प्रदूषण मराठी निबंध | Essay on Pollution in Marathi

प्रदूषण मराठी निबंध | Essay on Pollution in Marathi

नमस्कार मित्रांनो आम्ही इथे प्रदूषण मराठी निबंध / Essay on Pollution in Marathi दिला आहे तसेच आम्ही या निबंधामध्ये प्रदुषणाचे सर्व प्रकार दिले आहेत तसेच यामध्येच आम्ही प्रदूषण एक समश्या हा निबंध पण दिला आहे, सोबत प्रदूषणामुळे होणारे नुकसान आणू प्रदूषण टाळण्यासाठीच उपाय देखील या लेखात मी दिले आहे त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.

प्रदुषण वरती काय लिहायचे जेवढे लिहील तेवढेच कमी आहे. प्रदूषण हि सर्व जगातीलच एक मोठी समस्या आहे आज आपण याचीच माहिती घेणार आहोत. प्रदुषण या राक्षसाला माणसानेच अन्न पाणी देऊन मोठा केला आहे.
जर माणसाने सुरूवातीच्या काळातच या राक्षसाचे मुंडके दाबले आसते तर आज ही वेळच आली नसती. पण अजुनही उशीर झाला नाही आत्ताच आपण या राक्षसाचे मुंडके दाबु आणि याला जमीनीत गाढुन टाकु आणि आपल्या पृथ्वीचे रक्षण या राक्षसापासुन करू.

पण जसे की पुराणात सांगितल्याप्रणाणे एखाद्या शञुसी युद्ध करायचे असेल तर त्याची आधी माहिती घ्या म्हणजे त्याला हारवायला सोपे जाईल त्यामुळे या राक्षसाला हरविण्यासाठी आधी आपण त्याची माहिती घेऊ आणि हो हि माहिती फक्त घ्यायची नाही तर आपल्या जवळच्या आपल्या सैन्याला म्हणजेच नातेवाईक मिञ, भाऊ, बहिण यांना पण सांगायची आणि त्यांना पण या राक्षसाच्या लढाईत समाविष्ट करून घ्यायचे.

सगळ्यात आधी प्रदुषण म्हणजे काय आणि ते कशामुळे होते. साध्या सरळ भाषेत सांगायचे झाले तर निसर्गाच्या एखाद्या गोष्टीत मानवाने हस्तक्षेप करून त्यात वाईट बदल घडवुन आणने म्हणजे प्रदुषण होय. जसे की सांगायचे झाले तर स्वच्छ नदीत गहाण, दुषीत किंवा कारखान्यातील केमीकल युक्त पाणी सोडणे होय. यामुळे काय होते तर पाण्याचा नैसर्गिक स्ञोत आहे त्याचे प्रदुषण होते व ते पाणी प्राणी पक्षी व मानव यांना वापरण्याच्या लायक राहत नाही म्हणजे प्रदुषण फक्त पाण्याचेच होते का आणि त्याचे प्रकार आपण आपण पाहु.

प्रदुषाचे प्रकार / Pollution Types in Marathi

प्रदूषण मराठी निबंध

  1. पाणी प्रदुषण
  2. हवा प्रदुषण
  3. भुमी प्रदुषण
  4. ध्वनी प्रदुषण
Water Pollution in Marathi

1. पाणी प्रदुषण / Water Pollution in Marathi 

या मधे मागे पाहिल्याप्रमाणे नैसर्गिक पाणीसाठ्या मधे कारखान्याचे पाणी, मनुष्यवस्तीतील पाणी सोडल्याणे पाणी प्रदुषण होते अनेक कारखाने दुषित पाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडुन देतात, तसेच मनुष्य वस्तीतील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर सोडल्यामुळे खुप मोठ्या प्रमाणावर पाणी प्रदुषण होते.

यामुळे नदी, समुद्र, तलाव यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळेच महाराष्ट्रातील अनेक समुद्र किनार्यावर मासे मृत्यमुखी पडले आहेत. आता आपण पाणी प्रदुषण कमी करण्याचे उपाय पाहु.

पाणी प्रदुषणावरील उपाय – नदीत किंवा समुद्रात सोडल्या जाणार्या दुषीत पाण्याला आळा घालणे. जर एखादा कारखाना किंवा कंपनी विनाप्रक्रीया दुषीत पाणी नदीत सोडत आसेल तर आपण शासकीय यंञनेच्या निदर्शणास आणुन देणे तसेच मिडीयाद्वारे त्या प्रश्नास वाचा फोडणे ही आपली जबाबदारी आहे, तसेच आपल्या घरातुन येणारे पाणी गटारीत न सोडता शक्य आसल्यास शोसखड्यात सोडणे.

Air Pollution in Marathi

2. हवा प्रदुषण / Air Pollution in Marathi

हवा ही माणसाला लागणारा अविभाज्य घटक आणि त्यात जर प्रदुषण झाले तर माणसाचे जीवणच अवघड होईल आता हे हवा प्रदुषण होते कशाने याचे मुख्य कारण आहे वाहणातुन निघणारा धुर, तसेच कंपन्यातुन निघणारा धुर, तसेच कचरा जाळणे यामुळे हवा प्रदुषण होते. वाहणामुळे वातावरणात कार्बण डायऑक्साईड हवेत सोडला जातो त्यामुळे तापमाण वाढते. तसेच हा कार्बण डायऑक्साईड ओझोन च्या थरालाही हाणी पोहचवतो.

प्रदुषण मुख्य करून शहरी भागात मोठ्या प्रमाणात आहे दिल्ली सारख्या शहरात हे प्रमाण हाताबाहेर गेले आहे. तसेच जगातील सर्वात ष्रदुशित शहरे भारतात आहेत.

हवा प्रदुषणावरील उपाय – सरकारी यंञना हे प्रदुषण थांबवण्यासाठी प्रयत्न करतेय पण जो पर्यंत्न आपण मनावर घेणार नाही तो पर्यंत त्यांना यश मिळणार नाही म्हणुन आपण पण त्यांना मदत करावी लागेल.

मग आपण काय करायचे जर तुम्ही शहरात राहात असाल तर गाडीचा वापर कमी करायचा शक्यतो सार्वजनिक बस वापरायची आठवड्यातुन एक दिवस तरी गाडी वापरायचे टाळायचे.

जर पर्यायच नसेल तर बॅटरीवर चालणारी वाहणे वापरायची किंवा सायकलचा वापर करायचा आणि शेवटी सगळ्यात महत्वाचे जास्तीत जास्त झाडे लावायची शक्य आसेल तिथे घराजवळ आणि इतरञ झाडे लावा व इतरांना पण सांगा.

Land Pollution in Marathi

3. भुमी प्रदुषण / Land Pollution in Marathi

भुमी प्रदुषणाचे प्रमाण शहरी भागात जास्त आहे कारण शहरात काही ठिकाणी कचर्याची व्यवस्था नसल्यामुळे कचरा इतरञ टाकला जातो आणि भुमी प्रदुषण होते यामुळे जमिणीचा स्तर खालावला जातो आणि या जमिनीची पिके उगवण्याची क्षमता कमी होते.

भुमी प्रदुषणावर उपाय – कचरा शक्यतो कचरा कुंडीतच टाकणे ओला व सुका कचरा वेगळा करणे.

वेगळे ठेवणे घंटा गाडी मध्ये कचरा टाकणे तसेच इतरत्र कचरा टाकणे कटाक्षाने पाळणे तर भुमी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल तसेच मेडिकल कचरा वर लक्ष ठेवणे जर कचरा इतरत्र दिसला तर शासकीय यंत्रणेला कळवणे.

Noise Pollution in Marathi

4. ध्वनी प्रदूषण / Noise Pollution in Marathi

ध्वनी प्रदूषण करणारे मुख्य घटक वाहणारे आवाज मोठा मोठयाने लावलेले स्पिकरचे आवाज यामुळे मानसिक आजार होऊ शकतात तसेच डोकेदुखी सारखे आजार होतो तसेच दवाखान्यातील रग्णांना त्रास होऊ शकतो.
ध्वनी प्रदूषण उपाय- शक्यतो कमी आवाज असणारे वाहनाचा वापर करणे बँटरी वरील असतील तर अतिशय उत्तम तसेच दवाखान्यातील आवारात हाॅर्न चा वापर न करणे सार्वजनिक ठिकाणी कमी आवाजात गाणी किंवा भाषण करणे हे काही उपाय.
चला तर मग आता प्रदुषणाची सर्व मिळाली असेल तर सर्वानी आता कामाला लागा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पर्यंत पोहोचवा आणि प्रदूषण रूपी राक्षसाला जमीनीत गाडुन आपली धरती सुजलाम सुफलाम करुया.

प्रदूषणामुळे होणारे नुकसान

  • हवेच्या प्रदूषणामुळे माणसांना, प्राण्यांना व पक्ष्यांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे.
  • मानवांना श्वासोच्छवास, दमा, खोकला, त्वचेचे रोग इत्यादी रोगांचा सामना करावा लागत आहे.
  • प्रदूषणामुळे ओझोन थर खराब होत चालला आहे, कारण अल्ट्राव्हायोलेट किरण शोषून घेण्याची शक्ती आता कमी होत चालली आहे.
  • सूर्यापासून किरणांमुळे लोकांना त्वचेचा कर्करोग होत आहे.
  • हववतील प्रदूषणामुळे जगातुल लोकांना फुफ्फुसांशी(LUNGS) संबंधित आजार होऊ लागले आहेत.
  • हिवाळ्यामध्ये धुके आणि वायू प्रदूषणामुळे लोकांना नीट दिसत नाही आणि डोळ्यात जळजळ होते.
  • वायू प्रदूषण आणि सूर्याच्या उष्णतेमुळे वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड वायू, नायट्रोजन ऑक्साईड गॅस इत्यादींचा प्रमाण वाढत आहे, जे आपल्या सर्वांसाठी हानिकारक आहे.
  • हवेच्या प्रदूषणामुळे ऍसिड रेन बघायला भेटत आहे, जो मानवी जीवनासाठी समस्येची बाब बनली आहे.

Conclusion

प्रदूषण हे एका दिवसात किंवा एखाद्या व्यक्तीकडून ठीक कोण्यासारखी समस्या नाही आहे. मुळापासून प्रदूषण दूर करण्यासाठी, संतुलित लढाई जागतिक स्तरावर लढावी लागेल. जेणेकरून प्रभावी परिणामांची जगात अपेक्षा केली जाऊ शकते. तथापि, बदल घरापासून सुरू होतो, म्हणून जर आपल्याला निसर्ग रडताना पाहू इच्छित नसाल तर आजपासूनच नवीन झाडे लावायला सुरवात करा, धूम्रपान करणे बंद करा, नदी नाल्यांचे पाणी दूषित करू नका व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी जोरजोराने हॉर्न वाजवायचे बंद करा. अशीच छोटी छोटी पावले जर सगळ्यांनी उचलली तर प्रदूषणावर आला घातला जाऊ शकतो.

मित्रांनो प्रदूषणावर आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. तुमच्या कडे सुद्धा प्रदूषण टाळण्यासाठीचे उपाय असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे पण वाचा – 
 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment