हरतालिकेची आरती | हरतालिका आरती | Hartalikechi Aarti

 Hartalikechi Aarti

 ।। हरतालिकेची आरती । हरतालिका आरती ।। 

 

 
हरअर्धांगीवससी। जासी यज्ञामाहेरासी।
तेथें अपमान पावसी। यज्ञकुंडींतगुप्त होसी।।
जय देवी हरितालिके।सखी पार्वती अंबिके। 
आरती ओवाळीतें। ज्ञानदीपकळिके।।धृ.।। ।।1।।
रिघसी हिमाद्रीच्या पोटी। कन्या होसीतू गोमटी।
उग्र तपश्चर्या मोठी। आचरसीउठाउठी ।।
जय देवी हरितालिके।सखी पार्वती अंबिके। 
आरती ओवाळीतें। ज्ञानदीपकळिके।।धृ.।। ।।2।।
 
तापपंचाग्निसाधनें।धूम्रपानें अधोवदनें।
केली बहु उपोषणें।शंभु भ्रताराकारणें।।
जय देवी हरितालिके।सखी पार्वती अंबिके। 
आरती ओवाळीतें। ज्ञानदीपकळिके।।धृ.।।।।3।।
लीला दाखविसी दृष्टी। हेंव्रत करिसी लोकांसाठी।
पुन्हां वरिसी धूर्जटी। मजरक्षावें संकटीं।।
 जय देवीहरितालिके। सखी पार्वतीअंबिके। 
आरती ओवाळीतें।ज्ञानदीपकळिके।। धृ.।।।। 4।।
काय वर्ण तवगुण। अल्पमति नारायण।
मातें दाखवीं चरण। चुकवावेंजन्म मरण।।
 जय देवीहरितालिके। सखी पार्वतीअंबिके। 
आरती ओवाळीतें।ज्ञानदीपकळिके।। धृ.।।।।5।।
 
हे पण वाचा – 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment