महावितरण बिल कॉपी | महावितरण बिल चेक करणे | Light Bill Baghne | How to Check Mahavitaran Bill in Marathi
लाईट बिल कसे पहावे? | Light Bill Kase Pahave
ऑनलाइन एम एस ई बी(MSEB) बिल चेक करणे साठी लागणार्या गोष्टी
- ग्राहक क्रमांक
- बिलींग युनिट
- बिलींग युनिट नसला तरी चालेल पण मग तुम्हाला आख्या लिष्ट मधे बिलींग यूनिट शोधत बसावे लागेल.
त्यामुळे तुमचा खुप वेळ जाईल म्हणुन ग्राहक कमांक आणि बिलींग युनिट दोन्ही असेल तर तुम्ही लगेच ऑनलाइन महावितरण बिल कॉपी डाऊनलोड करू शकता.
त्यानंतर इंटरनेट असलेल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर गूगल उघडा गूगल मधे ‘mahadiscom’ सर्च केल्यानंतर पहिला जो रिझल्ट दिसेल त्यावर क्लिक करा.महावितरणची वेबसाईट उघडल्यावर त्यानंतर उजव्या बाजुला ‘quick bill Payment’ असे दिसेल त्याच्या खाली ‘To view bill details’ वरती क्लिक करा.
त्यानंतर ‘View/pay bill’ चे पेज उघडेल या पेज वरती तुम्ही लाईट बिल पाहु शकता तसेच त्याची काॅपी पण डाउनलोड करू शकता आणि लाइट बिल भरू पण शकता.
पेज उघडल्यानंतर ‘consumer type’ आपोआप निवडला जाईल तिथे काहीही करु नका. त्यानंतर consumer No मधे तुमचा ग्राहक क्रमांक टाका.
मग त्यानंतर खाली BU लिहले आहे त्याच्या समोर बिलींग युनिट टाका. जर बिलींग युनिट माहित नसेल तर त्याच्या समोर Select असे लिहले आहे.
त्यामधे तुमचा बिलींग यूनिट शोधा पण त्यासाठी तुमचे शहर असेल तर ठीक आहे ते तुम्हाला सापडेल पण गाव असेल तर ते कुठल्या बिलींग यूनिटमधे येते हे तुम्हाला माहित पाहिजे.
बिलींग युनिट टाकल्यानंतर तुमच्या बिलींग युनिटचे नाव आपोआप येईल ते बरोबर आहे याची खात्री करा त्यानंतर तुम्हाला खाली ५ आकड़े दिसतील.
ते नचुकता Captcha असे लिहलेल्या ठिकाणी भरा आणि त्यानंतरच्या submit च्या बटणावर क्लिक करा.
सबमिट केल्यावर खालच्या बाजुला तुमचे लाईट बिल दिसू लागेल. तसेच तुमची बिलाची रक्कम आणि बिल भरण्याची शेवटची तारीख पण दिसेल तिथे View bill असे लिहले असेल त्या ठिकाणी क्लिक करा म्हणजे तुमच्या बिलाची सॉफ्ट कॉपी उघडेल. संदर्भासाठी खालचा फोटो पहा.
Image credit – mahadiscom.in |
तुमचे लाइट बिल उघडल्यानतर ‘View Printable version’ असे वरच्या बाजूला लिहलेले दिसेल त्यावर क्लिक करा.
त्यानंतर बिल PDF फॉरमॅट मधे उघडेल वरच्या बाजूला उजव्या कोपर्यात ‘Print/Download’ असे लिहले आहे त्यावर क्लिक करा.
त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो उघडेल त्यामधे सेव्ह चे बटण शोधा आणि सेव्ह च्या बटणावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला जिथे लाईट बिल सेव्ह करायचे तो फोल्डर निवडा आणि सेव्ह करा आता तुमचे लाइट बिल त्या फोल्डर मधे सेव्ह होईल.
मोबाईल मधे महावितरण बिल कॉपी डाऊनलोड करणे –
मोबाईल मधे महावितरण बिल कॉपी डाऊनलोड करण्यासाठी सर्व प्रसोस वर दिल्याप्रमाणेच करा पण फक्त मोबाईल मधे क्रोम बाऊझर वापरा म्हणजे तुम्हला किही समस्या येणार नाही.
वरील प्रमाणे सर्व प्रोसेस केल्यावर जेव्हा बिल उघडेल त्यावेळी ‘Print/Download’ वरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईल मधे ‘save as PDF’ निवडा.
त्यानंतर तुमच्या मोबाईल मधे जिथे महावितरण बिल सेव्ह करायचे आहे त्याचा फोल्डर निवडा आणि सेव्ह करा तुमचे लाईट बिल सेव्ह होईल.अधिक माहिती साठी खालील फोटो पहा.
जर तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा बिल डाउनलोड होत नसेल खाली कमेंट करा आम्ही त्याची उत्तरे नक्की देऊ.
आभारी आहे , साध्या सोप्या पद्धतीने सांगितले बदल 🙏🙏🙏
Welcome
धन्यवाद..