सुकन्या समृद्धि योजना ही एक मुलीचा उज्ज्वल भविष्यासाठी योजना आहे हे खाते फक्त 250 रुपयांनी उघडता येते. यानंतर एका आर्थिक वर्षात खात्यात किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे.’बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली.
या योजनेत सामील झाल्यामुळे पालकांना त्यांच्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च त्यांच्या लग्नातून उचलण्यास मदत होते. या वेळेत तुम्ही या योजनेत सामील झाल्यास तुम्हाला 7.6 टक्के व्याज मिळेल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे व्याज चक्रवाढ पद्धतीने मिळते
दररोज 100 रुपये वाचवून 15 लाख रुपये कमवा जर एखाद्या व्यक्तीने दरमहा 3,000 रुपयांची गुंतवणूक या योजनेत केली, तर त्याने एका वर्षात गुंतवलेली एकूण रक्कम 36,000 रुपये असेल. 14 वर्षे गुंतवणूक केल्यानंतर, त्याला 7.6 टक्के वार्षिक दराने व्याज म्हणून 9,87,637 रुपये मिळतील.
या योजनेच्या नियमानुसार, सुकन्या समृद्धी खात्याची परिपक्वता तेव्हाच पूर्ण होते जेव्हा मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण होते. अशा परिस्थितीत मुलीच्या वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला 15,27,637 रुपये मिळू शकतात.
सुकन्या समृद्धि योजना माहिती | Sukanya Samriddhi Yojana in Marathi
1.सुकन्या समृद्धी योजना काय आहे?
सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची एक छोटी बचत योजना आहे.या योजने मुले पालकांचा मुलींच्या शिक्षणाचा त्याचा लग्नाचा खर्च या योजनेतून उचलण्यास मदत होणार आहे ही योजना मुलीनसाठी व त्यांचा पालकांसाठी अत्यंत फायद्याची आहे
2.सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये कोणती?
अत्यंत छोटया रक्कम भरून तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता हे खाते फक्त 250 रुपयांनी उघडता येते.एका आर्थिक वर्षात खात्यात कमीतकमी 250 रुपये जमा करून या योजनेचा लाभ मुलीचे पालक घेऊ शकतात
3.सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत व्याज दर काय आहे?
7.6 %. व्याज दर दिला जातो.
एका आर्थिक वर्षात रु. जास्तीत जास्त गुंतवणूक 1, 50,000 रुपये आहे
4.सुकन्या समृद्धी योजनेत कोण गुंतवणूक करू शकतो?
भारतातील कोणताही नागरिक आपल्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकतो.
हे खाते 10 वर्षाखालील मुलीसाठी उघडता येते.
वयाच्या 18 व्या वर्षी मुलगी स्वतंत्रपणे हे खाते स्वतः व्यवस्थापित करू शकते.
या खात्यात 15 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते.
सुकन्या समृद्धी योजना खाते फक्त जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते.
5.सुकन्या समृद्धी योजनेत कमीतकमी आणि जास्तीत जास्त गुंतवणूक किती आहे?
सुकन्या समृद्धी खाते किमान 250 रुपयांसह उघडता येते. एकदा खाते उघडल्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे. जर कोणी आर्थिक वर्षात किमान रक्कम जमा करू शकत नसेल, तर खाते डिफॉल्ट म्हणून पाहिले जाते. एका आर्थिक वर्षात सुकन्या खात्यात जमा होणारी जास्तीत जास्त रक्कम 1.5 लाख रुपये आहे.
6.सुकन्या समृद्धी योजना खाते कोठे उघडता येते?
या योजनेचे खाते कोणत्याही नॅशनल बँकेत व पोस्ट ऑफिस मध्ये उघडता येऊ शकते
7.खाते उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रे
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याचा फॉर्म
मुलीचे जन्म प्रमाणपत्र
ओळखीचा पुरावा (आधार कार्ड)
निवास पुरावा
हे पण वाचा –