Examples of viram chinh in Marathi | Punctuation marks in Marathi 2024

Examples of viram chinh in Marathi | Punctuation marks in Marathi

Examples of viram chinh in Marathi: आपण संभाषण करताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा यासाठी काही वेळ थांबतो म्हणजेच विराम घेतो आणि तोच्या चिन्हाने दर्शविला जातो. त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात. या विराम चिन्हांमुळेच आपल्याला कोणते वाक्य कुठे संपते, वाक्य पूर्ण झाले आहे कि अपूर्ण आहे? अशा त्या वाक्यातील पुष्कळ गोष्टी कळतात आणि म्हणूनच विराम चिन्हांचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. आणि मराठी व्याकरण शिकताना आपल्याला या सर्व १३ विराम चिन्हांचा वापर योग्य ठिकाणी करता आलाच पाहिजे.

विरामचिन्ह चे प्रकार किती | Types of viram chinh in Marathi 2024

विराम चिन्हे हि 2 प्रकारची असतात.

१. विराम दर्शवणारी: पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम इ.
२. अर्थबोध करणारी: प्रशचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह,

Examples of viram chinh in Marathi

Examples of viram chinh in Marathi
Examples of viram chinh in Marathi

1. पूर्णविराम (.) 

एखादे वाक्य लिहीत असताना, वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम(.) या चिन्हाचा उपयोग करतात.

पूर्णविराम (.) उदाहरणार्थ

  1. अंकिता शाळेत जाते.
  2. माकड खेळा खातो.
  3. सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या.
  4. उद्या शाळा सकाळी ७ वाजता आहे.
  5. प्रतीक नियमित व्यायाम करतो.
  6. आमच्या गावाला नारळाची भरपूर झाडे आहेत.

2. अर्धविराम (;)

ज्या वाक्यातील वाक्यांशामध्ये परस्पर संबंध नाही अशा वाक्यांना जोडण्यासाठी, संस्कृत वाक्यातील समान वाक्य वेगवेगळी दाखवण्यासाठी व दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडण्यासाठी अर्धविराम वापरतात.

अर्धविराम (;) उदाहरणार्थ.

  1. कुत्रे खूपच भुंकत होते; पण चोर दिसत नव्हते.
  2. त्या देशात खूप झाडे होती; तरी पावसाचा अभाव होता.
  3. मी खूप अभ्यास केला; पण अपेक्षित यश मिळाले नाही.
  4. मी वाण्याकडे जात आहे, तो पर्यंत तू अभ्यास कर.
  5. आज राजू शाळेत तर आला, पण गृहपाठ करायला विसरला.
  6. अंकिता हुशार आहे,पण ती अभ्यास करत नाही.
  7. त्या दिवशी पावसाची खूप वाट पाहली, पण पाऊस आला नाही.

3. स्वल्पविराम (,)

मोठ्या वाक्यातील सामान वाक्य वेगवेगळी दाखवण्यासाठी, मोठे वाक्यांश. खवण्यासाठी, एका जातीचे शब्द लागोपाठ आल्यास, वाक्याच्या आरंभी संबोधन आल्यास स्वल्पविराम या चिन्हाचा चिन्हाचा वापर करतात.

स्वल्पविराम (,) उदाहरणार्थ.

  1. अंकिताने मराठी, गणित विज्ञान, इंग्रजी या विषयांचा खूप अभ्यास केला होता.
  2. प्रिय मुलांनो, जीवनात आपले ध्येय निश्चित करा.
  3. आमच्या घराच्या बागेमध्ये चिकू, नारळ, पेरू ची भरपूर झाडे आहेत.
  4. आमच्या लग्नाला मामा, आत्या, काका सर्वच उपस्तिथ होते.
  5. विद्यार्थीमित्रांनो, उद्या शाळेला सुट्टी नाही आहे.
  6. सर, तुम्ही दिलेले समीकरण मी सोडवून आणले आहे.

4. अपूर्ण विराम (:)

वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील, वाक्याच्या शेवटी तपशील देण्यासाठी अपूर्णविराम या चिन्हाचा वापर करतात.

अपूर्ण विराम (:) उदाहरणार्थ

  1. भारतामध्ये मुख्यतः तीन ऋतू आहेत: उन्हाळा, पावसाळा, हिवाळा
  2. त्या गावाला जाण्यासाठी तीन प्रकारचे वाहने उपलब्ध आहेत: विमान,बस,रेल्वे
  3. १० पेक्षा लहान सर्व सॅम संख्या पुढीलप्रमाणे आहेत: ०, २, ४, ६, ८

5. प्रश्नचिन्ह (?)

प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्हाचा वापर करतात.

प्रश्नचिन्ह (?) उदाहरणार्थ.

  1. अंकिताची परीक्षा कधी आहे?
  2. तू गावाला जाणार आहेस का?
  3. इंद्रधनुष्यात किती रंग आहेत?
  4. तू केव्हा आलास?
  5. आई तू बाजारात जाणार आहेस का?

6. उद्गारचिन्ह (!)

आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करताना शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्हचा वापर करतात.

उद्गारचिन्ह (!) उदाहरणार्थ.

  1. अरे वा! किती सुंदर फूल आहे.
  2. छान! अशीच प्रगती कर.
  3. बापरे! किती मोठा साप आहे.
  4. अरेरे! अंकित परीक्षेत नापास झाला.
  5. शाब्बास! खूप छान खेळास.

7. अवतरण चिन्हे(‘…..’)

एखाद्या वाक्यावर जोर देण्यासाठी किंवा दुसराचे विचार आपणास अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्यास एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात.

अवतरण चिन्हे(‘…..’)उदाहरणार्थ.

  1. ‘संभाजीनगर’ हे ऐतिहासिक शहर आहे.
  2. ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’
  3. मुलंध्वनींना ‘वर्ण’ असे म्हणतात.

दुहेरी अवतरण चिन्हे(“…..”)

एखाद्या व्यक्तीचे विचार जर जसेच्या तसे सांगायचे असतील तेव्हा दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात

  1. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, ” जगी सर्वसुखी असा कोण आहे?”

8. संयोग चिन्ह (-)

दोन शब्द जोडण्यासाठी तसेच ओळ संपल्यानंतर शब्द अपूर्ण राहिल्यास संयोग चिन्हचा वापर करतात.

संयोग चिन्ह (-) उदाहरणार्थ.

  1. वाद-विवाद
  2. अध्ययन-अध्यापन
  3. मित्र-मैत्रिणी
  4. पुढील कार्यक्रम शाळेच्या खेळा –
    च्या मैदानात होतील.

9. अपसारण चिन्ह (-)

आपण बोलताना विचार खंडित झाल्यास ते विचार पुन्हा स्पष्टीकरणार्थ मांडायचे असल्यास अपसरण चिन्हाचा वापर करतात.

अपसारण चिन्ह (-) उदाहरणार्थ.

  1. विद्यार्थी कोणताही असो-शिक्षकाला सर्व प्रियच असतात
  2. मी तिकडे गेलो पण-
  3. ती मुलगी-जिने बक्षीस मिळवले –
    आपल्या शाळेतील आहे.

10. लोप चिन्ह (…)

एखादे व्याख्या बोलता बोलता विचार खंडित झालेला दाखवताना लोप (…) चिन्हाचा वापर करतात.

लोप चिन्ह (…) उदाहरणार्थ.

  1. मला ते पाण्यात सोडायचे होते, पण…
  2. आई…मला…दोनशे रुपये…
  3. आयुष्य म्हणजे … एक सुंदर कलाकृती च … आज एवढ्या वर्षानंतर विचार करताना जाणवतं …
  4. मित्राआयुष्य जगून घे कारण….

11. दंड (एकेरी ।, दुहेरी ।।)

श्लोक, अभंग किंव्हा ओवी यांसारख्या काव्यांमध्ये ओवीचा अथवा चरणांचा शेवट दाखवण्यासाठी दंड (एकेरी ।, दुहेरी ।।) चिन्हाचा वापर करतात.

दंड (एकेरी ।, दुहेरी ।।) उदाहरणार्थ.

  1. ॥ ॐ श्री गणेशाय नमः॥
  2. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर।
    आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर ॥

12. अवग्रह (ऽ)

जर एखाद्या शब्दाचा उच्चार जर लांब करायचे असेल तर अवग्रह (ऽ) चिन्हाचा वापर केला जातो.

अवग्रह (ऽ) उदाहरणार्थ.

  1. शू ऽ! मी शिकवत असताना कोणी बोलू नका.
  2. का ऽ ही बिघडू पण शकते.

13. विकल्प चिन्ह (/)

एखादे व्याख्या लिहताना एखाद्या शब्दासाठी अजून पर्याय दाखवयाचे असतील तर आपण विकल्प चिन्ह (/) चा वापर करतो.

विकल्प चिन्ह (/) उदाहरणार्थ.

  1. मी कॉफी/चहा घेते
  2. आपण अविवाहित/विवाहित आहत का?

Viram chinh Questions in Marathi 2024

तर चला मग आता या विराम चिन्हांवर आधारित काही प्रश्न पाहूया:

1. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? तुम्ही घरी केव्हा याल.

A. अवतरण चिन्ह
B. उद्गारवाचक चिन्ह
C. स्वल्पविराम
D. प्रश्न चिन्ह

2. कंसा मधील विराम चिन्हे ओळखा.(;)

A. पूर्णविराम
B. स्वल्पविराम
C. उद्गारवाचक चिन्ह
D. अर्धविराम

3. खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता ते ओळखा?

A. ?
B. !
C. :
D. ; 

4. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा – केवडी शुभ वार्ता आणलीस तू

A. ,
B.
C. ?
D. !

5. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा – ‘उद्या काय तो निर्णय कळेल’

A. .
B. ;
C. !
D. ?

6. कंसातील सूचनाप्रमाणे दिलेल्या वाक्याची मूळ अर्थात बदल न करता रचना करा, ;त्याने विचारले आवडले का तुला हे पुस्तक,’ (योग्य विरामचिन्हे घाला)

A. त्याने विचारले, आवडले का तुला हे पुस्तक?
B. त्याने विचारले, “आवडले का तुला हे पुस्तक?” 
C. त्याने विचारले, “आवडले का तुला हे पुस्तक”
D. त्याने विचारले, आवडले का तुला हे पुस्तक

7. ‘अरेच्चा सुधाचा वाढदिवस झाला परवा’ – याद विराम चिन्हे वापरून वाक्य कसे लिहाल?

A. “अरेच्चा! सुधाचा, वाढदिवस झाला परवा?”
B. “अरेच्चा, सुधाचा वाढदिवस झाला परवा?”
C. “अरेच्चा सुधाचा वाढदिवस झाला परवा?”
D. “अरेच्चा! सुधाचा वाढदिवस झाला परवा?” 

8. योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.

A. बघ! एक रेकॉर्ड गेलीसुद्धा लाव ना.
B. “बघ एक रेकॉर्ड गेलीसुद्धा लाव ना”
C. “बघ! एक रेकॉर्ड गेलीसुद्धा – लाव ना. ” 
D. बघ! एक रेकॉर्ड गेलीसुद्धा लाव ना.

9. योग्य विराम चिन्ह दिलेले वाक्य ओळखा.

A. सोड, मला ! ती जोराने ओरडली
B. “सोड मला,” ती जोराने ओरडली. 
C. “सोड, मला?” ती जोराने ओरडली
D. सोड मला, ती जोराने ओरडली.

10. पुढील वाक्याच्या शेवटी कोणतेही विरामचिन्ह वापराल?

A. पूर्णविराम
B. अवतरण
C. उद्गारवाचक
D. प्रश्न चिन्ह

11. विरामचिह्ने घालून पुढील वाक्ये चार प्रकारेलेली आहेत त्यांपैकी योग्य पर्याय शोधा – आई म्हणाली, तुझा पहिला नंबर आला का शाब्बास.

A. आई म्हणाली, “तुझा पहिला नंबर आला का!”
B. आई म्हणाली, “तुझा पहिला नंबर आला का? शाब्बास!” 
C. आई म्हणाली, “तुझा पहिला नंबर आला का!” शाब्बास!
D. आई म्हणाली, “तुझा पहिला नंबर आला का!” शाब्बास.

12. पुढील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या – सुनील शाळेला का जात नाही

A. .
B. ? 
C. !
D. ”

13. पुढील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. अबब! केवढी मोठी ही भिंत

A. .
B. ?
C. ! 
D. ”

14. पुढील वाक्यातून योग्य विरामचिन्हे असणारे वाक्य ओळखा.

A. ” हो! जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे,” “जयंत म्हणाला”.
B. ” हो! जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे,” जयंत म्हणाला. 
C. ” हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे,” जयंत म्हणाला
D. ” हो” जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला”.

15. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या – मी वाट पाहिली पण तो आला नाही

A. मी वाट पाहिली पण तो आला नाही.
B. मी वाट पाहिली; पण तो आला नाही. 
C. मी वाट पाहिली. पण, तो आला नाही.
D. मी वाट पाहिली पण ! तो आला नाही.

तर विद्यार्थीमित्रांनो मला अशा आहे Examples of viram chinh in Marathi च्या या लेखातून तुम्हाला आता viram chinh in Marathi समजायला मदत झाली असेल. तरी सुद्धा तुम्हाला एखादे विराम चिन्ह नीट कळले नसेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा . तसेच या लेखात दिलेले Viram chinh Questions in Marathi मधील तुम्हाला किती प्रश्न सोडवता आले ते देखील कंमेंट मध्ये नक्की सांगा.

हे देखील वाचा

Marathi kavita Rasgrahan

Marathi Application Format

TC Application in marathi

मराठी कोडी व उत्तरे

मो.रा.वाळिंबे मराठी व्याकरण PDF

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment