ‍ॅव्होकाडोमधे मोठ्या प्रमाणात विटॅमीन आणि मिनरल्स असतात त्यामुळे अ‍ॅव्होकाडो डोळ्याच्या आरोग्यसाठी फायदेशीर असतो.

 

३. वजन वाढवण्यासाठी – अ‍ॅव्होकाडो हे वजन वाढवण्यासाठी पण उपयुक्त आहे. अर्धा अ‍ॅव्होकाडो मधे २५% विटॅमीन असतात. तसेच १०० ग्रॅम अ‍ॅव्होकाडो मधे ६० ते ८० कॅलरीज असतात. म्हणुन अ‍ॅव्होकाडो वजन वाढवण्यासाठी उपयोगी आहे.

 

४. त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त – अ‍ॅव्होकाडो मधे अँटी ऑक्सीडंड गुणधर्म असतात याचा उपयोग आपली त्वाचा आरोग्यदायी व तेजस्वी बनण्यासाठी होतो.

 

५. पचन शक्ती सुधारण्यासाठी – अ‍ॅव्होकाडो खाल्याने आपलो पचनशक्ती सुधारते व पोटाचे आजार कमी होतात. आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी अ‍ॅव्होकाडोचा वापर होतो.

 

६. तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी – जर तुमच्या तोंडातुन दुर्गंधी येत असेल तर ती कमी करण्यासाठी अ‍ॅव्होकाडोचा वापर करू शकता. अ‍ॅव्होकाडो तोंडातील दुर्गंधी कमी करतो.

 

७. वजन कमी करण्यासाठी – अ‍ॅव्होकाडोचा वापर वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी पण होतो. अ‍ॅव्होकाडो मधे असणारे विविध विटॅमिन्स आपले वजन निंयञणात ठेवण्यासाठी मदत करतात.

 

८. केस वाढीसाठी – अवाकाडो हे केसांच्या वाढीसाठी पण उपयोगा. अ‍ॅव्होकाडो हा केसांच्या वाढीसाठी व चमकदार बनविण्यासाठी पण मदत करतो.

 

अ‍ॅव्होकाडो कसे खावे | How to eat Avocado in Marathi

 

अ‍ॅव्होकाडो मधुन कापावे व आतली बी काढुन टाकावी. अ‍ॅव्होकाडो शक्यतो कच्चा खावे कारण अ‍ॅव्होकाडो कच्चा खाल्याने त्याचे जास्त फायदे मिळतात.

 

कच्चा खातान त्यावर मीठ लावावे किंवा ऑलिव तेल लावुन पण खावु शकता. तसेच काही लोक अ‍ॅव्होकाडो ला ब्रेड पेस्ट च्या रूपात पण खातात. एका व्यक्तीसाठी अर्धा अ‍ॅव्होकाडो सुद्धा पुरेसा आहे.

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment