स्कॉलरशिप परीक्षा । 8 Best Scholarship Exam in India in Marathi

नमस्कार मित्रांनो, आपण एका अशा देशामध्ये राहतो जिथे परीक्षेला फार महत्व दिले जाते, आणि जिथे परीक्षा तिथे स्पर्धा ही असतेच. मग ती प्रवेश परीक्षा असो किंवा शिष्यवृत्ती परीक्षा. मित्रांनो जेव्हा आपण भारता मधल्या स्पर्धा परीक्षाबद्दल बोलतो तेव्हा हे आकडे नेहमीच अविश्वसनीय उंची गाठतात. 12वी किंवा इतर परीक्षा पास करणारे विद्यार्थी मुख्यतः इंजीनियरिंग किंवा मेडिकल कॉलेजसाठी ऍडमिशन घेतात.

तर आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला महत्वपूर्ण अशा scholarship परीक्षांबद्दल माहिती सांगणार आहोत. हा लेख तुमच्या सगळ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे मग तुम्ही आठवी मध्ये असो किंवा मग बारावी मध्ये असो किंवा तुम्ही कॉलेज मध्ये असो. शिष्यवृत्तीसंबंधी सर्व माहिती साठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

बऱ्याचश्या विद्यार्थ्यांना ही शंका असते की कोण-कोणती स्कॉलरशिप भारत सरकार प्रदान करते, त्याचबरोबर पुढील शिक्षणासाठी कोणती स्कॉलरशिप आपल्याला योग्य आहे, अशा विविध शंका विद्यार्थ्यांच्या मनात येत असतील. तर आज आम्ही तुम्हाला याच top best 10 scholarship बद्दल माहिती सांगणार आहोत ज्याचे तुम्हाला अनेक फायदे आहेत.

8 Best Scholarship Exam in Marathi

अशा प्रकारच्या खूप सार्‍या स्कॉलरशिप आहेत ज्यासाठी तुम्हाला एक्झाम द्यावी लागते. तर सर्वप्रथम आपण भारतामध्ये असणाऱ्या टॉप स्कॉलरशिप एक्झाम बद्दल जाणून घेऊया,

1. CSIR (इनोवेटिव अवॉर्ड फॉर स्कूल चिल्ड्रन) CIASC

कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, ज्याला आपण CSIR म्हणतो, ज्या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, त्यांच्या स्कॉलरशिपसाठी एक स्पर्धा परीक्षा ठेवली जाते . या शिष्यवृत्तीसाठी जी परीक्षा किंवा टेस्ट घेतली जाते, ती नेमकी कशी असते? यामध्ये आपल्याला काय करावे लागते? या परीक्षेसाठी तुम्ही स्वतः किंवा स्वतःचा ग्रुप बनवून देखील भाग घेऊ शकता. या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी यापैकी एक भाषा निवडून पार्टिसिपेट करू शकता.

या परीक्षेसाठी काय करावे लागेल?

या स्पर्धेसाठी मुलांनी Science आणि Technology संबंधित असलेल्या त्यांच्या अनोख्या कल्पना त्यांच्या प्रस्तावात दाखवायच्या आहेत. तुम्ही अशा अनेक गोष्टी पाहिल्या असतील, की ज्या पाहून तुम्हाला वाटलं असेल की त्यात काहीतरी नाविन्य आणायला हवे किंवा त्यात बरेच बदल व्हायला हवेत आणि अनेक पद्धती शोधायला हव्यात. तुम्ही शोध लावला की नाही हे गरजेचे नाही, फक्त तुमच्याकडे ती आयडिया असायला हवी ज्यामुळे दुनियेमध्ये परिवर्तन घडू शकते.

अशा प्रकारच्या युनिक आयडिया आज जर तुमच्याकडे देखील असतील तर तुम्ही सुद्धा या युनिक स्कॉलरशिप मध्ये सहभागी होऊ शकता.तुमची आयडिया तुम्हाला लिखित स्वरूपात हिंदीमध्ये किंवा इंग्रजी भाषेमध्ये शेअर करावी लागते. जी तुम्ही स्वतः किंवा तुमचा ग्रुप बनवून देखील देऊ शकता. या स्पर्धेमध्ये जर तुमची आयडिया सिलेक्ट झाली तर तुम्हाला भारत सरकारकडून जवळपास एक लाख रुपये रक्कम स्कॉलरशिप म्हणून दिली जाते, त्याचबरोबर इतर प्रकारचे अवॉर्ड्स देखील तुम्हाला मिळतात.

यांची वेबसाइट आहे – https://acsir.res.in/

या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही या स्पर्धेमध्ये पार्टीसिपेट करू शकता, त्याचबरोबर इतर अनेक प्रकारची माहिती तुम्हाला या website वर मिळून जाईल.

2. NTSE (नॅशनल टॅलेंट सर्च एग्जाम):

आता आपण दुसऱ्या शिष्यवृत्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचं नाव आहे (नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम) NTSE. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी या स्कॉलरशिप बद्दल ऐकले किंवा वाचले असेल. जे विद्यार्थी इयत्ता दहावी मध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप दिली जाते.

या परीक्षेसाठी तुम्हाला काय करावे लागेल ?

ही परीक्षा एनसीईआरटी (NCERT) कंडक्ट करते. इयत्ता दहावी मध्ये चांगल्या मार्काने पास झालेल्या मुलांची एक्झाम एनसीईआरटी घेते. म्हणजेच दहावीत शिकणारी मुलं किती हुशार आहेत आणि त्यांना त्यांच्या विषयाचे किती चांगले ज्ञान आहे, हे तपासण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. जेणेकरून पुढे अकरावी किंवा बारावीला गेल्यानंतर या मुलांना थोडी प्रेरणा घेता यावी.

जे विद्यार्थी दहावीमध्ये टॉप करतात, खास त्या मुलांसाठी ही स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली जाते, त्यामुळे पुढे अकरावी किंवा बारावी साठी त्यांना कसलीच चिंता करायची गरज नाही. जर तुम्ही ही परीक्षा चांगल्या मार्कांनी पास करता, तर तुम्हाला या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येऊ शकतो. NTSE – नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम ऑल ओव्हर इंडिया लेवल त्याचबरोबर स्टेट लेवलला ही परीक्षा घेते.

ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी, तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. या परीक्षेसाठी तुम्हाला इतर कोणत्याही विषयाचा वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही जे तुम्ही इयत्ता दहावी मध्ये शिकलेले आहात, त्याच बेसिसवर तुमची एक्झाम घेतली जाते, या परीक्षेमध्ये MCQ टाईप प्रश्न विचारले जातात.

याची वेबसाईट आहे – https://ncert.nic.in/

या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला या परीक्षेबद्दलची सर्व माहिती मिळेल, त्याचबरोबर एक आणखी खास गोष्ट म्हणजे ह्या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम देखील तुम्हाला सांगितला जाईल.

3. SAST (सरस्वती अकॅडमी स्कॉलरशिप टेस्ट )

ही scholarship मिळवण्यासाठी तुम्हाला सरस्वती अकॅडमी स्कॉलरशिप टेस्ट पास करावी लागते. जे विद्यार्थी इयत्ता दहावी मध्ये शिकत आहेत किंवा दहावी पास झालेले आहेत ते ही परीक्षा देऊन scholarship शिष्यवृत्ती मिळवू शकतात.

यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?

ह्या स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्तीनुसार तुम्हाला तुमच्या रँक नुसार शिष्यवृत्ती दिली जाईल. जेवढा वरती तुमचा क्रमांक येईल तेवढी जास्त अमाऊंट तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला पहिला रँक मिळाला तर सगळ्यात जास्त अमाऊंट तुम्हाला मिळेल आणि जर दुसरा किंवा तिसरा आला तर त्यापेक्षा कमी अमाऊंट ची स्कॉलरशिप तुम्हाला दिली जाईल.

SAST या परीक्षेमध्ये तुम्हाला MCQ टेस्ट द्यावी लागेल. त्याचबरोबर हायर एज्युकेशन साठी तुम्हाला मोटिवेट केले जाते. या परीक्षेसाठी Apply करताना तुमच्याकडून 200 रुपये फीज घेतली जाईल त्याचबरोबर या टेस्टसाठी Negative Marking नसते.

याची वेबसाईट आहे – https://academy.saraswationline.com/

वरील वेबसाईटवर जाऊन तुम्ही 200 रुपये फीस देऊन, या स्कॉलरशिप साठी अप्लाय करू शकता.

4. Jio Scholarship

ही scholarship फक्त दहावी, अकरावी आणि बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना फायनान्सिंग सपोर्ट सुद्धा करते.

Jio Scholarship
Jio Scholarship

 

यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ?

ही शिष्यवृत्ती CSR (Corporate social responsibility) च्या उद्देशाने रिलायन्स जिओ इन्फो कॉम लिमिटेड द्वारे प्रोव्हाइड केली जाते. या scholarship मध्ये एक अशी कॅटेगरी आहे ज्यामध्ये जर तुम्ही आर्थिक दृष्ट्या कमजोर असाल तर पुढील शिक्षणासाठी तुम्ही जिओ स्कॉलरशिप चा फॉर्म भरून पुढच्या शिक्षणासाठी प्रयत्न करू शकता. यासाठी तुम्हाला 80 टक्के मार्क्स असणे गरजेचे आहे.

याची वेबसाईट आहे: https://jioprime.org/jio-schol

या वेबसाईटवर जाऊन तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरू शकता, त्याचबरोबर पुढील शिक्षणासाठी जर तुम्हाला आर्थिक मदत हवी असेल तर जिओ स्कॉलरशिप तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

5. KVPY (किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना )

ही, scholarship भारत सरकारद्वारे प्रदान केली जाते. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना ही स्कॉलरशिप अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ?

भारत सरकारमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, दरवर्षी ही शिष्यवृत्ती आयोजित करतो. या शिष्यवृत्तीमध्ये तुमच्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोन आहे की नाही, तुम्ही भविष्यात शास्त्रज्ञ होऊ शकता की नाही, तुम्ही देशाच्या समस्या सोडवू शकता की नाही, तुम्ही देशात मोठे शोध लावू शकता की नाही हे पाहिले जाते.

जो तरुण वर्ग आहे त्यांच्यातील कुशलता आणि बुद्धिमत्ता तपासण्यासाठी भारत सरकार ही टेस्ट घेते ज्याला आपण KVPY (किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना) असे म्हणतो.

प्रामुख्याने यासाठी भारतीय सरकार एक टेस्ट घेते ज्यामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले, तर भारतीय सरकार तुमच्या पुढील शिक्षणासाठी एक जबरदस्त शिष्यवृत्ती प्रोव्हाइड करते. जर तुम्हाला भविष्यामध्ये पीएचडी करायची असेल, मास्टर्स करायचे असेल किंवा Science या विषयाचा अगदी सखोल अभ्यास करायचा असेल तर ही स्कॉलरशिप तुमच्यासाठी बेस्ट आहे. यासाठी तुम्हाला पैशांची अजिबात गरज भासणार नाही.

या स्कॉलरशिपसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग भाग घेत असतो.

Kishore Vaigyanik Protsahan Yojana (KVPY)

वरील वेबसाईटला भेट देऊन तुम्ही या scholarship बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

6. MHRD ( National means cum-merit scholarship)

ही scholarship ( शिष्यवृत्ती ) अशा विद्यार्थ्यांना दिली जाते ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. त्याचबरोबर जे विद्यार्थी अभ्यासामध्ये तरबेज आहेत अशांना ही स्कॉलरशिप दिली जाते. इयत्ता आठवी नंतर तुम्ही या scholarship चा लाभ घेऊ शकता. दरवर्षी जवळपास १ लाखाहून आधक विद्यार्थ्यांना MHRD कडून स्कॉलरशिप दिली जाते. प्रति वर्ष रुपये 12000 इतकी रक्कम तुम्हाला स्कॉलरशिपच्या स्वरूपात दिली जाते.

ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी तुम्ही ऑगस्ट ते ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये फॉर्म भरू शकता. हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन देखील भरू शकता. ही स्कॉलरशिप प्राप्त करण्यासाठी तुम्हाला इयत्ता आठवी मध्ये कमीत कमी 80% मार्क्स असणे गरजेचे आहे. जर यापेक्षा कमी मार्क्स असतील तर तुम्ही ह्या स्कॉलरशिप ची टेस्ट देऊ शकणार नाही.

याची वेबसाईट आहे – https://nsp.gov.in/

या स्कॉलरशिप शी संबंधित सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल.

7. प्रो मॅट्रिक अँड पोस्ट मॅट्रिक Scholarship

या स्कॉलरशिप ला दोन भागांमध्ये वेगळे केलेले आहे. ही शिष्यवृत्ती तुम्ही दोन प्रकारे प्राप्त करू शकता. सर्वप्रथम इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी या स्कॉलरशिप मध्ये सहभागी होऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण करायचे आहे, ते ह्या scholarship मध्ये सहभागी होऊ शकतात.

यानंतर दुसरा प्रकार म्हणजे अकरावी किंवा बारावीचे विद्यार्थी या स्कॉलरशिप मध्ये सहभागी होऊ शकतात. आपल्या देशातील मायनॉरिटी कम्युनिटी जसे की मुस्लिम, बुद्धिस्ट, ख्रिश्चन आणि पारसी विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपमध्ये सहभाग घेता येतो. ही स्कॉलरशिप अशा विद्यार्थ्यांना दिली जाते ज्यांच्या फॅमिली चे वार्षिक उत्पन्न एक लाखांहून कमी आहे. असे विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी अप्लाय करू शकतात.

ह्या Scholarship ची वेबसाईट आहे – https://scholarships.gov.in/

8. सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप स्कीम

कॉलेज आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप स्कीम सुरू करण्यात आली आहे. यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ह्या स्कॉलरशिप संबंधित सर्व माहिती तुम्हाला खालील वेबसाईटवर मिळेल. ऑनलाइन अर्ज करून तुम्ही स्कॉलरशिप चा फॉर्म भरू शकता.

याची वेबसाईट आहे- Scholarship.gov.in

आम्ही आशा करतो की हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल, वरील माहिती वाचून तुम्ही विविध scholarships चा लाभ घेऊ शकता. काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

धन्यवाद.

हे देखील वाचा

What is Sponsorship in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment