Talathi Bharti Previous Year Question Papers with Answers in Marathi 2024
Talathi Bharti Previous Year Question Papers with Answers in Marathi: विद्यार्थीमित्रांनो तलाठी भरती परीक्षेमध्ये भूगोल, समाजसुधारक, इतिहास, यांविषयी भरपूर प्रश्न विचारले जातात. म्हणून च आजच्या या Talathi previous year question paper in Marathi लेखात मी मागील १० वर्षात विचारले गेलेले तलाठी भरती संबंधी चे महत्वाचे प्रश्न तुमच्या साठी घेऊन आलो आहे.
Talathi question paper in Marathi च्या या लेखात मी २०० हुन अधिक तलाठी भरती प्रश्नांचा संग्रह केलेला आहे. त्यामुळे जर का तुम्ही या वर्षी तलाठी भरती परीक्षा देणार असाल तर Talathi exam paper in Marathi च्या या लेखातील प्रश्न नक्की वाचून जा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
Talathi previous year question paper in Marathi 2024

1. सन 1940 मध्ये…… यांच्या अध्यक्षतेत संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली?
A. श्री. एस एम. जोशी
B. श्री. रामराव देशमुख
C. श्री. ज. स. करंदीकर
D. श्री. ग.त्र्यं. माडखोलकर
2. विधवा पुनर्विवाहाचा कायदा कधी पास झाला?
A. सन 1826
B. सन 1836
C. सन 1846
D. सन 1856
3. भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा …. येथे आहे .
A. दिल्ली
B. मुंबई
C. बंगलोर
D. हैदराबाद
4. रंगाआंधळेपणा असलेली व्यक्ती कोणत्या दोन रंगात फरक करताना अडचणींचा सामना करतो?
A. निळा-लाल
B. लाल-निळा
C. लाल-हिरवा
D. काळा-पांढरा
5. राष्ट्रपतींना……. यांच्यासमोर शपथ घ्यावी लागते?
A. उपराष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. सरन्यायाधीश
D. राष्ट्रपती
6. अर्ज हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?
A. फारशी
B. पोर्तुगीज
C. अरबी
D. गुजराती
7. खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्व देणारे…….?
A. सफरचंद
B. गाजर
C. केळी
D. संत्री
8. सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे?
A. साबरमती
B. कृष्णा
C. माहि
D. नर्मदा
9. ……. यांनी भारतीय क्रांतीकारांचा वाट चुकलेले तरुण असा निषेध केला होता?
A. महात्मा गांधी
B. ऍलन ह्यूम
C. ॲनी बेझंट
D. गो. कृ. गोखले
10. ……… या प्रकारच्या वाऱ्यांमुळे जम्मू काश्मीरमध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो?
A. ईशान्य मान्सून
B. प्रतिरोध
C. आवर्त
D. प्रत्यावर्त
11. ‘बल्लारपूर’ हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?
A. सिमेंट
B. कागद कारखाना
C. साखर
D. अभयारण्य
12. ताशकन्द कराराने कोणत्या युध्दाची समाप्ती झाली?
A. 1962 चे भारत-चीन युद्ध
B. 1965 चे भारत-पाकिस्तान युद्ध
C. 1971 चे भारत-पाकिस्तान युद्ध
D. 1999 कारगिल युद्ध
13. भारत हा भारतीयांचाच ही घोषणा कोणी दिली?
A. स्वामी विवेकानंद
B. स्वामी दयानंद सरस्वती
C. रामकृष्ण परमहंस
D. वि दा सावरकर
14. कोणत्या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी स्वराज करंडक जिंकला आहे ?
A. नागपूर
B. सोनभद्र
C. कोल्हापूर
D. कोल्लम
15. नियंत्रक व महालेखापाल यांची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते?
A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. वित्तमंत्री
D. यापैकी नाही
Talathi bharti 2024 question paper in Marathi

16. महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एकूण किती शाळा काढल्या?
A. 1
B. 2
C. 3
D. 4
17. तिपाईमुख डॅम परियोजना कोणत्या राज्यात आहे?
A. पश्चिम बंगाल
B. अरुणाचल प्रदेश
C. मणिपूर
D. आसाम
18. पंजाबचा सिंह ही उपाधी कोणास देण्यात आली?
A. भगतसिंग
B. लाला लजपतराय
C. लाला हरदयाळ
D. सुखदेव
19. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते?
A. राजा राम मोहन रॉय
B. दादाभाई नौरोजी
C. वि. दा. सावरकर
D. वासुदेव बळवंत फडके
20. शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला……. म्हणतात?
A. शब्दरचना
B. शब्दसिद्धी
C. धातु
D. शब्दशक्ती
21. खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे?
A. सह्याद्री माथा
B. कृष्णाकाठ
C. प्रीतीसंगम
D. माझा विरंगुळा
22. भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर कोणत्या शहरात बांधले जाणार आहे ?
A. दिल्ली
B. मुंबई
C. बंगलोर
D. चेन्नई
23. ‘फड सिंचन’ हा पारंपारिक सिंचनाचा प्रकार कोणत्या जिल्ह्यात विशेषता सापडतो?
A. नाशिक
B. भंडारा
C. परभणी
D. सिंधुदुर्ग
24. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?
A. महर्षी धोंडो केशव कर्वे
B. गोपाळ गणेश आगरकर
C. लोकमान्य टिळक
D. महात्मा फुले
25. महर्षी कर्वे यांना भारत सरकारद्वारे कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले?
A. 1966
B. 1955
C. 1988
D. 1954
26. विधवा विवाहास समर्थन देण्यासाठी धर्मशास्त्रातील आधार शोधण्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहून घेतला?
A. जगन्नाथ शंकरशेठ
B. बाळशास्त्री जांभेकर
C. दादोबा पांडुरंग
D. महात्मा फुले
27. पानिपत युद्धामध्ये मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा कोणी परत मिळवून दिली?
A. राघोबादादा
B. माधवराव पेशवे
C. दुसरा बाजीराव
D. नानासाहेब
28. रोजगाराच्या अधिकारासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असलेले कलम कोणते?
A. कलम 40
B. कलम 41
C. कलम 42
D. कलम 43
Talathi question paper in Marathi

30. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते?
१) सेनापती पांडुरंग बापट २) अनुताई वाघ ३) ताराबाई मोडक ४) केशवराव जेधे
A. 2 व 4
B. 1 व 3
C. 1 व 4
D. 2 व 3
31. खालीलपैकी कोणत्या जनावराला लाळ खुरकूत हा रोग होत नाही?
A. म्हैस
B. बैल
C. शेळी
D. कुत्रा
32. कोणता नेत्रदोष नेत्र काहीसे लांब होण्यामुले उद्भवतो?
A. केवळ निकटदृष्टिता
B. केवळ दूरदृष्टीता
C. रंगआंधळे
D. वृद्धदृष्टीता
33. राजश्री शाहू महाराजांनी “क्षात्रजगद्गुरू” या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली?
A. गंगाधर कळंबे
B. सदाशिव लक्ष्मण पाटील
C. नारायण भटजी
D. दत्तोबा साळवी
34. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना कोणत्या दिवसापासून सुरू करण्यात आली?
A. 1 जानेवारी 1999
B. 1 एप्रिल 1999
C. 1 मे 1998
D. 1 ऑगस्ट 1998
35. राज्यसभेतील……. सदस्य हे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात?
A. 238
B. 248
C. 150
D. 138
36. आर्य महिला समाज……. ची शाखा होती?
A. सत्यशोधक समाज
B. ब्राम्हो समाज
C. प्रार्थना समाज
D. आर्य समाज
37. महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना कोणी केली?
A. भाऊराव पाटील व शंकरराव पाटील
B. नाना पाटील दत्ता देशमुख
C. केशवराव जेधे व शंकरराव देशमुख
D. कर्मवीर भाऊराव पाटील व पंजाबराव देशमुख
38. हेबियस कॉपर्स म्हणजेच……. होय?
A. बंदीप्रत्यक्षीकरण
B. प्रतिशेद
C. परमदेश
D. अधिकारपृच्छा
39. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता?
A. सन 1916
B. सन 1918
C. सन 1919
D. सन 1920
40. संविधानाच्या…… मध्ये भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक संघराज्य आहे असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे?
A. प्रस्तावना
B. घटना
C. उद्देश पत्रिका
D. यापैकी नाही
41. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तलावातून जलसिंचन केले जाते?
A. चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया
B. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
C. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा
D. चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा
42. संपूर्ण स्वराज्याचा उठाव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?
A. लखनऊ
B. मुंबई
C. लाहोर
D. सुरत
43. राजकारणात अध्यात्मिकरण या गो. कृ. गोखले यांच्या विचारासंबंधी कोणते विधान चूक आहे?
A. राजकारण हे प्रतिष्ठेचे क्षेत्र मानले जावे
B. सार्वजनिक जीवनातील पवित्र व शुद्धता यावर भर दिला जावा
C. घटनात्मक व सनदशीर मार्गाचा अवलंब
D. राजकारणात यशस्वी होणे महत्वाचे साधन कोणतेही चालेल
44. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने औद्योगिक धोरण पहिल्यांदा ……… यावर्षी मान्य केले?
A. 1949
B. 1948
C. 1950
D. 1952
45. घटकराज्याच्या राज्यपालाला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी कोणाची नेमणूक राज्यपाल करतो?
A. सोलीसीटर जनरल
B. अँटनी जनरल
C. महाधिवक्ता
D. यापैकी नाही
Talathi bharti question paper in Marathi

46. संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला?
A. 1950
B. 1952
C. 1955
D. 1958
47. मुक्त शाळा म्हणजे…… होय?
A. शालेय शिक्षण अर्धवट राहिल्यांसाठी शाळा
B. गावाबाहेरची शाळा
C. भिंती नसणार्या शाळा
D. शिस्तीचा बाऊ नसलेल्या शाळा
48. बिहार राज्यातील चंपारण व हजारीबागजवळ ………… च्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत?
A. मॅग्नीज
B. अभ्रक
C. तांबे
D. लोखंड
49. पाचमुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ कोणता?
A. पंच म्हणेल तो निर्णय
B. पाच मुखाचा देव
C. पंच दैवत
D. पुष्कळ लोक बोलतात ते खरे मानावे
50. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील साबळी आणि नागभीड या जागा……. साठी प्रसिद्ध आहेत?
A. चादरी
B. रेशमी कपड्यांसाठी
C. पितांबर
D. हातमाग उद्योग
51. संगणकात माहितीची देवाण-घेवाण करण्याबाबत तयार केलेल्या नियमांना काय म्हणतात?
A. मोडेम
B. प्रोसेसर
C. प्रोटोकॉल
D. ब्राउझर
52. लोह व अल्युमिनीयम चे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते?
A. काळी मृदा
B. गाळाची मृदा
C. जांभी मृदा
D. पिवळसर मृदा
53. आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते?
A. हमास
B. इंटरपोल
C. आय. एस. आय
D. यापैकी नाही
54. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत?
A. यवतमाळ
B. रत्नागिरी
C. नागपूर
D. चंद्रपूर
55. पुढीलपैकी कोणता कर १९९८-९९ साली रद्द करण्यात आला?
A. विक्रीकर
B. संपत्ती कर
C. व्यवसाय कर
D. दारूवरील अबकारी कर
56. ‘स्वत: मध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो.’ या अर्थाची म्हण ओळखा.
A. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी
B. उथळ पाण्याला खळखळाट फार
C. आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला
D. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
57. कलम 238 कितव्या भागामध्ये येते?
A. पाचव्या भागात
B. सहाव्या भागात
C. सातव्या भागात
D. आठव्या भागात
58. कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरविण्याचा अधिकार आहे?
A. ४०५
B. ३४५
C. १०९
D. २१०
59. ‘असतील शिते तर जमतील भूते’ या वाक्याचा प्रकार ओळखा?
A. केवल वाक्य
B. संयुक्त वाक्य
C. मिश्र वाक्य
D. यापैकी नाही
60. ‘ससेमिरा लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय?
A. तिखट लागण्याने सुं सुं आवाज करणे .
B. सशाने मिरे खाणे
C. नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे
D. ससा भाजणे,मिरे लावून खाणे
Talathi exam paper in Marathi

61. भारतातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वत…….. आहे?
A. निलगिरी
B. पूर्व घाट
C. विंध्य
D. अरवली
62. पोलीस पाटलाला शिक्षा करण्याचा अधिकार कोणाला आहे?
A. तलाठी
B. ग्रामसेवक
C. पोलीस निरीक्षक
D. तहसीलदार
63. ‘बाळ दररोज शाळेत जातो’ या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा.
A. बाळ दररोज शाळेत जाई
B. बाळ दररोज शाळेत जात होता
C. बाळ दररोज शाळेत गेला.
D. बाळ दररोज शाळेत जात असेल
64. राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरूस्ती कोणते सरकार करते?
A. महानगरपालिका
B. केंद्र सरकार
C. राज्य सरकार
D. जिल्हा परिषद
65. _________ च्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हणतात.
A. ऍसिटाल्डीहाइड
B. मिथिलेटेड स्पिरीट
C. ऍसेटिक आम्ल
D. इथेनॉल
66. तिसरे इंग्रज फ्रेंच युद्ध केव्हा झाले?
A. 1950-55
B. 1959-62
C. 1762-68
D. 1752-59
67. दोन किंवा अधिक घटकराज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद…….. घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली?
A. सातव्या
B. चौथ्या
C. पहिल्या
D. आठव्या
68. महाराष्ट्र दख्खन पठाराची पूर्व पश्चिम लांबी…… किमी आहे?
A. 750
B. 720
C. 700
D. 780
69. केळीमध्ये मुख्य घटक कोणता असतो?
A. प्रथिने
B. ग्लुकोज
C. कर्बोदके
D. मेद
70. सतत १२ तास दिवस व १२ तास रात्र कोठे असते?
A. विषुववृत्त
B. मकरवृत्त
C. कर्कवृत्त
D. अंटार्टिका
71. ………… हा एकमेव अधातू विद्युत वाहक आहे?
A. सल्फर
B. ग्राफाईट
C. कार्बन
D. बोरॉन
72. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
A. कातडी वस्तु
B. कागद
C. होजीअरी
D. औषधी निर्माण
73. राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होते?
A. विदर्भ
B. पश्चिम महाराष्ट्र
C. मराठवाडा
D. दक्षिण महाराष्ट्र
74. भारतात सर्वात जास्त सरोवर….. या जिल्ह्यात आहेत?
A. श्रीनगर
B. सिमला
C. नैनिताल
D. दार्जीलिंग
75. कावेरी पाणीवाटप वाद कोणत्या दोन राज्यादरम्यात आहे?
A. आंध्रप्रदेश कर्नाटक
B. कर्नाटक मध्य प्रदेश
C. कर्नाटक तामिळनाडू
D. पंजाब हरियाणा
Talathi sarav paper in Marathi

76. नदी या शब्दाचे लिंग कोणते?
A. पुलिंग
B. स्त्रीलिंगी
C. नपुसकलिंगी
D. यापैकी नाही
77. 17 सप्टेंबर 2010 मध्ये कोणत्या दोन देशादरम्यान गोलमेज परिषद संपन्न झाली?
A. भारत-नेपाळ
B. भारत-भूतान
C. भारत-कॅनडा
D. भारत-चीन
78. भंडारा गोंदिया जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहेत?
A. दरकेसा
B. चीरोली
C. अजिंठा
D. वेरूळ
79. 1991 च्या परकीय गुंतवणूक धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत तात्काळ काय बदल झाला?
A. निर्यात वाढली
B. आयात वाढली
C. परकीय गंगाजळीत वाढ झाली
D. औद्योगिक उपक्रमात स्पर्धा निर्माण झाली
80. हुंडा म्हणजे कोणतीही संपत्ती किंवा किंमत रोखवस्तू जी …. दिलेली आहे?
A. विवाहाच्या वेळी
B. विवाहाच्या आधी
C. विवाहानंतर
D. वरील सर्व वेळी
81. महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी महामंडळाचे मुख्यालय……… येथे आहे?
A. पुणे
B. मुंबई
C. नाशिक
D. नागपूर
82. रमन मैगसेसे पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी बहाल केले जाते?
A. 1 जानेवारी
B. 31 ऑगस्ट
C. 1 नोव्हेंबर
D. 10 डिसेंबर
83. कोणत्या जिल्ह्यात भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे?
A. नागपूर
B. चंद्रपूर
C. जळगाव
D. वरील सर्व
84. दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ सर्वोत्कृष्ट सिनेमा कोणता ठरला?
(A) द काश्मीर फाईल्स
(B) आर आर आर
(C) पुष्पा
(D) मिमी
85. सातपुडा पर्वताच्या दक्षिण भागात………. चे पठार आहे?
A. तोरणमाळ
B. पाचगणी
C. महाबळेश्वर
D. साल्हेर
86. भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता?
A. नाग
B. अर्जुन
C. अजय
D. विजयंता
87. डोळे निवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?
A. बरे वाटणे
B. स्वच्छ दिसणे
C. समाधान होणे
D. इच्छा पूर्ण करणे
88. महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार त्यांच्या कोणत्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दिला गेला?
A. अस्पृश्यता निवारण
B. संतति नियमन
C. प्रौढ शिक्षण
D. महिला शिक्षण
89. दारूच्या सातत्याने मनुष्याच्या शरीरातील कोणत्या संस्थेवर परिणाम होतो?
A. पचनसंस्था
B. मज्जासंस्था
C. रक्ताभिसरण संस्था
D. श्वसन संस्था
90. उत्तर अमेरिका खंड व दक्षिण अमेरिका खंड यांच्या दरम्यान कोणता कालवा आहे?
A. किल
B. सुएज
C. पनामा
D. जिब्राल्टर
Talathi bharti online test in Marathi

91. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे?
A. जांभी
B. रेगूर
C. गाळाची
D. वरीलपैकी नाही
92. स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम कोणत्या बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले?
A. रिझर्व बँक ऑफ इंडिया
B. आयसीआयसीआय बँक
C. पंजाब नॅशनल बँक
D. स्टेट बँक ऑफ इंडिया
93. राष्ट्रीय महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्ष कोण आहेत?
A. ममता शर्मा
B. रेखा शर्मा
C. पूर्णिमा अडवानी
D. गिरिजा व्यास
94. लोकसभेला एकदाही सामोरे न गेलेले पंतप्रधान कोण?
A. मोरारजी देसाई
B. लाल बहादूर शास्त्री
C. चौधरी चरण सिंग
D. इंदिरा गांधी
95. ब्रिटिश शासनाकडून केसर-ए-हिंद हि पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?
A. सरोजिनी नायडू
B. अरुणा असफ अली
C. पंडिता रमाबाई
D. आनंदीबाई जोशी
96. जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणी केली?
A. वॉरन हेस्टिंग्ज
B. लॉर्ड वेलेस्की
C. लॉर्ड कॉर्नवालीस
D. लॉर्ड विल्यम बेटिंग
97. प्राथमिक शिक्षणावर माझी भर आहे तरी माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही असे कोण म्हणाले?
A. महात्मा फुले
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. छत्रपती शाहू महाराज
D. राजा राम मोहन रॉय
98. खडकवासला विधानसभा मतदार संघ हा कोणत्या लोकसभा मतदार संघाचा भाग आहे?
A. पुणे
B. बारामती
C. सातारा
D. मावळ
99. नासाने पाठवलेल्या ‘क्युरिऑसिटी’ या यानाने मंगळाच्या केलेल्या अध्यायानानुसार मंगळ ग्रह मुख्यतः कोणत्या वायू पासून बनलेला आहे?
A. नायट्रोजन
B. पाण्याची वाघ
C. आरगॉन
D. कार्बन डाय-ऑक्साइड
100. 24 ते 36 या दरम्यानच्या विषम संख्यांची सरासरी किती?
A. 26
B. 28
C. 30
D. 32
101. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?
A. अति पर्जन्याचा प्रदेश
B. ओल्या दुष्काळाचा प्रदेश
C. पर्जन्य छायेचा प्रदेश
D. तराई
102. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री प्रधानसचिव पदी कोणाची निवड झाली ?
(A) सीताराम कुंटे
(B) ब्रिजेश सिंह
(C) सुबोध जैस्वाल
(D) राजीव कुमार
103. जो देशासाठी मरतो तो – दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा?
A. हुतात्मा
B. शूरवीर
C. सैनिक
D. जवान
104. रक्ताच्या एका थेंबामध्ये किती पेशी असू शकतात?
A. जवळजवळ दहा हजार रुपये अशी
B. जवळजवळ एक लाख पेशी
C. जवळ जवळ दहा लाखापेक्षा जास्त पेशी
D. जवळजवळ पंचवीस हजार पेशी
105. पुणे करार कोणत्या दोन नेत्यांच्या दरम्यान झाला?
A. बाबासाहेब आंबेडकर- महात्मा गांधी
B. वि रा शिंदे- महात्मा गांधी
C. बाबासाहेब आंबेडकर- पंडित नेहरू
D. बाबासाहेब आंबेडकर- बॅरिस्टर जिन्हा
Talathi exam question paper in Marathi

106. अमरावती जिल्ह्यातील सिभोरा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?
A. पूर्णा
B. वर्धा
C. शहानुर
D. गंगा
107. घटना समितीच्या कार्यपद्धतीचा स्पष्ट उल्लेख…… योजनेत होता?
A. कॅबिनेट मिशन
B. वेल्ल योजना
C. ऑगस्ट घोषणा
D. राजाजी योजना
108. महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित कोणाचे नाव सांगता येईल?
A. सेनापती बापट
B. श्रीपाद डांगे
C. लालसी पेंडसे
D. अच्युत पटवर्धन
109. खालीलपैकी कोणत्या लेखामध्ये अशोकाच्या कलिंगा युद्धाचा उल्लेख आढळतो?
A. स्तंभलेख – एक
B. स्तंभलेख – सात
C. शिलालेख – अकरा
D. शिलालेख – तेरा
110 कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरु केली?
A. 1892
B. 1909
C. 1919
D. 1935
111. खालीलपैकी कोणते बंदर मलेशिया देशाशी संबंधित नाही?
A. ब्रूनेई
B. मलाया
C. सेहाद
D. सारवाक
112. CONTRACTOR या अक्षरात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती?
A. C,T
B. C,O,T
C. C,T,R
D. C,O,T,R
113. हैदराबाद संस्थानांमध्ये……. यांनी स्टेट काँग्रेसतर्फे जनतेच्या लढ्याचे नेतृत्व केले?
A. बी राम कृष्णराव
B. वल्लभ भाई पटेल
C. नानासाहेब गोरे
D. स्वामी रामानंद तीर्थ
114. लोकलेखा समितीचे……. सदस्य लोकसभेतून आणि……. सदस्य राज्यसभेतून निवडले जातात?
A. 15,7
B. 7,15
C. 17,5
D. 5,17
115. भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी कोठे स्थापन करण्यात आली आहे?
A. मुंबई
B. पोर्ट ब्लेअर
C. चेन्नई
D. विशाखापटनम
116. जांगमू धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
A. ब्रह्मपुत्रा
B. गंगा
C. सिंधू
D. सेलम
117. आर्यभट्ट: खगोलशास्त्रज्ञ :: सुश्रुत: ??
A. गणितशास्त्रज्ञ
B. औषधशास्त्रज्ञ
C. राज्यशास्त्रज्ञ
D. अर्थशास्त्रज्ञ
118. कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली?
A. ग्राम न्यायालय कायदा 2009
B. ग्राम न्यायालय कायदा 2008
C. ग्राम न्यायालय कायदा 2010
D. भारतीय न्यायालय कायदा 1949
119. 104 वर्षाचे दीर्घायुष्य लाभलेला समाजसुधारक कोण?
A. महर्षी शिंदे
B. सयाजीराव गायकवाड
C. बाबा पदनजी
D. महर्षी कर्वे
120. अडीच एकर पेक्षा कमी धारण क्षेत्र असलेल्या व्यक्तींना………. शेतकरी म्हणतात?
A. मध्यम
B. अर्ध-मध्यम
C. लघु
D. सीमांत
Talathi exam previous year question paper

121. बंगाल एशियाटिक सोसायटी ची स्थापना केव्हा करण्यात आली?
A. 1780
B. 1791
C. 1795
D. 1784
122. खालीलपैकी कोणत्या राजाने विक्रमादित्य नाव धारण केले होते ?
A. चंद्रगुप्त – 1
B. चंद्रगुप्त – 2
C. समुद्रगुप्त
D. हर्षवर्धन
123. 1899-1900 या काळात कोणाच्या नेतृत्वाखाली मुंडा या वन्य जमातीने उठाव केला होता?
A. बिरसा मुंडा
B. राणी चन्नम्मा
C. जमीनदार
D. बेल्लू थप्पी
124. अर्जुन, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न सन्मानाने गौरवण्यात आलेला भारतीय टेनिस खेळाडू कोण?
A. सानिया नेहवाल
B. लिएंडर पेस
C. महेश भूपती
D. सानिया मिर्झा
125. जर डॉक्टरांनी तुम्हाला चार गोळ्या दर अर्ध्या तासाने एक, याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?
A. दोन तास
B. दोन तास तीस मीनीट
C. एक तास तीस मिनिटे
D. एक तास
126. कानडी शब्द ओळखा?
A. पीठ
B. किल्ली
C. भाई
D. यापैकी कोणतेही नाही
127. राष्ट्रीय युवक दिन कोणाचा जयंती दिवशी व कधी साजरा केला जातो?
A. नेताजी सुभाष चंद्र बोस, 23 जानेवारी
B. स्वामी विवेकानंद, 12 जानेवारी
C. राजीव गांधी, 20 ऑगस्ट
D. पंडित नेहरू, 14 नोव्हेंबर
128. एम.सी. मेरी कोम कोणत्या राज्याची आहे?
A. मणिपूर
B. आसाम
C. मिझोराम
D. मेघालय
129. बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत?
A. शेख अखतर शेख अब्दुल
B. शेख मुजीब-उर-रहमान
C. पठाण अखतर
D. यापैकी नाही
130. भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेला शहर कोणता आहे?
A. मुंबई
B. नवी दिल्ली
C. कोलकाता
D. पंजाब
131. राष्ट्रकुल संघटनेतून निलंबित करण्यात आलेला देश कोणता?
A. पाकिस्तान
B. श्रीलंका
C. व्हिएतनाम
D. फिजी
132. मुघल सम्राट औरंगजेबाने संभाजीचा मुलगा शाहू आणि त्याचा आईला कुठे कैदी ठेवले?
A. खानदेश
B. सातारा
C. मेवाड
D. अवध
133. निर्यात वृद्धी मंडळ पुढीलपैकी कोणते कार्य पार पडते?
A. निर्यात सल्ला व बाजारपेठ संशोधन
B. परकीय बाजारपेठत जाहिरात करणे
C. प्रदर्शने भरविणे
D. वरील सर्व
134. ‘कालगती लावणारा, तंटे उत्पन्न करणारा माणूस’ याअर्थी पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार आहे?
A. खप्पीदास
B. कळीचा नारद
C. गोमाजी तिमाजी
D. यापैकी नाही
135. विरुद्धार्थी शब्द ओळखा- सुज्ञ
A. तज्ञ
B. अज्ञान
C. अडाणी
D. अज्ञ
GK questions for talathi exam in Marathi
136. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदरातून जपानला खालील धातूंपैकी कोणत्या धातूची निर्यात होते?
A. लोहखनिज
B. लोह खनिज, मॅग्नीज
C. लोह खानिज, बॉक्साईट
D. वरील सर्व
137. राजा रविवर्मा हे कोण होते?
A. गायक
B. चित्रकार
C. वैज्ञानिक
D. खेळाडू
138. सिल्वर क्रोमाइट चा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात?
A. साबण
B. छायाचित्रण
C. पाण्यासाठी
D. इंधन
139. ………….. हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत?
A. ना. सी. फडके
B. वि. स. खांडेकर
C. कुसुमाग्रज
D. रणजित देसाई
140. कारगिल कोणत्या राज्यात आहे?
A. जम्मू आणि काश्मीर
B. हिमाचचल प्रदेश
C. उत्तराखंड
D. पंजाब
141. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण?
A. टी. शोषन
B. सुकुमार सेन
C. हिरालाल कानिया
D. सरोज कपाडिया
142. सांगली जिल्ह्यातील ‘चांदोली धरण’ कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
A. कोयना
B. वारणा
C. कृष्णा
D. गोदावरी
143. रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या यादीनुसार देशात कोणते रेल्वे स्टेशन सर्वाधिक उत्पन्न देते ?
(A) मुबंई
(B) दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई
144. वि. रा. शिंदे यांना महर्षी हि पदवी कोणी दिली ?
A. अस्पृश्य जनता
B. राष्ट्रीय मराठा संघ
C. सर्वसामान्य जनता
D. राष्ट्रीय बहुजन संघ
145. केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे?
A. मध्य प्रदेश
B. उत्तर प्रदेश
C. उत्तराखंड
D. ओडिसा
146. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आता……. पर्यंत वाढविले आहे?
A. सन 2050
B. सन 2055
C. सन 2060
D. सन 2070
147. कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे…….. या खड्यांनी निश्चित केली आहे?
A. डहाणू व तेरेखोलची खाडी
B. वसई व तेरेखोलची खाडी
C. दातिवऱ्याची व कर्लीची खाडी
D. वसईची व कर्लीची खाडी
148. रणजीत सिंह बरोबर 1809 मध्ये कोणता तह इंग्रजांनी केला?
A. अमृतसरचा तह
B. चंदीगड तह
C. दिल्ली तह
D. लाहोर तह
149. विनोबा भावे यांनी गीता प्रवचने कोणत्या तुरुंगात असताना लीहली?
A. अहमदनगर
B. येरवडा
C. धुळे
D. ऑर्थर रोड
150. खालीलपैकी कोणता दिवस हा ‘महाराष्ट्र राज्य मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो?
A. ५ जुलै
B. २५ जानेवारी
C. २६ नोव्हेंबर
D. ६ जून
Question for you
भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात?
A. एडमायर
B. जनरल
C. मेजर जनरल
D. एअर चीफ मार्शल
तुम्हाला जर का या वरील प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
तर विद्यार्थीमित्रांनो Talathi exam question paper in Marathi च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांबद्दल तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर समजले नसेल किव्हा तुमच्या काही शंका असतील तलाठी भरती परीक्षेसंबंधी तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
हे देखील वाचा
genral
जनरल
Ganral