पोलीस भरती कागदपत्रे | Police bharti document

विद्यार्थी मिञांनो या लेखामधे आपण पोलिस भरती माहिती पाहणार आहोत. तसेच पोलिस भरती कागदपञे याची सुद्धा माहिती या लेखात पाहणार आहोत. या लेखामध्ये आम्ही पोलिस भरतीसाठी महत्वाची असणारी सर्व माहिती दिली आहे.

या लेखामधे आपण पोलिस भरतीची खालील माहिती पाहणार आहोत.

1. शैक्षणिक पाञता

2. लेखी परिक्षा माहिती

3. शरिरीक पाञता

4. पोलिस भरती कागदपञे

1.शैक्षणिक पाञता – महाराष्ट्र पोलिसमधे हवालदार किंवा काॅन्सटेबल या पदावर भरती होण्याकरता कमीत कमी 12 ( बारावी ) पास तसेच बारावी ही कोणत्याही शाखेची असली तरी चालते.

वयाची अट – पोलिस भरतीसाठी असणारी वयाची अट खालील प्रमाणे आहे.

खुला गट / Open – 18 ते 28

इतर मागास वर्ग / OBC – 18 ते 31

अनुसुचित जाती आणि जमाती / SC,ST – 18 ते 33

2. लेखी परिक्षा माहिती – लेखी परिक्षेसाठी खालील अभ्यासक्रम असतो

2.1. अंकगणित – 25 प्रश्न, 25 गुण

2.2. सामान्य ज्ञान व चालु घडामोडी – 25 प्रश्न 25 गुण

2.3. बुद्धीमत्ता चाचणी – 25 प्रश्न 25 गुण

2.4. मराठी व्याकरण – 25 प्रश्न 25 गुण

लेखी परिक्षे मधे 100 प्रश्न हे 100 गुणांसाठी असतात तसेच या परिक्षेचा वेळ 90 मिनीटे असतो. तसेच या परिक्षेत निगेटीव मार्कींग नसते म्हणजेच तुमचे उत्तर चुकल्यास तुमचे गुण वजा होणार नाहीत.

पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन उपलब्ध आहेत पोलीस भरती परीक्षेच्या ऑनलाईन प्रश्नपत्रिका इथे उपलब्ध आहेत – Police Bharti Question Papers in Marathi

3.  पोलीस भरती शारीरिक पात्रता – पोलिस भरतीसाठी लागणारी शारिरीक पाञता खालील प्रमाणे

पुरूष उमेदवार – 

उंची – 165 से मी कमीत कमी

छाती – 79 से मी कमीत कमी आणि फुगवुन 5 से मी

म्हणजेच पुरूष उमेदवाराची छाती न फुगवता कमीत कमी 79 से मी पाहिजे व फुगवुन 84 से मी कमीत कमी पाहिजे.

महिला उमेदवार

उंची – 155 से मी

शारिरीक परिक्षेतील घटक

पुरूष उमेदवारासाठी

1. लांब धावणे – 1600 मीटर – 20 गुण

2. जवळ धावणे – 100 मीटर – 15 गुण

3. गोळाफेक (7.260 किलो ) – 15 गुण

 महिला उमेदवार

1. लांब धावणे – 800 मीटर – 20 गुण
 
2. जवळ धावणे – 100 मीटर – 15 गुण
 
3. गोळाफेक (4 किलो ) – 15 गुण
अशाप्रकारे शारिरीक परिक्षा हि 50 गुणांची असते.

 

4. पोलिस भरती कागदपञे – पोलिस भरतीसाठी खालील कागदपञे लागतात या यादी मधे आम्ही सर्व गटाच्या विद्यार्थांना लागणारी कागदपञे दिली आहेत.

1. 10 वी 12 मार्कलिस्ट व बोर्ड प्रमाणपञ (  Board Certificate ) – हे कागदपञ सर्व गटातील विद्यार्थांना लागते

2. जात प्रमाणपञ ( Cast Certificate ) – जे विद्यार्थी आरक्षणाच्या कोट्यातुन अर्ज भरत आहेत अशा सर्व विद्यार्थांना जात प्रमाणपञ आवश्यक आहे

3. जात पडताळी (Cast Validity ) –  जे विद्यार्थी आरक्षणाच्या कोट्यातुन अर्ज भरत आहेत अशा सर्व विद्यार्थांना जात पडताळी प्रमाणपञ आवश्यक आहे.

4. डोमासाईल किंवा राष्ट्रीयत्वाचा दाखला (Domicile) – हे कागदपञ सर्व गटातील विद्यार्थांना लागते

5. नाॅन क्रिमे लियीयर प्रमाणपञ – विमुक्त जाती-अ, भटक्या जमाती-ब, भटक्या जमाती-क, भटक्या जमाती-ड, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या मागास प्रवर्गातील उमेदवारांनी ते उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले लगतच्या आर्थिक वर्षांचे मूळ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Latest Non Creamy Layer Certificate) तसेच प्रमाणपत्रांची साक्षांकित छायाप्रत कागदपत्र छाननीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.

6. शाळा सोडल्याचा दाखला –  हे कागदपञ सर्व गटातील विद्यार्थांना लागते ज्या विद्यार्थांची शाळा चालु आहे अशा विद्यार्थांनी शाळेतुन बोनाफाईड द्यावे

7. एमएससीआयटी (MSCIT) प्रमाणपञ –  हे कागदपञ सर्व गटातील विद्यार्थांना लागते हे प्रमाण पञ कंपलसरी नाही पण जर समान मार्क पडल्यास वाल्याला आगोदर घेतले जाते

8. आधार कार्ड –  हे कागदपञ सर्व गटातील विद्यार्थांना लागते

9. पॅन कार्ड –  हे कागदपञ सर्व गटातील विद्यार्थांना लागते

10. वाहन परवाना – वाहन परवाना हा ज्या विद्यार्थांनी ड्रायवर पदासाठी अर्ज केलेत त्यांना लागते. तसेच हा परवाना हलके चारचाकी वाहन (LMV -TR) या गटातील पाहिजे.

11. उत्पन्नाचा दाखला –  हे कागदपञ सर्व गटातील विद्यार्थांना लागते

12. खेळाडु प्रमाणपञ – जे विद्यार्थी खेळाडु कोट्यातुन अर्ज भरत आहेत अशा सर्व विद्यार्थांना खेळाडु प्रमाणपञ आवश्यक आहे.

13. इतर मागस प्रमाणपञ – जे विद्यार्थी इतर मागस कोट्यातुन अर्ज भरत आहेत अशा सर्व विद्यार्थांना इतर मागस प्रमाणपञ आवश्यक आहे.

14. प्रकल्पग्रस्त किंवा भुंकपग्रस्त – जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त किंवा भुंकपग्रस्त कोट्यातुन अर्ज भरत आहेत अशा सर्व विद्यार्थांना प्रकल्पग्रस्त किंवा भुंकपग्रस्त प्रमाणपञ आवश्यक आहे.

15. माजी सैनिक किंवा होमगार्ड प्रमाणपञ – माजी सैनिक व होमगार्डसाठी जागा राखीव असतात जे विद्यार्थी माजी सैनिक किंवा होमगार्ड कोट्यातुन अर्ज भरत आहेत अशा सर्व विद्यार्थांना माजी सैनिक किंवा होमगार्ड प्रमाणपञ आवश्यक आहे.

16. पोलिस पाल्य प्रमाणपञ – पोलीस पाल्यांच्या मुलांना पोलीस भरतीत जागा राखीव असतात. पोलिस पाल्य कोट्यातुन अर्ज भरत आहेत अशा सर्व विद्यार्थांना पोलिस पाल्य प्रमाणपञ आवश्यक आहे.

17. अनाथ व्यक्ती प्रमाणपञ – अनाथ मुलांना पोलीस भरतीत जागा राखीव असतात. अनाथ व्यक्ती कोट्यातुन अर्ज भरत आहेत अशा सर्व विद्यार्थांना अनाथ व्यक्ती प्रमाणपञ आवश्यक आहे.

18. नावाची गॅझेट काॅपी – हे प्रमाणपञ विवाहीत स्ञियांसाठी लागतात ज्या स्ञियांचे नाव लग्नानंतर बदलले आहे अशांसाठी हे प्रमाणपञ लागते

19. उमेदवाराचे फोटो – फोटो हे रंगीत पाहिजे व आयडेंटिटी साइझ चे 6 (सहा) फोटो लागतील

पोलीस भरती कागदपत्रे पडताळणी साठी जाता वरील कागदपञाच्या मुळपञी आणि झेराॅक्स चे दोन सेट घेऊन जावे. तसेच एखादे प्रमाणपञ नसल्यास काळजी करू नये तुमची जर निवड झाली तर त्यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो त्यावेळेत ते प्रमाणपञ सादर करावे.

हे पण वाचा – 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment