Mahadevachi Aarti in Marathi | महादेवाची आरती | शंकराची आरती

महादेवाची आरती | शंकराची आरती | Mahadevachi Aarti in Marathi

मित्रांनो तुम्ही सुद्धा Mahadevachi Aarti in Marathi च्या शोधात आहेत का तर आजच्या या महादेवाची आरती लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Mahadevachi Aarti in Marathi आणि Mahadevachi Aarti in english. महादेवाची आरती नियमित घरात वाचल्याने घरातील व्यक्तिंच्या इच्छा पूर्ण होतात व घरातील सर्व व्य्नतींच्या जीवनात समृद्धी येते.

Mahadevachi Aarti in Marathi

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
 
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
 
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
 
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥


Lavthavati Vikrala Aarti Lyrics in English

Lavathavati Vikrala Brahmandi Mala |
Vishe Kantha Kala Trinetri Jwala ||
Lavanya Sundara Mastaki Bala |
Tethuniya Jala Nirmala Vahe Jhulajhula ||

Jai Deva Jai Deva Jai Shri Shankara |
Aarti Ovalu Tuja Karpuragaura ||

Karpuragaura Bhola Nayani Vishala |
Ardhangi Parvati Sumananchya Mala ||
Vibhutiche Udhalana Shitikantha Nila |
Aisa Shankar Shobhe Umavelhala ||

Jai Deva Jai Deva Jai Shri Shankara |
Aarti Ovalu Tuja Karpuragaura ||

Devi Daityi Sagaramanthana Pai Kele |
Tyamaji Avachita Halahala Je Uthile ||
Te Tva Asurapane Prashana Kele |
Nilakantha Nama Prasiddha Jhale ||

Jai Deva Jai Deva Jai Shri Shankara |
Aarti Ovalu Tuja Karpuragaura ||

Vyaghrambara Phanivardhara Sundara Madanari |
Panchanana Manamohana Munijana Sukhakari ||
Shatakotiche Beej Vache Uchchari |
Raghukulatilaka Ramadasa Antari ||

Jai Deva Jai Deva Jai Shri Shankara |
Aarti Ovalu Tuja Karpuragaura || 

जगातील सर्वच शिवभक्तांसाठी Mahadevachi Aarti खूप महत्वाची आरती आहे. मला अशा आहे तुम्हाला Mahadevachi Aarti in Marathi हा लेख आवडला असेल. तुमच्या काही शंका असतील किव्हा तुम्हाला काही या लेखात बदल करायचा असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. 
 
हे पण वाचा – 
 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment