क्रेडिट कार्ड म्हणजे काय | What is Credit Card in Marathi

क्रेडिट कार्ड म्हणजे काय | What is Credit Card in Marathi

What is Credit Card in Marathi: मित्रांनो आपल्या देशामध्ये डिजिटल पेमेंटला चालला देण्यासाठी भारतीय सरकार सतत प्रयत्नशील आहे. डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन शॉपिंगच्या या काळामध्ये डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा उपयोग दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या या काळात डिजिटल पेमेंट मुळे लोकांची उत्तम सोय झालेली आहे, यामुळे लोकांना physical money म्हणजेच नोटा किंवा चिल्लर ठेवायची गरज भासत नाही आहे.

पण बऱ्याच वेळा लोकांना डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या मधला फरक समजत नाही. परंतु बँकिंगच्या दृष्टिकोनातून हे दोन्हीही कार्ड वेगवेगळे आहेत. जर क्रेडिट कार्ड बद्दल बोलायचं झालं तर क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून खर्च करण्यात येणारे पैसे एक प्रकारे बँकेकडून लोन दिलेले असते. जर तुम्हाला क्रेडिट कार्ड बद्दल माहिती नसेल तर आजच्या या लेखांमधून आपण क्रेडिट कार्ड बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. क्रेडिट कार्ड म्हणजे काय त्याचबरोबर डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड मध्ये काय फरक आहे हे आपण पाहणार आहोत.

What is Credit Card in Marathi | क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड वित्तीय संस्थेद्वारे (financial institution) दिले जाणारे एक असे कार्ड असते, ज्याच्या मदतीने कार्ड धारक (card holder) एका ठराविक वेळेपर्यंत, उधारीवर सामान विकत घेऊ शकतात किंवा ऑनलाईन आपले बिल्स (payments) पे करू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही पैशाशिवाय कोणत्याही प्रकारच्या सामानांचे payment ऑनलाइन प्रकारे करू शकता.

बँकेमध्ये खाते उघडताना तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळवण्याचा ऑप्शन दिला जातो. तसं पाहायला गेलं तरी क्रेडिट कार्डचा सरळ अर्थ म्हणजे बँकेद्वारे उधार स्वरूपात घेतलेली धनराशी असते. बँकेद्वारे हे कार्ड देण्याआधी या गोष्टीची खात्री केली जाते की ज्या व्यक्तीला हे कार्ड दिले जात आहे ती व्यक्ती निर्धारित केलेल्या वेळेमध्ये बँकेचे पैसे परत करण्यास सक्षम आहे की नाही.

क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही एटीएम मधून पैसे काढण्या व्यतिरिक्त ऑनलाईन शॉपिंग, रिचार्ज, तिकीट बुकिंग इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करू शकता. यासाठी तुमच्या बँकेमध्ये बॅलन्स असणे आवश्यक नाही, कारण बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे उधार स्वरूपात देऊ करते. या पैशांना तुम्हाला व्याजासकट बँकेला ठरवून दिलेल्या वेळेत परत करावे लागते. बँकेद्वारे तुम्हाला दिली जाणारी ही रक्कम धनराशीची लिमिट तुमच्या आर्थिक आधारावर निश्चित केली जाते.

हे देखील वाचा: क्रेडिट कार्ड कसे काढावे

Types of Credit Card in Marathi | क्रेडिट कार्ड चे प्रकार

बँक आपल्या ग्राहकांच्या सुविधेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे क्रेडिट कार्ड प्रदान करते. ज्याच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन शॉपिंग पासून वेगवेगळ्या प्रकारचे बिल्स भरू शकता. भारतामध्ये वित्तीय संस्थेद्वारे प्रदान केले जाणारे क्रेडिट कार्डचे प्रकार आणि त्या संबंधित माहिती खालीलप्रकारे आहे

1. ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड (Travel Credit Card)

ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड बँकेद्वारे प्रदान केले जाणारे एक असे क्रेडिट कार्ड आहे ज्याच्या मदतीने तुम्ही बस, ट्रेन, कॅब किंवा एअर फ्लाईटची तिकीट बुकिंग अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. याबरोबरच क्रेडिट कार्ड द्वारे तिकीट बुकिंग केल्यानंतर मिळणाऱ्या सवलतींचा देखील लाभ तुम्ही घेऊ शकता.

2. शॉपिंग क्रेडिट कार्ड (Shopping Credit Card)

बँकेद्वारे शॉपिंग क्रेडिट कार्ड प्रदान करण्याचा मुख्य उद्देश डिजिटल पेमेंटला चालना देणे हा आहे. या कार्डद्वारे तुम्ही ऑनलाईन (online) किंवा ऑफलाइन शॉपिंग (offline shopping) करू शकता. या क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग केल्यावर तुम्हाला कॅशबॅक (cashback) डिस्काउंट वाउचर (Discount Voucher) इत्यादी गोष्टींचा लाभ घेता येतो.

3. फ्यूल क्रेडिट कार्ड (Fuel Credit Card)

आजच्या या आधुनिक जगामध्ये बऱ्याच लोकांकडे स्वतःची वाहने आहेत. या वाहनांमध्ये फ्युएल भरते वेळी याचे payment या कार्ड द्वारे केल्यावर तुम्हाला फ्युएल सर्चार्ज मध्ये डिस्काउंट चा लाभ मिळतो. त्याच बरोबर पेट्रोल पंप कंपनी कडून देणाऱ्या ऑफर्स चा लाभ देखील तुम्ही प्राप्त करू शकता.

4. बॅलेंस ट्रांसफर क्रेडिट कार्ड (Balance Transfer Credit Card)

अधिक व्याज किंवा पेनल्टी पासून वाचण्यासाठी तुम्ही बॅलन्स ट्रान्सफर क्रेडिट कार्ड घेऊ शकता. या प्रकारचे क्रेडिट कार्ड तुमच्या चालूच्या क्रेडिट कार्डची धनराशी कमी करते. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की या कार्डद्वारे बॅलन्स अमाऊंट भरण्यासाठी तुम्हाला 6 महिने ते 21 महिन्यांचा कालावधी दिला जातो. परंतु या कार्डचा वापर केल्यानंतर तुम्हाला बॅलन्स ट्रान्सफर फीज भरावी लागते. जी कार्डद्वारे ट्रान्सफर केलेल्या रकमेची 5% असू शकते.

5. रिवॉर्ड क्रेडिट कार्ड (Rewards Credit Card)

रिवॉर्ड क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला निश्चित प्रकारे कोणते ना कोणते तरी बक्षीस (Reward) नक्की मिळते. सोबतच कॅशबॅक चा लाभ देखील तुम्ही घेऊ शकता. कॅशबॅक ऑफर मध्ये तुम्हाला जवळपास दोन टक्क्यांचा कॅशबॅक मिळतो.

6. सिक्युर्ड क्रेडिट कार्ड (Secured Credit Card)

क्रेडिट कार्डद्वारे घेतली गेलेली धनराशी बँकेला निर्धारित वेळेमध्ये परत न केल्यावर, बँक अशा व्यक्तीला डिफॉल्टर (defaulter) घोषित करते म्हणजेच त्यांचा क्रेडिट स्कोर खूप खराब होतो आणि या सगळ्यातून वाचण्यासाठी तुम्ही सिक्युर्ड क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करू शकता.

सिक्युर्ड क्रेडिट कार्ड खराब किंवा डिफॉल्टर क्रेडिट स्कोर असणाऱ्या ग्राहकांसाठी खूप उपयोगी असते. जेव्हा तुम्ही कोणतेही नवीन अकाउंट खोलता किंवा कोणत्याही लोनसाठी अप्लाय करता तेव्हा सिक्युर्ड क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर ठीक करू शकता.

Difference Between Credit and Debit Card | डेबिट आणि क्रेडिट कार्ड मध्ये काय फरक आहे

Difference Between Credit and Debit Card
Difference Between Credit and Debit Card
  • डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड मध्ये सगळ्यात मोठा फरक हा आहे की डेबिट कार्ड तुमच्या बचत खात्याशी किंवा करंट अकाउंट सोबत जोडला गेलेला असतो. याउलट क्रेडिट कार्डचा आणि तुमच्या बँकेच्या अकाउंटचा काहीही संबंध नाही.
  • डेबिट कार्ड द्वारे वापरात आणली जाणारी धनराशी ही तुमच्या बँक अकाउंट मधून डिडक्ट होते, याउलट क्रेडिट कार्डचा वापर केल्यावर ती राशी तुम्ही बँकेकडून उधार घेता.
  • डेबिट कार्डच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या कोणत्याही रकमेवर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही. याउलट क्रेडिट कार्डद्वारे उपयोग केल्या जाणाऱ्या रकमेवर तुम्हाला एक ठराविक रक्कम व्याजा स्वरूपात बँकेला द्यावी लागते.
  • डेबिट कार्डवर बँकेद्वारे लावण्यात येणारा सर्व्हिस चार्ज हा खूपच कमी असतो याउलट क्रेडिट कार्डवर सर्विस चार्ज अधिक आकारला जातो.
  • डेबिट कार्डच्या माध्यमातून खर्च करण्यात येणाऱ्या पैशाचा हिशोब ठेवण्याची गरज नसते. याउलट क्रेडिट कार्डद्वारे खर्च करण्यात येणाऱ्या पैशांचा हिशोब बँकेद्वारे पाठवला जातो.

Final Words

तर मित्रांनो मला अशा आहे तुम्हाला आता क्रेडिट कार्ड बद्दल सर्व माहिती समजली असेल, तसेच क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड या दोन्ही कार्ड्स मध्ये काय फरक असतो हे देखील तुम्हाला आता समजले असेल, तुमच्या काही शंका असतील, किव्हा तुम्हाला अजूनही क्रेडिट आणि डेबिट कार्ड मधील फरक काळला नसेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

धन्यवाद.

हे देखील वाचा

Cibil Score Check in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment