शिक्षणाचे महत्व मराठी निबंध | Importance of Education Essay in Marathi

Importance of Education Essay in Marathi
नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षणाचे महत्व मराठी निबंध /  Importance of Education Essay in Marathi हा निबंध पाहणार आहोत.  शिक्षणाचे महत्व मराठी निबंध हा निबंध आम्ही ८०० शब्दात दिला आहे.

आज आपण शिक्षणाचे महत्व पाहणार आहोत शिक्षण म्हणजे एक प्रकारचे शस्ञ आहे. जर हे शस्ञ तमच्याकडे आले तर तुम्ही त्याचा वापर करून जग जिंकु शकता आणि जर तुमच्याकडे शिक्षण नसेल तर देशाचे अख्खे सैन्य तुमच्या बाजुने दिले तरी तुम्ही जिंकाल याची शक्यता कमीच आहे.

तर सगळ्यात आधी आपण पाहुया जर शिक्षण नसेल तर त्याचे काय कय नुकसान होते आणि शिक्षण नसलेल्या माणसाची आवस्था म्हणजे हात असुन सुद्धा हात नसलेल्या माणसासारखी आसते. 

आपल्या देशात देश स्वातंञ्य झाल्यापासुन गरिबी, फसवणुक , लोकसंख्यावाढ , भ्रष्टाचार , चोर्या , गुंडगिरी या गोष्टी अजुन पण चालु आहेत. देशाला स्वातंञ्य मिळुण 50 वर्ष पुर्ण झाली तरी पण आजही आपला देश या समस्यापासुन सुटू शकला नाही कारण याला मुख्य कारण आहे आपल्या देशातील निरक्षरता. 

कारण जे देश आपल्या मागुन स्वातंञ्य झाले आणि आज त्यांच्या देशात आपल्यापेक्षा जास्त प्रगती झाली आहे. कारण त्यांनी आगोदर जास्तीत जास्त लोंकाना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले आहे अशा देशात साक्षरतेचे प्रमाण जवळ जवळ ९९ % इतके आहे. त्यामुळे हे देश वेगाने प्रगती करू शकले आणि शिक्षणामुळे तिथल्या लोंकानी सरकारला ही प्रगती करण्यात साथ दिली. 

आपल्याकडे असणार्या अनेक समस्या या देशात नाहीतच आणि जरी असल्या तरी त्या अत्यल्प आहेत. आज आपल्या देशात निरक्षरतेमुळे निरक्षर लोंकाना लिहता वाचता येत नाही. तसेच लिहता वाचता नाही आल्यामुळे जगामध्ये असलेली महत्वाची माहिती त्यांना मिळत नाही. 

तसेच या लोंकाचा शाररिक, मानसिक, तसेच आर्थिकदृष्या विकास होत नाही कारण जर तुम्हाला या जगात काय चाललय हेच माहिती नसेल तर जे आहे तेच अंतिम सत्य म्हणुन स्विकारता आणि शिक्षण नसलेल्या माणसाची आवस्था ही त्या तळ्यातल्या बेडकासारखी होते त्याला ते तळे म्हणजेच जग वाटते.

शिक्षणाचे महत्व मराठी निबंध


तसेच निरक्षर किंवा आडाणी माणसाला व्यसनाची सवय लागते. कधी कधी तर तो त्या व्यासणाच्या आहरी जाऊन आपले जीवन सुद्धा संपवतो म्हणुन आपल्या देशातील लोकसंख्या, भ्रष्टाचार, व्यासनाधीनता, गरिबी, अशा समस्या सोडवायच्या असतील तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. 

तसेच जर एखाद्या घरात जर शिकलेला माणुस नसेल तर त्या घराला अनेक प्रकारच्या समस्याला तोंड द्यावे लागते आणि त्याच एवजी एखाद्या निरक्षर घरातील एक जरी माणुस शिकला तरी तो एक माणुस संपुर्ण घराचे कल्याण करतो तसेच येणार्या पिढ्यांचे सुद्धा तो कल्याण करतो. 

याचे उदाहरण सांगायचे झाले तर जिल्हाधिकारी असलेले रमेश घोलप सर रमेश घोलप यांची आई बांगड्या विकण्याचा पण त्यांना माहित होते शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणुन त्यांनी आपल्या मुलांना म्हणजेच रमेश घोलप यांना शिक्षण दिले आणि आज रमेश घोलप हे जिल्हाधिकारी झाले आहेत त्यांच्या आईला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागले त्या सगळ्या समस्या रमेश घोलप यांनी संपवुन टाकल्या तसेच त्यांनी स्वताः बरोबरच संपुर्ण घराचे आणि त्यांच्या पुढील काही पिढ्यांचे सुद्धा कल्याण केले हे सगळे शक्य झाले ते शिक्षणामुळेच.

government officer


शिक्षण घेतल्यामुळे काय होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे रमेश घोलप सर आहेत त्यामुळे तुम्हाला भविष्यात काही होयचे असेल पण त्यासाठी शिक्षण घेणे खूप महत्वाचे आहे शिक्षण हे जगाच्या ग्रंथालयाची चावी आहे या चावीने तुम्ही जगाच्या ग्रंथालयाची  सगळ्या प्रकारचे ज्ञान  घेऊ शकता आणि तुमचे जीवन अतिशय सुखकर बनवू शकता.

तसेच जर तुम्ही शिक्षण घेतले तर तुमच्यासाठी जगातील अनेक मार्ग उघडतील आणि जर तुम्ही शिक्षण नाही घेतले तर तुम्हला अत्यंत कमी मार्ग मिळतील किंवा एक दोन च मार्ग मिळतील त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करता येणार नाही आवडीचे काम करायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही 
ग्रामीण भागात खूप विद्यार्थी असे आहेत ज्यांना शिक्षण न घेता आल्यामुळे लहान वयातच काम करावे लागते आणि ते बालमजूर बनतात.

कायद्याने बालमजुरी हा गुन्हा आहे असे जर तुमच्या आजूबाजूला होत असेल तर ते थांबवा किंवा प्रशासनाला कळवा ग्रामीण भागात अनेक मुलांना शिक्षणाची आवड असते पण त्यांचे पालक त्यांना शिकू देत नाहीत किंवा म्हणतात कि शिक्षणासाठी खर्च करण्याची आपली ऐपत नाही तर आशा विध्यार्थ्यानी घाबयायचे काही कारण नाही कारण मोफत शिक्षण देण्याचीही जबादारी हि आता सरकारची आहे.

सरकारने अल्प दारात सर्वाना शिक्षण घेता येईल अशा योजना आणल्या आहेत त्यामुळे तुम्हाला शिक्षण घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही जर तुम्हाला खरंच शाळेत जायचे असेल तर तुमच्याजवळ वाडी वस्ती जिथे शाळा असेल तिथे जा तेथील शिक्षकांना भेटा आणि त्यांना सांगा कि मला शाळेत जायचे आहे पण घरचे नको म्हणतात.

त्यानंतर ते शिक्षक स्वतः येऊन तुमचा घरच्यांना सांगतील तसेच तुम्ही शाळेत गेल्या वर तुमचा जेवणाची, पुस्तकांची सोय ही शाळाच करेल असे तुमचा घरच्याना सांगा मग मात्र नक्कीच तुमच्या घरचे तुम्हाला शाळेत पाठवतील तर तुम्हला तुमच्या मनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तसेच आयुष्यात मोठे होण्यासाठी व समाजात आपल्याला आदर मिळावा तसेच तुमची स्वप्ने काही पण असो ते पूर्ण होतील ती पुर्ण करण्याचा मार्ग शाळेतून जातो तेव्हा आता तुम्हाला सर्वाना शिक्षणाचे महत्व समजले असेल.

आता शेवटी महापुरुषांची सांगितले एक वाक्य सांगतो आणि या निबंधाचा शेवट करतो ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्यावर माणूस गुरगुरतोच “ म्हणजे काय तर शिक्षण घेतल्यावर माणूस कोणत्याच गोष्टींना भीत नाही अन्यायाविरुद्ध लढतो म्हणून आपण वाघिणीचे दूध प्यायला पाहिजे.


हे पण वाचा – 

Leave a Comment