स्वामी समर्थ आरती | Swami Samarth Aarti in Marathi | Swami Samarth aarti Lyrics

स्वामी समर्थ आरती | Swami Samarth Aarti in Marathi | Swami Samarth aarti Lyrics

स्वामी समर्थ आरती | Swami Samarth Aarti

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा ! जयदेव जयदेव !
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी ||१||

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार,तेथे जडमूढ कैसा करु विस्तार ||२||

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!
देवाधिदेव तू स्वामीराया, निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया,शरणागता तारी तू स्वामीराया ||३||

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!
अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सूता नलगे चरणावेगळे ||४||

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!

श्री स्वामी समर्थ आरती संग्रह pdf: श्री स्वामी समर्थ आरती संग्रह pdf
 
 
हे पण वाचा – 
 
 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment