मिसळपाव रेसिपी मराठी । Misal Pav Recipe in Marathi
Misal Pav Recipe in Marathi: इथे आम्ही मिसळपाव रेसिपी मराठी दिली आहे.इथे आम्ही सर्वाना येईल आशी सोपी रेसिपी दिली आहे.या रेसिपी साठी वेगळे असे काही लागत नाही आपण घरात असणारे पदार्थ वापरून हि रेसिपी बनवू शकता.ही रेसिपी दिलेल्या स्टेप नुसार बनवा म्हणजे तुमची मिसळ तयार होईल.
लागणारे साहित्य :
१/४ कप किसलेले, कोरडे नारळ
तेल
बारीक चिरलेला कांदा
लसूण
आले
टोमॅटो
१ चमचा धणे पूड
१/२ चमचा हळद
१ चमचा गोडा मसाला / किचन किंग मसाला
१ चमचा लाल तिखट
250 ग्रॅम शिजवलेली मटाकी
४ ग्लास पाणी
चवीनुसार मीठ
फरसान
शेव
कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी
मिसळ बनवण्याची प्रक्रिया :
१. प्रथम एक तवा मध्यम आचेवर गरम करा त्यात किसलेला नारळ घालून लालसर भाजून घ्या नारळाचा कीस लालसर भाजल्या नंतर त्यास एका मिक्सर च्या भांडयात घ्या.
२. त्याच तव्या १ चमचा तेल घाला. तेल मध्यम आचेवर गरम झाल्या नंतर कापलेला कांदा, लसूण आणि आले घाला. हे मिश्रण ६ ते ८ मिनिटे लालसर होईपर्यंत मध्यम आचेवर तळा नंतर ह्या मिश्रणात टोमॅटो घाला आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आणखी 4-5 मिनिटे तळा
३. पाच मिनिट हे मिश्रण थंड झाल्यावर हे मिश्रण प्रथम भाजलेला नारळाचा कीस मध्ये घालून त्यात थोडे पाणी घालून हे मिश्रण मिक्सर वरती बारीक पेस्ट तयार करून घ्यायची (हे तयार झालेले मिश्रण आहे मिसळ चा मसाला )
४. कढईत १ चमचा तेल गरम करावे. मिक्सर वरती बारीक केलेले मिश्रण (मसाला) साधारण ३-४ मिनिटे मध्यम आचेवर तळा त्यात १ चमचा धणे पूड, गोडा मसाला(किचन किंग मसाला) आणि तिखट घाला.आपल्याकडे गोडा मसाला नसल्यास आपण स्वयंपाक घरातील इतर कोणताही गरम मसाला चालेल.गोडा मसाला सोडून ते परतून घ्या.
५. कुकर मध्ये १-२ शिटी पर्यंत मटकी शिजवा तळलेल्या मसाल्यात उकडलेली मटाकी, पाणी, हळद आणि मीठ घाला आणि चांगले मिसळा.
६. चवीनुसार मीठ आणि तुम्हाला हवा असल्यास गुळ घाला. आपल्याला आवडत नसल्यास आपण वगळू शकता. ७-८ मिनिटे झाल्यावर गॅस बंद करा.
७.मिसळ सर्व्ह करताना एका भांड्यात तळाशी मटाकीचा एक थर घाला. नंतर फरसन आणि कट घाला त्यावर शेव,कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
८. लादी पाव किंवा ब्रेड कांदा,लिंबाचा तुकडा,धणे आणि सर्व्ह करावे
हे पण वाचा –