Aditya L1 mission Information in Marathi | आदित्य एल 1 मिशन काय आहे?

Aditya L1 mission Information in Marathi | आदित्य एल 1 मिशन काय आहे?

Aditya L1 mission Information in Marathi सध्या बहुचर्चित असलेला , भारताचा सर्व प्रथम सौर मोहीम किंव्हा सौर मिशन म्हणजे आदित्य L1 मिशन. तर नक्की काय आहे हे आदित्य L1 मिशन? त्याची संपूर्ण माहिती , प्रक्षेपण तारीख, बजेट, फुल फॉर्म, ते कधी लॉन्च होणार, इस्रो या सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती. (What is ADITYA-L1 Mission, Suryayaan 1 Mission in marathi , what is Launch Date of Aditya l1 mission in marathi, Launch Time, Mission ISRO all information in marathi)

आदित्य L1 मिशन बद्दल जाणून घेन्याआधी ISRO (इसरो ) या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

Information About ISRO In Marathi । इसरो बद्दल माहिती  2024

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारत सरकारची आघाडीची अंतराळ संशोधन संस्था आहे, ज्याचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. 1969 मध्ये ग्रहांचा शोध आणि अवकाश विज्ञान संशोधनाचा पाठपुरावा करून राष्ट्रीय विकासासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा विकास आणि वापर करण्याच्या दृष्टीकोनातून इस्रोची स्थापना करण्यात आली.

आदित्य L १ मिशन बद्दल संपूर्ण माहिती 
आदित्य L १ मिशन बद्दल संपूर्ण माहिती

ISRO, पूर्वी भारतीय अंतराळ संशोधन समिती (INCOSPAR) म्हणून ओळखले जात असे, 1962 मध्ये डॉ. विक्रम साराभाई यांच्या सूचनेनुसार, अवकाश संशोधनाची गरज ओळखून जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली. INCOSPAR विकसित झाले आणि 1969 मध्ये अणुऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत ISRO (Indian Space Research Organization- ISRO) बनले.

Information About ISRO Aditya L १ Mission In Marathi । आदित्य L १ मिशन बद्दल संपूर्ण माहिती 

भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा विश्वातील पहिला देश आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पोहोचून तिथेच न थांबून आता भारत देश आपले पाऊल खूप पुढे टाकत आहे. आता इस्रो (ISRO) या संस्थेद्वारे सूर्यावर पोहोचण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लवकरच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन सूर्याच्या अभ्यासासाठी एक महत्त्वपूर्ण मिशन आदित्य-एल 1 (Aditya-L1) प्रक्षेपण केले आहे.

चांद्रयान ३ मिशन पूर्ण झाल्यानंतर, भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांना आणि देशातील जनतेला संबोधित केले आणि या संभाषण दरम्यान माननीय नरेंद्र मोदी यांच्याद्वारे इसरो मधून येणाऱ्या पुढील मिशन बद्दल माहिती देखील जनतेपर्यंत पोहोचवण्यात आली आहे, या अंतर्गत इस्रोच्या वैज्ञानिकांद्वारे सूर्यावर पण संशोधन केले जाईल असे मोदींनी भारतालाच नव्हे तर जगाला देखील सांगितले आहे. आणि सांगितल्या प्रमाणे २ सप्टेंबर २०२३ रोजी भारताचे पहिले सौर मिशन लाँच करण्यात आले ज्याचे नाव आहे आदित्य L १.
दरम्यान, एवढ्या गरम ग्रहावर इस्रो आपले मिशन आदित्य एल-१ कसे यशस्वी करणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. चला मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर  माहिती .

 

इसरो आदित्य-एल 1 मिशन काय आहे ? ( What Is ISRO Aditya-L1 mission In Marathi )

आदित्य-एल 1 सूर्ययान मिशन काय आहे? ISRO SOLAR MISSION Information In Marathi 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले अंतराळ यान यशस्वीपणे उतरवल्यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांची पुढील योजना सूर्यावर विजय मिळवण्याची असून त्यासाठी काही काळानंतर मोहीम प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मिशनला आदित्य एल1 असे नाव देण्यात आले आहे. या मिशनला सूर्ययान सुद्धा बोलले जात आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांद्वारे या संशोधनाअंतर्गत सूर्याचे कोरोनल मास इजेक्शन चा अभ्यास केला जाणार आहे. याचा अर्थ असा आहे की सूर्यापासून जे आगीचे गोळे निघतात, याच गोष्टीवर इसरो चे वैज्ञानिक अभ्यास व संशोधन करणार आहेत.

आदित्य-एल 1 मिशनचा उद्देश । Aim Of Aditya L १ Mission In Marathi 

अखेर, ISRO द्वारे राबविण्यात येणाऱ्या आदित्य-L1 मोहिमेचा उद्देश जाणून घेण्यासाठी आम्ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे ठरवले आणि आम्ही त्यांच्या वेबसाइटवर पोहोचलो, जिथे आम्हाला माहिती मिळाली की, विविध प्रकारच्या प्रक्रिया सूर्यावर घडतात. वेगवेगळ्या वेळी सूर्याचे वेगवेगळ्या प्रकारचे रिएक्शन होतात, त्यामुळे अचानक भरपूर ऊर्जा निर्माण होते. यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला कोरोनल मास इजेक्शन म्हणतात. वातावरणाव्यतिरिक्त, अंतराळात उपस्थित असलेल्या सर्व उपग्रहांवर देखील त्याचा समान प्रभाव पडतो. या सूर्याच्या कोरोनग्राफी अंतराळ अभ्यास करण्यासाठी आदित्य मिशन लाँच करण्यात आले आहे.
याच सोबत प्रकाशमंडल (Photosphere), क्रोमोस्फीयर (Chromosphere) और सौर पवन (Solar Wind) याबाबदल अंतर्दृष्टी टाकण्याचा हेतू आदित्य l १ मिशन चे आहे .
आता इथे प्रश्न पडतो की, सूर्य इतका तापलेला असताना त्याच्या अगदी जवळ किंवा कमी अंतरावर सॅटॅलाइट कसे बसवले जाईल. तुमच्या माहितीसाठी, याचे उत्तरही सॅटॅलाइट च्या नावातच दडलेले आहे.

आदित्य L1 बिंदू काय आहे:

आदित्य म्हणजे सूर्य आणि L म्हणजे लॅग्रेंज बिंदू . पृथ्वी आणि सूर्य प्रणाली मध्ये एकूण ५ लॅग्रेंज बिंदू आहेत.  L१, L २, L ३, L ४ आणि L ५.

लॅग्रेंज बिंदू काय आहे : Lagrange points Meaning In Marathi 

लॅग्रेंज पॉइंट्स ही अंतराळातील विशेष ठिकाणे आहेत जिथे सूर्य आणि पृथ्वी सारख्या दोन मोठ्या परिभ्रमण करणाऱ्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांना संतुलित करतात. म्हणजे सूर्य आणि पृथ्वीमधील असे अंतर आहे जेथे दोन्ही गोष्टींचे गुरुत्वाकर्षण पूर्णपणे शून्य होते. म्हणजेच सूर्याचे गुरुत्वाकर्षण किंवा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला स्वतःकडे खेचू शकत नाही.

याचा अर्थ असा की एखादी छोटी वस्तू, जसे की अवकाशयाना, तिची कक्षा राखण्यासाठी जास्त इंधन न वापरता या लॅग्रेंज बिंदूंवर राहू शकते. एकूण पाच Lagrange पॉइंट्स आहेत, त्यातील प्रत्येकाची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. हे बिंदू दोन मोठ्या वस्तुमानांमधील स्थिर पॅटर्नमध्ये लहान वस्तुमानाला परिभ्रमण करण्यास सक्षम करतात.

Lagrange points Meaning In Marathi 
Lagrange points Meaning In Marathi

L1 हे एक ठिकाण आहे जिथून सूर्याचा अभ्यास सहज करता येतो, कारण इथे दोन्ही ग्रहांची गुरुत्वाकर्षण शक्ती पूर्णपणे संपते. जर आपण या बिंदूबद्दल बोललो तर, पृथ्वीपासून या बिंदूचे अंतर अंदाजे 15 लाख किलोमीटर आहे. आदित्य यान सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील L1 लॅग्रेंज बिंदूभोवती प्रभामंडल कक्षेत पृथ्वीपासून सुमारे १.५ दशलक्ष किमी अंतरावर स्थापित केले जाईल, जिथे ते सौर वातावरण, सौर चुंबकीय वादळे आणि पृथ्वीभोवतीच्या पर्यावरणावर होणारे परिणाम यांचा अभ्यास करेल. आदित्य-एल1 मिशन

 

सॅटॅलाइट L1 बिंदूवरच का असेल?

कोणतीच सेटलाईट या L1 बिंदूच्या पुढे जाऊ शकत नाही याचे मुख्य कारण असे की, एखादी सॅटॅलाइट L1 कक्षा ओलांडताच सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचे खूप नुकसान होईल, म्हणजेच भारताने चालवलेले आदित्य L1 मिशन या टप्प्यावर राहून सूर्याभोवती फिरणे सुरू करेल व बारकाईने सूर्याचा अभ्यास करेल, कारण हा सर्वात सुरक्षित बिंदू आहे.

आदित्य एल 1 मिशन काय संशोधन करणार?

इस्रो संस्थेद्वारे त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती अशी माहिती दिली आहे की, आदित्य L1 पेलोड अवकाशातील हवामानाची गतिशीलता, कण आणि प्रदेशांचा प्रसार, कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इजेक्शन, प्री-फ्लेअर्स आणि त्यांची वैशिष्ट्ये इत्यादी समजून घेण्यासाठी सर्वात महत्वाची माहिती प्रदान करेल.

ADITYA L1 वर किती पेलोड्स असतील? Payloads Information In Marathi 

आदित्य एल 1 मध्ये किती पेलोड्स अस्तित्वात असतील आपण जर का या गोष्टीवर चर्चा केली तर यामध्ये 7 वेगवेगळे पेलोड्स अस्तित्वात आहेत. हेच पेलोड सूर्या मधून येणाऱ्या किरणांवरती अभ्यास करणार आहेत. यामध्ये विविध प्रकारचे अधिक व खूप जास्त मेगापिक्सल वाले कॅमेरे इसरो संस्थेद्वारे स्थापित करण्यात आले आहेत. 7 पैकी 4 पेलोड्स सूर्याच्या रिमोट सेन्सिंगसाठी काम करतील आणि उर्वरित 3 पेलोड इन-सीटू निरीक्षणात गुंतले जातील.

फक्त सूर्याचा अभ्यास केला जाईल?

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनद्वारे चालवले जाणारे हे मिशन आपल्या देशातील पहिले असे मिशन आहे जे पूर्णपणे केवळ सूर्याच्या अभ्यासासाठी समर्पित असेल. हे अंतराळयान लॅग्रेंज बिंदू 1 येथे स्थित असेल, जो पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील खगोलीय प्रणालीतील एक विशेष बिंदू आहे. या विशेष पॉइंटचे वैशिष्ट्य म्हणजे वेधशाळा चालवण्यासाठी जास्त ऊर्जा लागणार नाही.

आदित्य एल 1 मिशन प्रक्षेपण तिथी:

आदित्य L1 मोहीम ISRO द्वारे यावर्षी 2 सप्टेंबर २०२३ रोजी PSLV-XL लॉन्च व्हेईकल वर प्रक्षेपित केले गेले आहे जे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले गेले.

सूर्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती दिवस लागतील:

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन संस्थेद्वारे जेव्हा चंद्रयान 3 चे प्रक्षेपण केले गेले होते, त्यानंतर प्रक्षेपणानंतर यशस्वीरित्या उतरण्यासाठी सुमारे 40 दिवस लागले. या माहितीनुसार, आदित्य एल1 मिशन 2023 मध्ये 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित केले गेले, परंतु इस्रोच्या मते, सूर्याच्या कक्षेत L1 बिंदूवर पोहोचण्यासाठी सुमारे १२५ दिवस लागतील, कारण पृथ्वीपासून त्याचे अंतर अंदाजे 15 लाख किलोमीटर आहे. आदित्य L1 ला PSLV रॉकेट वापरून प्रक्षेपित केले जाईल.

FAQ

Q. आदित्य L1 मिशन कोणाद्वारे लॉन्च केले गेले आहे?
Ans. Aditya L1 मिशन भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्याद्वारे लॉन्च केले गेले आहे.

Q. आदित्य एल 1 मिशन काय आहे?
Ans. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आले आहे.

Q. आदित्य एल 1 मिशनचे दुसरे नाव काय आहे?
Ans. आदित्य एल 1 मिशनचे दुसरे नाव सूर्य यान आहे.

Q. आदित्य एल 1 मिशन चे कधी प्रक्षेपण झाले?
Ans. आदित्य एल 1 मिशनचे 2 सप्टेंबर 2023 रोजी प्रक्षेपण झाले.

Q. आदित्य एल 1 ला सूर्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल?
Ans. आदित्य एल 1 ला सूर्यापर्यंत पोहोचण्यासाठी १२५ दिवस लागतील.

Q. आदित्य एल 1 मिशन कोणत्या रॉकेटने प्रक्षेपण केले गेले आहे?
Ans. आदित्य एल 1 मिशनचे PSLV या रॉकेट द्वारे प्रक्षेपण केले गेले आहे.

नॅनो तंत्रज्ञान काय आहे । What is Nano Technology in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment