मराठी भाषा दिन | Marathi Bhasha Din Mahiti

मराठी भाषा दिन | Marathi Bhasha Din Mahiti

मराठी भाषा दिन हा महाराष्ट्रात,भारतात आणि जगभरात २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो मराठी भाषेच संवर्धन आणि जतन व्हावे यासाठी मराठी भाषा दिन साजरा केला जातो.

मराठी भाषा दिन हा विष्णु वामन शिरोडकर उर्फ कुसूमाग्रज  यांच्या वाढदिवसा दिवसी साजरा केला जातो ज्ञानपीठ पूरस्कार विजेते कुसूमाग्रज यांचा मराठी मधे खुप मोलाचे कार्य केले आहे तसेच त्यांनीमराठी भाषेसाठी भरीव काम केल्यामुळे त्यांच्या वाढदिवसदिवसी मराठी भाषादिवस साजरा केला जातो.

कुसूमाग्रज – कुसुमाग्रज हे मराठी भाषेतील अग्रगन्य कवी,लेखक,नाटककार,रचनाकार व समीक्षक होते,कुसूमाग्रज यांचे संपुर्ण नाव श्री विष्णू वामन शिरोडकर उर्फ कुसुमाग्रज असे आहे.


त्यांचा कालखंड २७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९ असा आहे.मराठी अभिरूचीवर चार दशकापेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे कवी नाटककार,कथाकार,कादंबरीकार अशी त्याची ओळख.

त्यांचा जन्म पुणे इथे झाला त्यांचे मुळ नाव गजानन रंगनाथ शिरोडकर होते पण त्यांचे काका वामन शिरोडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्यानंतर त्यांचे नाव विष्णू वामन शिरोडकर असे बदलले गेले.

चला तर या मराठी भाषा दिनी मराठी विषयीच्या महत्वाच्या गोष्टी पाहुया – 

मराठी भाषेची निर्मीती ही नवव्या शतकाच्या आसपास झाली मराठी भाषेची निर्मीती संस्कृत पासुन झालेल्या महाराष्ट्री, प्राकृत आणि अपभ्रंश या शब्दापासून झाली. 

मराठी भाषा ही मातृभाषा असणार्या लोकसंख्ये नुसार जगातील तीसरी भाषा आहे तसेच २०११ च्या जनगणनेनुसार ९ कोटी लोक हे मराठी भाषा बोलतात.

तसेच मराठी भाषेचा स्थानीक वापर भारत,मॉरिशीयस व इस्राईल मधे होता तसेच भारतामधे महाराष्ट्र,गोवा काही प्रमाणात गुजरात, कर्नाटक,मध्यप्रदेश व छत्तीसगड मधे होतो.

तसेच महाराष्ट्र व गोवा राज्याची मराठी ही अधिकृत भाषा आहे.

तसेच मराठी भाषेचा प्रशासकीय वापर करणारी राज्य महाराष्ट्र, गोवा, दमण व दीव, दादर नगर हवेली ही आहेत.

तसेच महाराष्ट्राबाहेरच्या १५ विद्यापीठात मराठी भाषा शिकवली जाते त्या पैकी काही विधापीठे खालील प्रमाणे आहेत
गोवा विद्यापीठ -गोवा
महाराजा सयाजीराव विद्यापीठ – बडोदा
उस्मानिया विद्यापीठ – तेलंगणा
जवहरलाल नेहरू विश्वविध्यालयानवी – दिल्ली
देवी अहिल्या विधापीठ – इंदोर
ही आहेत काही महाराष्ट्राबाहेरील प्रमुख विधापीठे जिथे मराठी शिकवली जाते.

मराठी संवर्धन –
मराठी संवर्धनाची आज गरज निर्माण होण्याचे कारण ही मराठी माणुसच आहे याचे कारण म्हणजे जसे की मुंबई आणि पुण्यात पाहिले तर पुढच्या माणसाला मराठी येत असेल तरी मराठी माणुस हिंदीतुनच सुरूवात करतो. 

त्यामुळे हिंदी लोंकाना मराठीचे काहीच वाटत नाही आज मुंबईत जी मराठीची आवस्था झालीय ती यामुळेच तुम्ही कुठे असला तरी सुरूवात मराठीतुनच करा जर पुढचा माणुस म्हणला मराठी यत नाही तरच हिंदी किंवा इग्रजी वापरा.

मराठी,बरोबरच हिंदी आणि इंग्रजी पण शिका पण जिथे आपण राहतो तिथे तरी जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा पर्यत्न करूया असे कले तरच मराठी भाषा ही कायम टिकुण राहील. 

शेवटी तुमच्यासाठी मराठी वरची एक कविता-

माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट
माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत

ज्ञानोबा – तुकयांची, मुक्तेशांची – जनाईची
माझी मराठी चोखडी रामदास शिवाजींची

टफ तुनतुने बोलते उभी शाहिर मंडळी
मुजर्याची माणकरी विरांची मायबोली.

हे पण वाचा –
मराठी कोडी । मराठी कोडी व उत्तरे

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment