किल्ल्यांची माहिती | महाराष्ट्रातील किल्ले | Killyanchi Mahiti | Maharashtratil Kille

किल्ल्यांची माहिती | महाराष्ट्रातील किल्ले | Killyanchi Mahiti | Maharashtratil Kille

Killyanchi Mahiti: तसे पहिले तर शिवरायांचे ३५० किल्ले होते पण त्यापैकी जे आज चांगल्यापैकी अस्तित्वात आहेत अशा किल्यांची माहिती आपणास देणार आहोत. तसेच या किल्यावर कसे जायचे हेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.  
raigad fort information in marathi
Raigad fort information in Marathi

 

kalyan chi mahiti | किल्ल्यांची माहिती मराठी

1. रायगड– जसे शिवाजी महाराज म्हटले की आपल्याला प्रथम आठवतो म्हणजे रायगड. याच रायगडाविषयी आज आपण पाहणार आहोत. हा किल्ला १६५६ मधे शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदलकर यांच्याकडून बांधुन घेतला. हा किल्ला अतिशय अभेद व बलाढ्य आहे, या किल्यावर जर आपल्याला जायचे असेल तर १७३७ पाय-या चढुन जावे लागते. आपण हा किल्ला दोन तासात चढुन जाऊ शकतो जर तुम्हाला या पाय-या चढून जायचे  नसेल तर तुम्ही रोपवे ने सुद्धा जाऊ शकता हा लेख २०२२ मधल्या माहिती च्या आधारे आहे म्हणून २०२२ मधे रोपवेला २०० रुपये तिकीट आहे एका फेरीसाठी तुम्हाला रोख रुपये २०० दयावे लागतील.

गडावर पाहण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाणे आहेत. गड पाहण्यासाठी तुम्हाला कमीत कमी दोन तास लागतील.तेव्हा रायगड पाहायचा असेल तर सकाळी लवकरात लवकर पोहचण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही पावसाळ्यात गेला तर हिरवळ अतिशय उत्तम दिसते.गडावरील

पाहण्याची ठिकाणी :- दरबार,राजमहाल,राण्यांचे महाल टकमक टोक, बाजारपेठा,हिरकणी बुरूज शिवरायांची समाधी. 

रायगड किल्ल्याविषयी सविस्तर माहिती इथे वाचा – Raigad Fort information in Marathi 

कसे पोहचाल:- पुणे येथुन रायगडला महाराष्ट्र राज्य परिवहन ची बस आहे तसेच. जर स्वताची गाडी असेल तर पुणे येथुन ताम्हीणी घाट मार्गे जाऊ शकता.

शिवनेरी

 

 

2. शिवनेरी – शिवनेरी हे शिवरायांचे जन्मस्थान आहे या ठिकाणी शिवरायाचा जन्म झाला शिवनेरी हा ३५०० फुट उंचीवरचा किल्ला आहे. या किल्याची चढाई मध्यम आहे या किल्यावर तुम्ही एका तासात पोहचु शकता ही इमारत दोन मजली असुन त्याकाळच्या बांधकामाचा एक उत्तम नमुना आहे.

गडावरील पाहण्याची ठिकाणी :- गडावर पाहण्यासाठी असणारी ठिकाणे शिवाई दिवीचे मंदिर, गुहा, मुख्य दरवाजा,तसेच शिवजन्म स्थानाची इमारत इ आहेत.

कसे पोहचाल:- जुन्नर येथे गेल्यावर गडावर जाण्याचे मार्ग जुन्नर गावातूनच जातात जुन्नर येथे जाण्यासाठी पुणे व मुंबई येथुन महाराष्ट्र राज्य परिवहन ची बस आहे. तसेच स्वताचे वाहन असल्यास पुणे येथून चाकण, मंचर ,नारायणगाव मार्गे जुन्नर ला पोहचू शकता.



राजगड

3. राजगड – राजगड म्हणजे राजांचा गड राजगड असी म्हण आहे.राजगड हा अतिशय बलाढ्य आणि अतिशय उंच असा किल्ला आहे या किल्याची उंची समुद्रसपाटीपासुन १३९४ मीटर आहे.या किल्यावर जाण्यासाठी किमीत कमी तीन तास व जास्तीत चार तास लागतात हा किल्ला चढाईस अवघड आहे तसेच चढाईचा रस्ताही अवघड असल्याळे हा किल्ला चढण्यासवेळ लागतो असे म्हणतात की जो माणूस राजगड पुर्ण चढू शकतो तो माणुस सगळे किल्ले चढू शकतो. तसेच राजगडावरून जवळच आसणारा तोरणा व सिंहगड हे किल्ले सहजपणे दिसतात.

गडावर चढून जाण्यासाठी  ४ ते ५ तास लागतात तसेच पुर्ण गड फिरुन पाहण्यासाठी २-३ तास लागतात त्यामुळे राजगड पाहायला जाताना सकाळी लवकर जाण्याचा प्रयत्न करा. तसेच इथे रायगडासाररवा रोपवे नाही म्हणुन हागड पुर्णपणे चढुनच जावा लागतो हा किल्ला पुणे शहरापासुन ४८ किमी आहे.

गडावरील पाहण्याची ठिकाणी :- राजगडावरील सईबाईंची समाधी, अर्धचंद्र तलाव,सुवेळा माची,पदमावती तलाव,राजवाडा, संजिवनी माची,काळेश्वरी बुरुज.

कसे पोहचाल:- पुणे येथील बसस्थानकावर महाराष्ट्र राज्य परिवन मंडळाच्या बसने किंवा खाजगी वाहनाने पण जाऊ शकता पुणे-शिरवळ-राजगड.

 
तोरणा

4. तोरणा – तोरणा या किल्ल्याला प्रचंडगड असे पण म्हणतात हा पण किल्ला पुणे जिल्हात आहे अतिदुर्गम अतिविशाल असा हा किल्ला आहे.पुणे येथून तोरणा किल्लाये अंतर ६० किमी इतके आहे तोरणा हा शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे असे म्हटले जाते की हा किल्लाजिंकुन स्वराज्याचे तोरण शिवरायांनी बांधलेया गडावर जर पावसाळ्यात गेला तर अतिशय  उत्तम असे निसर्ग  सैंदर्य तुम्हाला पहायला मिळेल पण लक्षात ठेवा या किल्ल्यावर निसरडी वाट आहे त्यामुळे काळजीपुर्वक जावे या किल्ल्यावर पोहचण्या साठी २ ते ३ तीन लागतात पण हा किल्ला राजगडापेक्षा चढाइला सोप्पा आहे.

गडावरील पाहण्याची ठिकाणी :– भंगाई देवीचे मंदिर मुख्य दरवाजा, झुंजारमाची, बुधला माची, बिनी दरवाजा, किल्लेदारांच्या घराचे अवशेष इ.

कसे पोहचाल:- गडावर जाण्यासाठी गडाच्या पायथ्याशी वेल्हे हे तालुक्याचे गाव आहे तेथे पुणे येथुन वेल्हेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन बस आहे पुणे ते वेल्हे ६० किमी आहे तसेच स्वताच्या वाहणाने पुणे-नसरापुर-वेल्हे मार्गे जाऊ शकता.

 
प्रतापगड

5. प्रतापगड- प्रतापगड हा शिवरायांच्या अतिशय महत्वाच्या किल्यापैकी एक किल्ला आहे अफजलखानाचा वध शिवरायांनी याच प्रतापगडाच्या पायथ्याशी केला प्रतापगडाची उंची ही १२०० मीटर पर्यंत आहे तसेच त्याचा प्रकार हा गिरीदुर्ग आहे तसेच प्रतापगडाची चढाइची श्रेणी सोपी आहे.

गडावरील पाहण्याची ठिकाणी :- टेहाळणी बुरूज,महादरवाजा,चिलखती बुरूज, केदारेश्वराचे मंदिर,जिजामातां वाडा, इतर गडांच्या तुलनेत प्रतापगड हा अतिशय मजबुत तटबंदी असलेला किल्ला आहे. महाबळेश्वर पासून ८ मैलावर दोन गावामधल्या डोपर्या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे.

कसे पोहचाल:- पुणे व मुंबई येथुन महाबळेश्वर ला महाराष्ट्र राज्य परिवहन ची बस आहे तसेच महाबळेश्वर येथून खाजगी वाहनाने जाता येते तसेच स्वताचे वाहण असल्यास पुणे-शिरवळ- खंडाला-वाई-पाचगणी मार्गे महाबळेश्वर ला जाता येते.

 
पुरंदर

6. पुरंदर – पुरंदर हा किल्ला छत्रपती संभाची महाराजांचे जन्मस्थान आहे या ठिकाणी १४ मे रोजी संभाजी महाराजांची जंयती उत्साहात साजरी होते. पुरंदर किल्याची उंची १५०० मीटर आहे पुरंदर हा किल्ला चढाईस सोप्पा आहे तसेच आपण किल्यावर एका तासात पोहचू शकतो.सासवड पासुन पुरंदर हा किल्ला १५ कि मी आहे तसेच या किल्यावर भारतीय सेनेचा कॅम्प असल्यामळे हा किल्ला पाहयला जाताना ओळखपञ नक्की सोबत घेऊन जा.

गडावरील पाहण्याची ठिकाणी :-  बिनी दरवाजा,पुरंदरेश्वर मंदिर,रामेश्वर मंदिर,दिल्ली दरवाज,खंदकडा,पद्मवती तळे, शेंद-या बुरूज पुरंदर माची,भैरवगड बीर मुरारबाजी

कसे पोहचाल:- पुणे येथुन सासवडला यावे व सासवड येथुन सासवड – भोर किंवा सासवड नारायणपूर यापैकी एक गाडी घ्यावी या गाड्या पुरंदर घाटमाथा इथे थाबंतात. स्वताचे वाहण असेल तर पुणे- सासवड-पुरंदर मार्गे पोहचता येते.

 
लोहगड

7. लोहगड – लोहगड हा किल्ला अतिशय सुरेख व अजुनही चांगल्यापैकी सुस्थितीत आहे या किल्यावरच्या अनेक गोष्टी आजही चांगल्या सुस्थितीत आहे, हा किल्ला भेट देण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे लोहगडाची उंची ११५० मीटर आहे व चढन सोपी आहे या गडावर जाण्यासाठी पुर्णपणे पाय-या आहेत त्यामुळे आर्धा ते एक तासात तुम्ही या गडावर पोहचु शकता लोहगड हा लोणावळयानजीक मळवली स्टेशन जवळ आहे लोहगडाच्या शेजारीच विसापुर हा किल्ला आहे.

गडावरील पाहण्याची ठिकाणी: गणेश दरवाजा , नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा,महादरवाजा बुरुज.

कसे पोहचाल:- पुणे येथून लोकल ट्रेनने मळवली स्टेशनला उतरा तेथुन लोहगड स्वताच्या वाहनाने पुणे-मुंबई हायवेने कार्ले गावातुन लोहगडला जाता येते.

 
सिंहगड

8. सिंहगड किल्ला – पुण्याच्या नैॠतेला सधारण २५ कि मी अंतरावर असणारा हा किल्ला आहे.हा किल्ला समुद्रसपाटीपासुन १५०० मीटर उंच आहे भुलेश्वराच्या पर्वतरांगेवर हा किल्ला आहे. खंदकाचा भाग आणि दुरदर्शन चा मनोरा यामुळे हा किल्ला पुण्यातुन कुठूनही दिसतो. या किल्यावरून आपल्याला राजगड,लोहगड, तोरणा,पुरंदर विसापूर,तिकोना हे किल्ले दिसतात. जर हा किल्ला तुम्हा निंवातपणे पहायचा असेल तर शनिवार-रविवारी जाने टाळावे कारण पुण्याच्या जवळ असल्याने शनिवार रविवारी खुप गर्दी आणि ट्राफिक असते या गडावर वरती पर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे त्यामुळे हा गड चढण्याची जास्त गरज नाही जर ताम्हाला गड चढून जायचे असेल तर दुसर्या रस्त्याने जाऊ शकता.

गडावरील पाहण्याची ठिकाणे:- दारुचे कोठार,टिळक बंगला,कोंढाणेश्वर,देवटाके कल्याण दरवाजा,तानाजी व राजाराम स्मारक,तानाजी कडा.

कसे पोहचाल: स्वारगेट येथुन सिंहगड ला जाण्यासाठी पीएमटी बसेस आहेत तसेच स्वारगेट येथुन खाजगी वाहने पण आहेत.जर स्वताचे वाहन असेल तर स्वारगेट – आंनदनगर- वाडगाव- खडकवासला-सिंहगड मार्गे जाता येते.

तिकोना

9. तिकोना किल्ला– या किल्याला विंतडगड असे पण म्हणतात याची उंची ११०० मी आहे हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे चढाई या किल्ल्यावर सोपी आहे एका तासात तुम्ही या किल्यावर पोहचु शकता या किल्यावर बहुतेक ठिकाणी पायच्या आहेत त्यामुळे हा किल्ला चढाईस सोपा आहे पुण्यापासुन साधारण ६० कि मी अतरावर हा किल्ला आहे. तिकोना किल्यापासुनच ३-४ किलोमीटर वर तंग हा किल्ला आहे या किल्याच्या त्रिकोनी इकारामळे तिकोना हे नाव पडले पावसाळयात या किल्यावरचे निसर्ग सैंदर्य अतिशय पाहण्यासारखे असते.

गडावरील पाहण्याची ठिकाणे :- ञिंबकेश्वर महादेवाचे मंदिर,तलाव,तळी व धान्य कोठार, तुळजाईचे मंदिर

कसे पोहचाल:- तिकोना जाण्यासाठी बसेस कमी आहेत त्यामुळे शक्यतो स्वतःच्या वाहनानेच जावे.पुणे इथून पुणे :- भूगाव – पिरंगुट -छाले – हाडशी – तिकोना मार्गे तसेच मुंबई इथून :- मुंबई – लोणावळा – कार्ले – लोहगड – तिकोना  मार्गे

 
सिंधुदुर्ग

10. सिंधुदुर्ग किल्ला – सिंधुपुर्ग जिल्हातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग. त्याचे बांधकाम २५ नोव्हेंबर १९६४ ला चालु झाले होते. इतिहास सांगातो की त्या काळी हा किल्ला बांधण्यासाठी ३ वर्ष लागले व एक कोटी होन खर्ची पडले हा किल्ला सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. त्याचा तट २ मैल – इतका आहे याची उंची २०० फुट आहे चढाइची श्रेणी सोपी-ओह तसेच जर तुम्हाला या किल्ल्यावर भेट द्यायची असेल तर पावसाळयात जाणे टाळा कारण पावसाळयात या किल्ल्यावर जाण्यास बंदी असते. या किल्ल्याला भारत सरकारने २०१० मधे महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणुन घोषित केले.

गडावरील पाहण्याची ठिकाणे:- सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार,समुद्रबुरुज,जरीमरीच देऊळ शिवराजेश्वराचे देवालय,गोडया पाण्याचे तलाव.

कसे पोहचाल:- पुणे व मुंबई येथुन कोल्हापुर येथे गेल्यावर कोल्हापुर येथुन सिंधुदुर्गसाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसने जाता येते. जर स्वताचे वाहण असेल तर पुणे -सातारा – कराड – कोल्हापुर-राधानगरी-सिंधुदुर्ग जाता येते.


हे पण वाचा – 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment