नमस्कार मित्रांनो या लेखात आम्ही पावसाळा निबंध मराठी / Essay on Rainy Season in Marathi Language दिला आहे तसेच आम्ही इथे १००, २००, ३०० शब्दातले पावसाळा निबंध मराठी दिले आहेत ते तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.
पावसाळा निबंध मराठी १०० शब्दामध्ये | Rainy Season Essay in Marathi
पावसाळा हा माझा आवडता ऋतु आहे कारण पावसाळ्यात सगळीकडे अतिशय आनंदायक आणि उत्साही वातावरण असते. पावसाळा हा ऋतू मला अजून चांगला वाटतो कारण पावसाळ्यावर बऱ्याच शेतकरी लोकांचे जीवन अवलंबुन असते पाऊस येतो आणि त्यांच्या जीवनात आनंद येतो.
पावसाळयात सगळीकडे हिरवेगार वातावरण असते, आणि पावसाळ्यात विशेषतः झाडे लावण्यासाठी अतिशय पोषक वातावरण असते कारण झाडे लावल्यानंतर पहिले चार महिने झाडाला पाणी देणे अतिशय महत्वाचे असते आणि तेच काम निसर्ग आपल्यासाठी करतो.
पावसाळयात पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ होते व हे पाणी माणसाला कायमस्वरूपी लागते आणि पावसाळा हा ऋतू माझी वर्ष भराची चिंता संपवतो तसेच पर्यटनासाठी सुद्धा अतिशय चांगला असतो कारण आपली धरणी माता हिरवा शालु नेसुन नटलेली असते त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जायला एकदम उत्तम ऋतु असतो.
पावसाळा निबंध मराठी २०० शब्दामध्ये | Essay on Rainy Season in Marathi in 200 words
पावसाळा हा दरवर्षा येतो पण येताना अनेंकासाठी नवीन आशा आंकाशा घेऊन येतो. अनेकांच्या जीवनात वर्षभर पुरेल एवढा प्रकाश घेऊन येतो. अनेक नात्यांना एकत्र आणतो अनेकांच्या भाकरीची वर्षाची सोय करून जातो आणि तुमच्याकडे जाताना मागतो फक्त थोड्याश्या झाडांची जपणुक.
पण अनेक दिवसांपासुन पावसाळा ॠतु आता आधीसारखा राहिला नाही एक तर तो लवकर येतच नाही. आणि आला तर असा येतो कि सगळ्यांना बुडवुन जातो. पण आधीचे पावसाळे चांगले होते माझ्या इतक्या साध्या सरळ पावसाळ्याला बेशिस्त कोणी केले आणि पुन्हा त्याला शिस्तीत कोण ठेवणार याचे उत्तर माणसाला लवकरात लवकर मिळतील अशी आशा आपण ठेऊया.
तसेच पावसाळा आला कि तो लहान मुलांन साठी सणच असतो. कारण पावसात जायचे खुप खुप भिजायचे मज्जाच मज्जाच करायची पहिल्या पावसात तर भिजणे ही तर आपल्या भारतीयांची जणू एक प्रथाच आहे आणि जोराच्या पावसातल्या गारा गोळा करायच्या आणि वितळत नाहीत तोपर्यत मुठीत ठेवायच्या त्यातुन जे समाधान मिळायचं ते मनात साठवुन ठेवायचं.
तसेच पाऊस बंद झाल्यावर साठलेल्या पाण्यात कागदी होड्यांचा खेळ रंगायचा तसेच साठलेल्या पाण्यात तासनतास मासेमारी चालायची तसेच मासे पकडण्यासाठी गळ आणण्यासाठी आजीकडे दोन रूपयाचा हट्ट धरायचा असे पावसाळ्याचे दिवस आणि पावसाळा मला आणि माझ्या मित्रांना खुप खुप आवडायचा.
पण आता माञ पावसाळा कमी होत चाललाय एक तर येतोच उशीरा नाहीतर आल्यावर अख्ख गावच पाण्याखाली नेतो लोंक म्हणतात आमच्या काळांत असे नव्हते आणि आता असे का होते हे पण सांगत नाहीत.
पावसाळा निबंध मराठी ३०० शब्दामध्ये | Essay on Rainy Season in Marathi Language in 300 words
पावसाळा हा माझा आवडता आणि नावडता ॠतु आहे तुम्ही म्हणाल असे का? कारण मी शहरात राहतो आणि शहरात जर पावसाळा असेल तर तो मला आवडत नाही आणि माझ्या आजीच्या गावाकडे असेल तर माञ मला पावसाळा खुप आवडतो.
आता आपण दोन्ही मधे काय फरक आहे ते पाहुया. सर्वात आधी आपण माझ्या आजीच्या गावचा पावसाळा पाहु. माझ्या आजीच्या गावात पावसाळ्यात खुप खुप मज्जा येते तिथे मला पहिल्या पावसात खुप खुप भिजता येते आजी पण मला पावसात जाताना आडवत नाही ती उलट मला पावसात खेळायला जाऊ देते.
पावसाळा हा मला गावाकडचा सगळ्यात छान ऋतु वाटतो तसेच पावसाळ्यात गावाकडे शेतात जेव्हा पोत्याचा रेणकोट करून जातो तेव्हा मला खुपच भारी वाटते तसेच पावसाळ्यात शेतात चिखलात जाऊन पाय बुडवून खेळ्यायला खुप खुप मज्जा येते तसेच पाऊस बंद झाल्याशर मातीत पाय रोवुन कोप करायला खुप मज्जा येईची आम्ही रोज कोप करायचो आणि त्यात चिऊताई बसण्याची वाट पहायचो. तसेच पाऊस येत नसेल तर आम्ही सर्व मुले पावसासाठी “येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा ” हे गाणे आम्ही सर्व मुले मिळुन गात असे.
तसेच पावसाळ्यात गारा गोळा करणे आणि मासे पकडणे हे रोजचाच कार्यक्रम होता तसेच पावसात लगोरी खेळायला मला खुप खुप आवडायचे कधी कधी खुपच जास्त पाऊस आला तर झाडाखाली थांबायचो तसेच पावसाळ्यात ऊन पडत नाही म्हणुन हा ऋतु क्रिकेटसाठी अतिशय चांगला ऋतु आहे तसेच ऊन नसल्यामुळे दिवसभर क्रिकेट खेळले तरी आजी मला काही बोलत नसे.
तसेच पावसाळ्यात आम्ही आमच्या गावाजवळच्या टेकडीवर फिरायला जात असे हि टेकडी पावसाळ्यात हिरवीगार होत असे त्यामुळे मला ती भारतीय सैन्याच्या टोपी सारखी दिसत असे तसेच पावसात भिजुन घरी आल्यावर आजी मला गरम गरम कांदा भजी खायला देत असे.
असा हा गावाकडचा पावसाळा खुप खुप आवडतो पण आता मात्र आम्ही शहरात राहतो आणि आता मला आजीच्या गावाला पावसाळ्यात जात नाही तसेच शहरात आल्यापासुन मला पहिल्या पावसात भिजता येत नाही म्हणुन मी शाळेत जाताना मुद्दाम पावसात भिजतो पण आई घरी आल्या वर माझ्यावर खुप रागवते.
मी तिला सांगतो आज्जी मला राहवत नव्हते तेव्हा ती मला म्हणते की गावाकडे भिजल तर चालतं शहारात नाही. असे का हे मला आजपर्यत कळले नाही आणि आईला मी पावसाळयात आज्जीकडे चल म्हणलो पण ती काय तयार होत नाही.
ती म्हणते पुढच्या पावसाळ्यात आपण आज्जीकडे जाऊ असे म्हणत म्हणत तीन पावसाळे गेले पण ती काय आम्हाला घेऊन जात नाही यावर्षी पण म्हणाली आहे पुढच्या पवसाळ्यात जाऊ बघु आता पुढच्या पावसाळ्यात तरी मी आजीकडे जातोय का? म्हणुन मला पावसाळा आवडतो पण आणि नाही आवडत पण.
पावसाळ्यात माझे शहर खूप च सुंदर बनून जाते. गर्मीतील उदास उकाड्यानंतर पावसाळा हंगाम येतो आणि माझ्या शहरावर बसलेल्या धुळीला काढून पूर्ण स्वछ करून टाकतो. असा हा पावसाळा ऋतू मला इतर ऋतुंपेक्षा सर्वात भारी वाटतो.
10 Lines on Rainy Season in Marathi
- मला पावसाळा ऋतू सर्वात जास्त प्रिय आहे.
- पावसाळा ऋतू हा मान्सून हंगाम म्हणून देखील ओळखले जाते.
- केरळच्या किनाऱ्यावरून हळू हळू मान्सून उत्तर भारताच्या दिशेकडे वळतो.
- पावसाळ्याचा हंगाम जून महिन्यात भारतात सुरू होतो, जेव्हा नैऋत्य मॉन्सून वारे वाहू लागतात.
- मान्सून ऋतू हा मध्य -जूनपासून सुरू होतो आणि सप्टेंबरपर्यंत संपून जातो.
- पावसाळ्यात मला नवीन रेनकोट घालून घरातून फिरायला खूप आवडते.
- सर्व कोरडे तलाव, नद्या, नाले पावसाच्या पाण्याने तुडुंब वाहू लागतात.
- गडगडाटी वादळ आणि पाऊस बघून शेतकर्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद येतो.
- मान्सून दरम्यान तापमान खूप आनंददायी होते कारण पावसाळा आपल्याला मे महिन्याच्या उन्हापासून आपली सुटका करतो.
- पावसाळा ऋतू हा इतर ऋतूंच्या तुलनेत माझा आवडता हंगाम आहे.
आपण सर्व सर्व दरवर्षी 3 ते 4 महिने पावसाळ्याचा आनंद घेतो. थंड हवा आणि पाऊस आपले उन्हाळ्यात उन्हाळ्यात तापलेले तापलेले वातावरण खूपच आनंददायक बनवते. तर मित्रांनो मी अशा करतो कि तुम्हाला Essay on Rainy Season in Marathi आवडला असेल आणि तुमच्या स्कूल आणि कॉलेज मध्ये पावसाळा निबंध मराठी लिहायला मदत झाली असेल. तुमच्या कडे सुद्धा असाच पावसाळा ऋतू वर निबंध असेल तर खाली कंमेंट करून नक्की नमूद करा.
हे पण वाचा –