Online Exam काय आहे? | What is Online Exam in Marathi
नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात मी तुम्हाला ज्या ऑनलाईन परीक्षा conduct केल्या जातात त्या बद्दल सविस्तर माहिती देणार आहे. आज 2023 मध्ये लाखो विदयार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, काही परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातात तर काही परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातात, त्यामुळे जर तुम्ही सुद्धा अशा ऑनलाईन होणाऱ्या परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन एक्साम कशा होतात याबद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
स्पर्धा परीक्षा जसे कि बँक एक्साम, रेल्वे परीक्षा, एसएससी यांसारख्या सरकारी परीक्षा या आता ऑनलाईन पद्धतीने संगणकावर घेतल्या जातात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ऑनलाईन एक्साम देण्याची पद्धत हि ऑफलाईन परीक्षेपेक्षा वेगळी आहे. कारण ऑनलाईन पद्धतीत तुम्हाला कॉम्पुटर किव्हा मोबाइल च्या साहाय्याने सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात.
Online परीक्षा सुरू होण्याच्या 15 मिनिटांपूर्वी तुम्हाला संगणकाच्या स्क्रीनवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शक टिप्स दिसून येतील, ज्यामध्ये आपल्याला ऑनलाइन परीक्षा कशी द्यावी हे सांगितले जाईल, जेणेकरून आपण ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी कोठेही जात असाल किव्हा घरातूनच जरी तुम्ही हि परीक्षा देत असाल तर तुम्हाला महत्वाची जी मार्गदर्शक तत्वे दिसतात ते समजून घेणे गरजेचे आहे.
ऑनलाईन परीक्षा कशा घेतल्या जातात?
प्रथमच आपण ऑनलाइन परीक्षा देत आहात, तर आपल्याला ऑनलाइन परीक्षा कशी होते हे माहित असले पाहिजे. जेव्हा आपण ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी कोणत्याही केंद्रावर जाता तेव्हा आपल्याला एक unique लॉगिन आयडी आणि password दिला जाईल.
याद्वारे, आपण संगणकावर लॉग इन करू शकता आणि नंतर संगणकाच्या स्क्रीनवर प्रश्नपत्रिका दिली जाईल, ज्यामध्ये MCQ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न असतील. कारण सर्व ऑनलाईन परीक्षेत Multiple Choice Questions च असतात. तुम्ही संगणकाला असलेल्या माउस च्या साहाय्याने तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर select करून एक एक प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. आता या मध्ये प्रश्न स्किप करायचा देखील option दिला जातो. म्हणजे एखादया प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती नसेल तर तो प्रश्न स्किप करून तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे वाळू शकता. जेणे करून स्किप केलेला प्रश्न तुम्ही शेवटी वेळ भेटेल त्या वेळेत सोडवून योग्य पर्याय select करू शकता.
Mobile वर ऑनलाईन परीक्षा कशी द्यायची?
जेव्हा देशात कोरोना साथीचा उद्रेक झाला, तेव्हा आपल्याकडे संगणक नसल्यास महाविद्यालये आणि शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने आयोजित करीत होते आणि आपल्याला मोबाइलद्वारे ऑनलाइन परीक्षा द्यायला सांगत होते. परंतु त्याची प्रक्रिया काय आहे? नसेल माहिती तर घाबरू नका मी खाली याबद्दलच सविस्तर माहिती दिली आहे कि आपण मोबाइल च्या साहाय्याने परीक्षा कसे देऊ शकतो?
- ऑनलाईन परीक्षा देत असताना तुमची लाइव स्ट्रीमिंग द्वारे तुमच्या वर नजर ठेवली जाते.
- उमेदवार जेथे परीक्षा द्यायला बसतात त्याच्या आसपासच्या भागातील ऑडिओची रेकॉर्डिंग केली जाते आणि सोबत कॅमेरा द्वारे उमेदवारावर नजर देखील ठेवली जाते.
- यामध्ये रिमोट प्रॉक्टर चा वापर करून उमेदवाराची ओळख पटवली जाते आणि रिमोट प्रॉक्टर चा वापर करून त्यांच्यावर नजर ठेवली जाते.
- प्रॉक्टरला परीक्षा समाप्त करण्याचा आणि परीक्षा सुरु करण्याचा अधिकार असतो.
- संपूर्ण परीक्षेच्या क्रियाकलापांचे ऑडिट केले जाते.
- उमेदवार cheating करू नये म्हणून फेस रिकॉग्निशन आणि AI Algorithms चा उपयोग केला जातो.
Online Exam कशी द्यायची?
Online general knowledge test in Marathi
- सर्व प्रथम, जेव्हा आपण ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी जाता तेव्हा लॉगिन करून आपल्याला आपला रोल नंबर आणि आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर नाव लिहावे लागेल.
- मग परीक्षेशी संबंधित महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे आपल्या स्क्रीनवर येतील, ती काळजीपूर्वक वाचली पाहिजे आणि त्यानंतरच आपण स्टार्ट बटन वर क्लिक केले पाहिजे.
- यानंतर, भाषा निवडण्याचा पर्याय आपल्याला मिळेल, आपण आपल्या सोयीनुसार आपली भाषा निवडा.
- यानंतर आपल्याला परीक्षेचा नमुना मिळेल जिथे एकेक प्रश्न आपल्या समोर येतील आणि आपले उत्तर आपल्याला तिथे सबमिट करावे लागेल आणि नंतर आपण सेव्ह अँड नेक्स्टच्या बटणावर क्लिक करा.
- समजा तुम्हाला एख्यादा प्रश्नाचे उत्तर माहिती नाही आहे किव्हा तो प्रश्न सोडवायला तुम्हाला अधिक वेळ लागणार असेल तर तुम्ही SKIP AND NEXT या बटन वर क्लिक करून पुढील प्रश्नाकडे जाऊ शकता.
- असेच तुम्हाला एक एक प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील.
- परीक्षेच्या शेवटी जर तुमच्या कडे वेळ शिल्लक असेल तर तुम्ही जे प्रश्न स्किप केले आहेत त्याची उत्तरे देऊ शकता. म्हणजे तुम्ही प्रश्न क्रमांक 100 वरून प्रश्न क्रमांक 5 वर सुद्धा एका क्लिक च्या साहाय्याने येऊ शकता.
Online Exam देताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
- जर आपला संगणक परीक्षेदरम्यान काम करत नसेल किंवा इतर कोणतीही समस्या आली असेल तर आपण घाबरू नये, आपण त्वरित परीक्षेच्या पर्यवेक्षकाला याबद्दल माहिती द्यावी.
- परीक्षा चालू असताना विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तेथे परीक्षा पर्यवेक्षकांची नेमणूक केली जाते. जेणेकरून परीक्षेच्या वेळी काही समस्या उद्भवली असेल तर लगेच उमेदवारला मदत होते.
- ऑफलाइन प्रमाणेच, जर आपण ऑनलाईनमध्येही परीक्षा देत असाल तर आपल्याला दिलेल्या वेळेकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, प्रत्येक परीक्षेचा एक वेळ निश्चित केला जातो आणि त्या आत आपल्याला वेळ पूर्ण होताच सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील कारण त्या नंतर संगणकाही विंडो आपोआप बंद होईल.
- सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर, जेव्हा आपल्याकडे थोडा वेळ शिल्लक असेल, तेव्हा आपण सर्व प्रश्न पुन्हा एकदा पाहिले पाहिजेत की आपण सर्व प्रश्नाची योग्य उत्तर दिले आहे की नाही, तेव्हाच आपण फायनल सबमिट बटणावर क्लिक करा.
ऑनलाइन परीक्षेचे फायदे आणि तोटे काय आहेत?
ऑनलाइन परीक्षेचे बरेच फायदे आहेत कारण ते बरेच सुरक्षित आहे आणि फसवणूक होण्याची शक्यता कमी झाली आहे. हे पैसे आणि वेळ वाचवते. ऑनलाइन परीक्षेनंतर लवकरच निकाल जाहीर केला जाईल. तसेच हे इकोफ्रैंडली देखील आहे कारण येथे कागदाचा उपयोग होत नाही आहे.
ऑनलाइन परीक्षेचे नुकसान देखील आहेत, जर आपण त्याच्या गैरसोयीबद्दल बोललो तर बरेच लोक तंत्रज्ञानाशी जोडलेले नाहीत, ज्यामुळे त्यांना ऑनलाईन परीक्षा देताना त्रास होतो. या व्यतिरिक्त, ऑनलाइन परीक्षा देताना सर्व्हर बर्याच वेळा मंदावते, ऑनलाइन परीक्षा सुरक्षित आहे परंतु सर्व्हरला बर्याच वेळा हॅक केला जाऊ शकतो व तिथून फसवणूक देखील केली जाऊ शकते.
FAQ
Q. ऑनलाइन परीक्षेतील एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर ते पुन्हा बदलले जाऊ शकते का?
उत्तरः हो, जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिले असेल आणि थोड्या वेळाने आपण या प्रश्नाचे उत्तर बदलू इच्छित असाल तर आपण हे करू शकता, म्हणजेच जोपर्यंत परीक्षेचा वेळ पूर्णपणे संपत नाहीत तो पर्यंत तुम्ही तुमचे उत्तर बदलू शकता.
Q. मोबाइल वरून ऑनलाइन परीक्षा कशी द्यायची?
उत्तरः यामध्ये उमेदवारावर Live Streaming द्वावे नजर ठेवली जाते. आणि जर उमेदवार cheating करताना आढळला तर त्याला disqualified घोषित केले जाते.
Q. ऑनलाइन परीक्षा कशा दिली जातात?
उत्तरः ऑनलाइन परीक्षा हि ऑफलाईन प्रमाणे एखाद्या कागदावर होत नसून ती संगणक आणि मोबाइलला च्या साहाय्याने घेतली जाते. यामध्ये परीक्षा सुरु होण्यापुर्ण तुम्हाला पूर्ण नियमावली विडिओ द्वावे समजावली जाते.
CONCLUSION
मित्रांनो, मला असे वाटते कि ऑनलाईन एक्साम देऊन फायदे तर जास्त होतात पण यामध्ये मुलांना cheating करण्याचे मार्गे जास्त मोकळे होत आहेत. कारण जर एखादा विद्यार्थी त्याच्या घरून ऑनलाईन एक्साम देणार असेल तर त्याला इतरांकडून मदत होण्याची शक्यता वाढते, मग जरी तुम्ही रिमोट प्रॉक्टर चा उपयोग केलात तरी सुद्धा cheating करणे शक्य आहे. हा जर ऑनलाईन परीक्षा एखाद्या कॉम्पुटर लॅब मध्ये परिवेक्षकाच्या देखरेखीत होत असेल तर त्यातून योग्य result मिळण्याची शक्यता वाढते.
तर मला अशा आहे तुम्हाला आता ऑनलाईन एक्साम कशी दिली जाते याबाबत माहिती मिळाली असेल. तसेच मी ऑनलाईन परीक्षा देत असताना होणाऱ्या फायद्यांबद्दल व नुकसानीबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली आहे. जर तुमची तरी सुद्धा काही शंका असतील ऑनलाईन परीक्षेसंबंधी तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
हे देखील वाचा
मॅडम या website वरील theme चे नाव काय आहे
Generate Press