Instagram Account Verification Process In Marathi | Instagram ची blue tick कशी होईल उपलब्ध ?
Instagram ची blue tick आता सर्वांसाठी उपलब्ध आहे, कंपनीने सांगितले असे करावे verification.
नमस्कार मित्रांनो,
Instagram Account Verification Process In Marathi मागील काही दिवसापासून आपण बघत आहोत की ट्विटरवर लोक पैसे देऊन blue tick ( ) मिळवत आहेत, म्हणजेच वेरिफिकेशन ( Instagram verification charges In Marathi) करण्याचे पैसे देत आहेत. यानंतर ट्विटर कडून त्यांना ब्ल्यू टिक देण्यात येत आहे.
मागील काही दिवसांमध्ये Meta हि Facebook आणि Instagram, WhatsApp ची पेरेंट कंपनी आहे, त्यांनी देखील असे सांगितले की ते सुद्धा subscription त्यांच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मार्क झुकरबर्ग यांनी देखील या गोष्टीची घोषणा केली की ही फॅसिलिटी आता भारतामध्ये देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. म्हणजेच आता तुम्ही पैसे देऊन फेसबुक किंवा तुमचे Instagram व्हेरिफाईड करून घेऊ शकता.(Instagram Account Verification process In Marathi )
Instagram Account Verification Price In Marathi : Instagram Account Blue Tick चे महिन्याचे चार्जेस
599 रुपये दर महिन्याला देऊन तुम्हाला फेसबुकवर ब्ल्यु टिक मिळवता येईल. पण ते फक्त वेब साठी असेल, म्हणजेच जर तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करता तर यासाठी तुम्हाला 599 रुपये लागतील, परंतु जर तुम्ही अँप्लिकेशनच्या माध्यमातून ( IoS and android ) जर व्हेरिफिकेशन केले, तर तुम्हाला थोडे अधिक पैसे द्यावे लागतील. ट्विटर च्या बाबतीत देखील असंच आहे , जर तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून वेरिफिकेशन करून घेत असाल तर तुम्हाला थोडे कमी पैसे भरावे लागतील.
आधीपासून ज्यांचे ब्ल्यू टिक आहे त्यांचे काय होणार?
आता सर्वांच्या मनात हा प्रश्न आला असेल की ज्यांचे अकाउंट ऑलरेडी व्हेरिफाइड आहेत, त्यांचे नेमके काय होणार त्यांचे ब्लू टिक हटवले जाणार का? तर फेसबुक कंपनीने असे सांगितले आहे की ज्यांचे अकाउंट ऑलरेडी व्हेरिफाईड झालेले आहेत त्यांचे ब्ल्यू टिक हटवले जाणार नाहीत. याआधी अकाउंट व्हेरिफिकेशन करण्याचे कोणतेही पैसे लागत नव्हते.
जर तुम्हाला instagram वर अकाउंट व्हेरिफाईड करून हवे असेल तर तुम्हाला त्यासाठी 699 रुपये दर महा मोजावे लागतील. ब्लू टिक चा हा फीचर आधीच्या लोकांना फ्री मध्ये मिळाल्यामुळे लोकांमध्ये,आता बरीच चर्चा सुरु आहे. ज्या लोकांनी त्यांचे अकाउंट ऑलरेडी व्हेरिफाइड करून घेतलेले आहेत, त्यांचे ब्लु टिक हटवण्यात येणार नाही अशी कंपनीने घोषणा केलेली आहे.
तुम्ही तुमचे अकाउंट कसे व्हेरिफाय करून घेऊ शकता? Process For Instagram Account Verification In Marathi
१) सर्वप्रथम तुमच्या instagram च्या प्रोफाईलवर जा.
२) यानंतर उजव्या हाताला दिसणाऱ्या तीन लाईन्स वर क्लिक करा.
३) त्यानंतर सेटिंग मध्ये जा.
४) Account या ऑप्शन वर क्लिक करून Tap request verification वर क्लिक करा.
५) यानंतर विचारलेली संपूर्ण माहिती भरून send वर क्लिक करा.
६) यानंतर तुमचे एप्लीकेशन चेक करून, याची पडताळणी instagram टीम द्वारे केली जाईल आणि यानंतर तुम्हाला blue टिक मिळेल.
तुम्हाला जर हा आर्टिकल माहितीपूर्ण वाटला असेल, तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद.