विद्यार्थी मित्रांनो आपण या लेखात आपण माझी शाळा मराठी निबंध पाहणार आहोत. तसेच हा My School Essay in Marathi आम्ही अतिशय सध्या आणि सरळ भाषेत लिहून दिला आहे. हा तुम्हला निबंध कसा वाटला कंमेंट द्वारे नक्की कळवा.
माझी शाळा विधेचे माहेर घर म्हणजे माझी शाळा. शाळेत आपल्याला खूप काही शिकता येते. शाळा हे ज्ञानाचे मंदिर म्हणून ओळखले जाते प्रत्येक विध्यार्थ्यांच्या आयुष्यात शाळा हि महत्वाची भूमिका बजावत असते. प्रत्येक मूल हे शाळेत जाण्या पूर्वी अज्ञानी असते परंतु ते शाळॆत गेल्या वर सज्ञान होते ते केवळ शाळेमुळेच. शाळेत आपल्याला खूप काही शिकायला मिळते. शाळा आपल्याला चांगला माणूस म्हणून जगायला शिकवते. शाळा प्रत्येक मुलाच्या आयुष्यात खूप महत्वाची असते कारण शाळा हि त्या मुलाला भविष्यात कसे राहायचे ते शिकवत असते.
माझ्या शाळेचे नाव श्री शिवाजी विद्यालय आहे माझ्या शाळेचा परिसर हा खूप सुंदर आहे माझ्या शाळे मध्ये १ ते १२ पर्यंतचे वर्ग आहेत, संगणकलॅब आहे, मैदान, वाचनालय, लॅब्रोटरी, सभागृह आणि खूप झाडे आहेत. माझी शाळा हि अतिशय सुंदर आहे. तिथे माझे खूप मन रमते माझ्या शाळेत शिस्तीला फार महत्व दिले जाते प्रत्येक मुलाला शिस्तीचे महत्व पटावे व ते स्वयम शिस्त व्हावे या कडे फार लक्ष दिले जाते.
शाळेचा पहिला गजर होताच सर्व मुलं एकत्र जमतात व प्रार्थना करतात तेव्हा त्या ठिकाणचे वातावरण हे अतिशय आनंदी होते मुले तितक्याच उत्सहाने प्रार्थना म्हणतात. माझ्या शाळेत अभ्यासा बरोबर विविध जयंत्या आणि सण साजरे केले जातात. तसेच मुलांसाठी भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अश्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.
माझ्या शाळेतील शिक्षक हि खूप छान आहेत ते सर्व मुलांना शिस्तीचे धडे शिकवतातच शिवाय ते सर्वाना मार्गदर्शन सुद्धा करतात ते अभ्यासा बरोबर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन सुद्धा करतात व ते स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा करून घेतात. आमच्या शाळेचे वाचनालय अतिशय सुंदर आहे तेथे विद्यार्थ्यंचे खूप मन रमते तेथे सर्व प्रकारची पुस्तके मुलांना वाचनासाठी उपलब्ध आहेत माझ्या शाळेत अभ्यासा बरोबर खेळालाही खूप महत्व दिले जाते.
आमचा शाळेत खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल असे अनेक खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातून आमच्या शाळेतील काही विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेत जाऊन आलेत. लवकरच राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू पाठवायचा शाळेचा मानस आहे. त्याच बरोबर मुलांना दिवाळीच्या व उन्हाळयाच्या सुट्टीत विविध शिबिरांचे आयोजन केले जाते व त्याद्वारे खेळाचे, व्यायामाचे व इतर महत्वाच्या विषयाचे महत्व शिकवले जाते.
माझ्या शाळेची सहल हि दर वर्षी काढली जाते त्या मध्ये प्रत्येक विध्यार्थी सामील होऊन खूप धमाल करतो. माझ्या शाळेचे महत्वाचे म्हणजे १० वी चा निकाल हा खूप चांगला लागतो त्या मध्ये अतिशय चांगल्या मार्कानी अनेक विध्यार्थी पास होतात व गुणवंत विध्यार्थीचे कौतुक हि केले जाते.
माझी शाळा हि प्रत्येक मुलावर उत्तम संस्कार करते माझे दुसरे घर मला माझी शाळा वाटते माझ्या शाळेत मला खूप सारे चांगले मित्र मिळाले हे माझे खूप मोठे भाग्य समजतो मी माझ्या शाळेचा आदर करतो मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे म्हणून माझी शाळा मला फार आवडते.
शैक्षणिक वर्गां व्यतिरिक्त, आमच्या शाळेतील विद्यार्थी वर्ग नृत्य, संगीत आणि कला यांचा देखील आनंद घेतात. आम्हाला संगणकाचे ज्ञानही आमच्या शाळेत दिले जाते आणि त्यासाठी माझ्या शाळेत स्वतंत्र संगणक लॅब आहे. माझ्या शाळेत स्वसंरक्षण आणि नैतिक शिक्षण याचे देखील मार्गदर्शन प्रदान करते. माझ्या शाळेत सर्व क्रीडा साहित्य आणि उपकरणे उपलब्ध आहेत. मला PT च्या वेळात क्रिकेट खेळायला खूपआवडते.
माझी शाळा ग्रामीण भागात’असली तरी आम्ही खूप वेगाने आत्याधुनिक पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करत आहोत आमचा मुख्याध्यापकांनी गेल्याच आठवड्यात सांगितले कि सर्व विषय हे ऑनलाईन शिकवले जाणार आहेत व ते प्रोजेक्टर वर शिकवले जाणार आहेत त्या शाळेने प्रोजेक्टर सुधा खरेदी केले मला अशा शाळेचा भाग होता आले हे माझे सौभाग्य समजतो व आमचे भविष्य सुंदर व कार्यक्षम बनवत राहो व चांगले विद्यार्थी घडवत राहो.
Essay On My School In Marathi 150 Words
माझी शाळा आमच्या शहरातील सर्वात चांगली आणि लोकप्रिय शाळा आहे. माझ्या शाळेचे नाव “श्री शिवाजी विद्यालय आहे”. माझ्या वर्ग शिक्षकाचे नाव सुचिता पाटील आहे. माझ्या शाळेची इमारत खूप मोठी आहे आणि आजूबाजूचे परिसर हिरवेगार आहे. माझ्या शाळेमध्ये विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळण्यासाठी एक प्रचंड मोठे खेळाचे मैदान आहे जिथे आम्ही सर्वजण कबड्डी, खो खो खेळतो. माझ्या शाळेत आठवड्यातून एकदा शारीरिक शिक्षण वर्ग आयोजित केले जातात. आमच्या शाळेमध्ये अतिशय प्रेमळ आणि आम्हा सर्वांची काळजी घेणारे शिक्षक आहेत. माझ्या सर्वात आवडीचे शिक्षक आहेत कैलाश सर कारण त्यांनी मला चित्रकलेत आवड निर्माण करायला खूप मदत केली. माझ्या शाळेत बरेच मित्र आहेत ज्यांच्याशी मी एकत्र खेळतो आणि एकत्र अभ्यास करतो. माझ्या शाळेमध्ये एक मोठी लायब्ररी देखील आहे जिथे मला वेगेवेगळी पुस्तके वाचायला खूप मजा येते. माझ्या शाळेची विज्ञान प्रयोगशाळ सर्व उपकरणांनी सुसज्ज आहेत. बरेच राष्ट्रीय आणि धार्मिक उत्सव माझ्या शाळेत मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मला माझ्या शाळेत जाणे आवडते कारण तिथे मला दररोज नवीन गोष्टी शिकायला भेटतात.
10 lines on My School in Marathi
- माझे नाव श्रेया आहे आणि माझ्या शाळेचे नाव आहे “श्री शिवाजी विद्यालय“
- माझ्या शाळेत ५५ शिक्षक आहेत, जे आम्हाला पूर्ण मेहनत घेऊन नवीन नवीन गोष्टी शिकवतात.
- आमच्या शाळेत पाच कार्यालये आहेत, एक प्राचार्यांसाठी आणि बाकीचे चार दुसऱ्या शिक्षकांसाठी.
- आमच्या शाळेत सर्व विद्यार्थी राखाडी आणि पांढर्या ड्रेसमध्ये येतात.
- आमच्या शाळेत सायन्स विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज प्रयोगशाळेची स्थापना केली गेली आहे.
- शाळेतिल एका भागामध्ये स्वच्छ पाणी आणि कॅन्टीनची व्यवस्था देखील केली गेली आहे.
- माझ्या शाळेमध्ये दोन खेळाचे मैदान आणि एक सुंदर बाग देखील आहे.
- दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी शाळेत बर्याच स्पर्धा आयोजित केल्या जातात.
- अभ्यासाबरोबरच माझ्या शाळेद्वारे शारीरिक आणि मानसिक विकासाचीही काळजी घेतली जाते.
- माझ्या शाळेमध्ये सर्व मुलांना घरून घेऊन येण्यासाठी आणि परत त्यांना घरी सोडण्यासाठी १० बसेस आहेत
अशी हि माझी शाळा करोना आला होता तेव्हा पूर्ण पणे बंद झाली होती. शाळेच्या मैदानावर खूप सारे गवत उगवले होते कारण वर्षभरापासून तिथे विद्यार्थीच गेले नाहीत, खेळले नाहीत, मैदान सुद्धा त्यांची वाट बघत होता. आणि पण काहीच दिवसात करोना रोगावर मत करायला लस आली आणि आता पुन्हा शाळा आधी सारखी विध्यार्थ्यानी भरून गेली आहे. माझी शाळा खूप सुंदर आहे आणि मला माझ्या शाळेचा अभिमान आहे.