पांडुरंगाची आरती | विठ्ठलाची आरती मराठी | Pandurangachi Aarti | Vitthalachi Aarti Marathi

पांडुरंगाची आरती | विठ्ठलाची आरती मराठी | Pandurangachi Aarti | Vitthalachi Aarti Marathi

खाली आम्ही दिली आहे श्री विठ्ठलाची आरती मराठी / Vitthalachi Aarti Marathi  दिली आहे. तशीच पांडुरंगाची आरती पण दिली आहे.
 

श्री विठ्ठलाची आरती | पांडुरंगाची आरती | आरती विठ्ठलाची

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
 
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । 
 
कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
 
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 
 
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
 
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।
 
 
 
तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
 
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
 
देव सुरवर नित्य येती भेटी ।गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।।
 
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
 
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।१।।
 
 
 
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
 
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
 
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
 
ओवळिती राजा विठोबा सावळा।।
 
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
 
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।२।।
 
 
 
ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।
 
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
 
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
 
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।
 
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
 
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।३।।
 
 
 
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
 
चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।। दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती।
 
केशवासी नामदेव भावे ओंवळिती।।
 
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
 
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।४।।
 
 
 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment