व्यवसाय कर्ज योजना | Business Loan Information in Marathi
व्यवसायासाठी बँकेतून कर्ज प्रकरण करत असताना बऱ्याच जणांना अपुऱ्या माहिती मुळे अडचणी निर्माण होतात. पण आता व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. बर्याच बँका आता सोप्या रितेने कर्जे देत आहेत.कारण, बँकांनी आता व्यवसाय कर्जाची प्रक्रिया अगदी सोपी केली आहे.
देशातील लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विविध कर्ज योजना सुरू केल्या आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजने व्यतिरिक्त इतरही बर्याच योजना आहेत, ज्यात आपण मोठ्या कर्जासाठी थोड्या प्रमाणात रक्कम घेऊ शकता. सध्या केंद्र व राज्य सरकारच्या योजनांनुसार तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी 50,000 ते 10 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता.
व्यवसाय कर्ज योजना | Business Loan Information in Marathi
व्यवसाय कर्ज म्हणजे आपल्या व्यवसायाच्या गरजा भागविण्यासाठी घेतलेले हे कर्ज आहे. तुम्हालाही कोणत्याही बँकेतून कर्ज घ्यावयाचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या.
- तुमची विस्तृत व्यवसाय योजना तयार करा.
- ज्या बँकेतून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे त्या बँकेला तुमची व्यवसायाची योजना सांगा.
- यानंतर आपल्याला किती कर्ज आवश्यक आहे हे ठरवा.
- आपल्या क्रेडिट स्कोअरबद्दल माहिती शोधा. त्यासाठी तुम्ही सिबिल स्कोर कसा चेक करायचा हा ब्लॉग नक्की वाचा.
- उद्योगाच्या नेमक्या गरजांचे विश्लेषण करा.
- लोन देणाऱ्या बँकेबाबत माहिती गोळा करा.
व्यवसायासाठी बँकेतून कर्ज घेताना लागणारी संभाव्य कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड / पॅन कार्ड / रेशन कार्ड / लाईट बिल
- उद्योग आधार / शॉपॅक्ट लायसन
- बँक खाते, बँक स्टेटमेंट, खाते उतारा
- CIBIL Score रिपोर्ट
- व्यवसायाचा प्रकल्प अहवाल (project report)
- व्यवसाय ज्या जागेवर करणार आहे ती जागा स्वतःची असल्यास जागेची कागदपत्रे
- जागा भाडेतत्वावर असल्यास रजिस्टर भाडेकरार
- ITR फाईल
- व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
व्यवसाय कर्ज वापर | How to use Business loan in Marathi
- व्यवसायाच्या विस्तार किंवा बदलासाठी
- दररोज आवश्यक असलेल्या भांडवलाची आवश्यकता भागविण्यासाठी
- रोख प्रवाह वाढ
- व्यवसाय करण्यासाठी जमीन किंवा जागा खरेदी करणे
- उपकरणे / यंत्रसामग्री / कच्चा माल खरेदी करणे
- साठा करण्यासाठी यादी
- कर्मचारी प्रशिक्षण, भाड्याने / पगार इ.
- ऑपरेशन स्केल-अप किंवा तंत्रज्ञान अपग्रेडसाठी
- नवीन उत्पादन किंवा तंत्रज्ञान सेटअप
- कार्यालय परिसर नूतनीकरण
बिजनेस लोन घेण्याचे फायदे । Benefits of business loan in Marathi
- बिजनेस लोन मुळे तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करू शकता.
- तुमच्या बिजनेस बंदावला असेल तर व्यवसाय पुढे नेण्यास मदत होते.
- अल्पकालीन किंवा दीर्घकालीन पैशाची गरज पूर्ण होते.
- रोख प्रवाहाची व्याप्ती वाढते.
- तुमचा व्यवसाय नव्या उंचीवर नेण्यात मदत होते.
- स्टार्टअप किंवा बिझनेस लोनसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारही मदत करत आहेत.
- भांडवल उभारणीचा ताण कमी होतो.
व्यवसाय कर्जाचे तोटा । Disadvantage of Business Loan in Hindi
आता आपण व्यवसाय कर्जाचे तोटेकाय आहेत हे देखील पाहूया
- सर्व व्यवसाय हे कर्जासाठी पात्र नसतात.
- बहुतेक प्रकरणांमध्ये, बँका आणि NBFC तुम्हाला आवश्यक तेवढी रक्कम देत नाहीत, यामुळे तुमची निराशा होऊ शकते.
- मोठ्या रकमेची व्यवसाय कर्जे ही मौल्यवान मालमत्तेद्वारे सुरक्षित केली जातात, जर अर्जदार वेळेच्या मर्यादेत कर्जाची परतफेड करू शकत नसेल तर, सावकार मालमत्ता जप्त करू शकतो.
Business Loan पात्रता
- तुम्ही भारताचे नागरिक असले पाहिजेत.
- तुमचे वय 21 ते 70 वर्षे असावे.
- तुमचा स्वतःचा पैसे कमवून देणारा व्यवसाय असावा
- किंवा तुम्ही स्वयंरोजगार असलेली व्यक्ती असू शकता.
- तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत आहात किंवा तुमचा जुना व्यवसाय हा किमान 1 वर्ष जुना असावा.
- तुमचा क्रेडिट स्कोअर 750 असावा.
- तुमचा आधीपासून व्यवसाय असल्यास, विद्यमान व्यवसायाची किमान वार्षिक उलाढाल रु. 12 लाख असावी.
व्यवसाय कर्ज भेटण्यास किती कालावधी लागतो
- साधारणपणे, व्यवसाय कर्ज मंजूर होण्यासाठी 10 ते 15 दिवस लागतात. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून व्यवसाय कर्ज घेण्यास तुलनेने जास्त वेळ लागतो.
- दुसरीकडे, जर तुम्ही खाजगी बँक किंवा NBFC बँकेतून कर्ज घेतले, तर दोन ते चार दिवसांत तुम्हाला कर्ज मंजूर होते.
- हे कर्ज तुमच्या पात्रते वरही अवलंबून आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर, CIBIL स्कोर कसा आहे? हे यावर देखील अवलंबून असेल, जर हे सर्व चांगले असेल तर कर्ज लवकर मिळण्याची शक्यता वाढते.
व्यवसाय कर्ज किती भेटू शकतो
तुमचा व्यवसाय किती मोठा आहे आणि तुमची वार्षिक उलाढाल किती आहे या आधारावर व्यवसाय कर्ज दिले जाते. जर तुमचा बिझनेस फार मोठा नसेल तर तुम्ही 50 हजार ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे व्यवसाय कर्ज घेऊ शकता.
परंतु तुमचा व्यवसाय खूप मोठा असेल तर तुम्ही 40 कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय कर्ज घेऊ शकता. एकूणच, बँका आणि NBFC तुमच्या व्यवसायाच्या आधारावर कर्जाची रक्कम ठरवतात.
व्यवसाय कर्जाचे प्रकार | Types of Business Loan in Marathi
- कार्यरत भांडवल कर्ज
- प्रधानमंत्री मुद्रा योजना
- Start up इंडिया
व्यवसाय लोन चा व्याज दर किती असतो
व्यवसाय कर्जावरील व्याजदर गृहकर्जापेक्षा जास्त असतो, बहुतेक बँका आणि NBFCs दरवर्षी 11% ते 19% व्याजदराने व्यवसाय कर्ज देतात. परंतु ग्राहकाची प्रोफाइल, कर्जाची रक्कम, व्यवसाय, कार्यकाळ आणि ऋणदाता इत्यादींवर व्याजदर जास्त किंवा कमी असू शकतो.
महिला उद्योजकांसाठी विशेष कर्ज योजना –
- महिला उघम निधि योजना
- महिला समृद्धि योजना
- सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया कल्याणी योजना
- स्टेट बैंक ऑफ इंडिया स्त्री शक्ती पैकेज
- भारतीय महिला बैंक श्रंगार व अन्नपूणा योजना
- देना बैंक देना शक्ति योजना
- उद्योगिनी
Q. मला व्यवसायासाठी किती कर्ज मिळू शकते?
A. तुमच्या व्यवसायानुसार तुम्हाला 50 हजार ते 40 कोटी रुपयांचे व्यवसाय कर्ज मिळू शकते.
Q. मला व्यवसायासाठी कर्ज कुठे मिळेल?
A. SBI, PNB, ICICI, HDFC, Axis इत्यादी भारतातील जवळपास सर्व मोठ्या बँका व्यवसाय कर्ज सुविधा प्रदान करतात. बँकांव्यतिरिक्त, अनेक NBFC(Non-Banking Financial Corporation) व्यवसाय कर्ज देतात.
Q. व्यवसायासाठी कर्ज कोणाला मिळू शकते?
A. व्यवसाय कर्ज प्रत्येक व्यावसायिकाला मिळू शकतो. परंतु, तो त्या कर्जासाठी पात्र आहे कि नाही हे पहिले बघितले जाते. म्हणजेच त्याने बँकेच्या सर्व अटी पूर्ण केल्या पाहिजेत.
हे पण वाचा –
mahiti khupach chhan aahe.
Thank you Ma’am