श्री संत ज्ञानेश्वर महाराज आरती | Sant Dyaneshwar Aarti | ज्ञानेश्वर महाराजांची आरती

इथे आम्ही संत ज्ञानेश्वर महाराज आरती / Sant Dyaneshwar Aarti देत आहोत आम्ही इथे संत ज्ञानेश्वर महाराजांची पुर्ण आरती दिली आहे.तसेच इतर दुसर्या पण आरत्या आम्ही खाली दिल्या आहेत 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आरती

आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा।

सेविती साधुसंत म्हणु वेधला माझा वेधला माझा॥ 

आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा॥

सेविती साधुसंत म्हणु वेधला माझा वेधला माझा॥

आरती ज्ञानराजा ।

लोपले ज्ञान जगी । हित नेणावे कोणी।

अवतार पांडुरंगा । नाव ठेविले ज्ञानी॥

आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा॥

सेविती साधुसंत म्हणु वेधला माझा वेधला माझा॥

आरती ज्ञानराजा ॥१॥

कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी।

नारद तुंबरही । साम गायन करी गायन करी॥

आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा॥

सेविती साधुसंत म्हणु वेधला माझा वेधला माझा॥

आरती ज्ञानराजा ॥२॥

प्रकट गुहा बोले । विश्व ब्रम्हची केले।

राम जनार्दनी । पायी मस्तक ठेविले॥

आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा॥

सेविती साधुसंत म्हणु वेधला माझा वेधला माझा॥

आरती ज्ञानराजा ॥३॥

हे पण वाचा 

विठ्ठलाची आरती | पांडुरंगाची आरती

तुकाराम महाराज आरती | Shri Tukaram Maharaj Aarti

Leave a Comment