मराठा आरक्षण | मराठा जातीचा दाखला | Maratha Jaticha Dakhla kasa Kadhaycha
Maratha Jaticha Dakhla kasa Kadhaycha: मराठा आरक्षणाची सर्व महिती तसेच मराठा जातीच दाखला कसा काढायचा यांची संपुर्ण माहिती आपण या लेखामधे घेणार आहोत.सर्वप्रथम मराठा आरक्षण म्हणजे काय ते पाहु.
राज्यामधे जी जात किंवा जमात आर्थिकद्रुष्ट्या मागास असते किंवा ज्या जातीचे वार्षीक उत्पन्न कमी असते त्यांना पण त्यांचा विकास करता यावा व त्यांचे पण वार्षीक उत्पन्न वाढावे म्हणून सरकार त्यांना शैक्षणिक सवलती देते तसेच शासकीय नोक-यामधे अशा जाती-जमातीसाठी जागा राखीव ठेवण्यात येतात.
गेल्या अनेक वर्षापासुन मराठा समाजाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होत चालली होती तसेच मराठा समाजातील अनेक लोक शेतीवर अवलंबून असल्याने मराठा समाजाची आर्थिक अवस्था बिकट होती.
त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज होती मराठा समाजच्या ५३ मोर्च्या नंतर सरकारला जाग आली आणि सरकारणे मराठा समाजाला आरक्षण दिले. मराठा आरक्षणाच्या आंदोलणात अनेक मराठा आंदोलकांचा जीवही गेला शेवटी २०१९ मधे मराठा आरक्षण दिले गेले.
तसेच मराठा समजासाठी सरकारणे ‘SEBC’ हा विषेश प्रर्वग तयार केला आहे व त्याअंतरगत मराठा आरक्षण दिले गेले ‘SEBC’ म्हणजे Socially and economically backward class असा अर्थ होतो. म्हणजे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रर्वग.
पंरतु आरक्षणा नंतर हे आरक्षण कायद्याला धरून नाही असे म्हणत काही लोकांनी कोर्टात याचिका दाखल केल्या. त्यावर न्यायालयात केस चालु आहे परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास कोर्टानी नकार दिला.
मराठा आरक्षण राज्यभर लागु करण्यात आले आहे.मराठा समाजाला १६% इतके आरक्षण नोकरी व शिक्षणात देण्यात आले आहे.तसेच हे आरक्षण राजकारणात लागु नाही ते नोकरी आणि शिक्षणात फक्त लागु राहिल.
पण आता मराठा आरक्षण मिळाले पण त्याचा लाभ कसा घ्यायचा तर त्यासाठी तुम्हाला मराठा असल्याचा जातीचा दाखला काढावा लागेल तर मराठा आरक्षण मिळविण्यासाठी जातीचा दाखला कसा काढायचा ते आपण पाहु.
मराठा जातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया –
पहिली पायरी –
तुमचा जातीचा दाखला काढणे सर्वात आधी तुम्ही मराठा आहात हे सिदध करावे लागेल त्यासाठी तुमच्या नावापुढे जातीचा उल्लेख असणारा पहिली ते बारावी पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला काढा आगोदरच काढला असेल त्याची सत्यप्रत(True copy) घ्या.
जर तुम्ही शाळेत शिकत आहात तर तम्हाला शाळा सोडल्याचा दाखला मिळणार नाही अशा वेळेस ज्या शाळेत किंवा कॉलेज मधे शिकत आहात तेथुन बोनाफाइड काढा पण बोनाफाईट काढताना लक्षात ठेवा त्यावर नाव आणि जातीचा उल्लेख करायला सांगा.
दुसरी पायरी –
१३ ऑक्टोबर १९६७ चा जातीचा दाखला दुसरा पुरावा जमा करणे. १९६७ च्या पुर्व जन्मलेल्या तुमच्या घरातील किंवा रक्ताच्या नात्यातील माणसाचा जातीचा दाखला लागेल.
तुमच्या वडीलांचा असेल तर उत्तम नसेल तर तुमच्या आत्या किंवा तुमच्या चुलत्याचा शाळा सोडल्याच्या दाखल्याची सत्यप्रत चालेल जर शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर खालील दिलेल्या पैकी एकाची सत्यप्रत चालेल.
- जन्ममृत्य नोंदीचा अभिलेखातील उतारा
- शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पानाचा संबधित कार्यालयाने जातिचा नोंद कलेला उतारा
- समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जाती
बाबत प्रमाणपत्र
अशा प्रकारे मराठा जातीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे दोन कागदपञे तयार ठेवा.
१) तुमचा जातीचा दाखला
२) २ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वीचा मराठा जातीचा दाखला
या पुराव्यांच्या दोन सत्यप्रती तयार ठेवा
तिसरी पायरी
रहिवासी व ओळखीचा पुरावा काढणे,रहिवासी दाखला काढण्यासाठी रेशन कार्ड लागेल तुमचे रेशन कार्ड घ्या आणि तुमच्या भागातील किंवा तुमच्या गावासाठी जे तलाठी कार्यालय आहे तिथे जा तिथे रहिवासी दाखल्याचा फार्म भरा व रेशन कार्ड दाखवुन रहिवासी दाखला घ्या.
१) रेशकार्ड
२) रहिवासी दाखला
या दोनीच्या सत्यप्रती तयार ठेवा
चौथी पायरी
तहसिलदार कार्यालयातुन जातीचा दाखला काढणे,तुमच्या तालुक्याच्या किंवा तुमच्या गावच्या तहसिलदार कार्यालयात जा जाताना तुमचे जातीचे दाखले,रहिवासी दाखला व तुमचे ओळखीचे पुरावे ही कागदपञे घेऊन जा.ओळखीच्या पुराव्यासाठी खालील पैकी एक सोबत घ्या आधार कार्ड,वाहन चालवण्याचा परवाना, कॉलेज / शाळा ओळखपञ.
तहसिल कार्यालयात गेल्यावर जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक आसणारा अर्ज घ्या. अर्ज व्यवस्थीत भरा आणि अर्जावर तुमची सही करा.अर्जावर १०रु किमतीचे तिकीट लावा पण हे तहसील कार्यालयातुन रात्री करून घ्या.महागाई वाढेल तसी तिकीटाची किंमत पण वाढु शकते.
तहसीलदार अर्जाला पुढील प्रमाणे कागदपञे जोडा
१)पुर्ण भरलेला व तिकीट लावलेला अर्ज
२)रेशकार्डाची सत्यप्रत
३)रहिवासी दाखला
४) तुमच्या जातीच्या पुराव्याची सत्यप्रत
५)१९६७ पुर्वीचा जातीचा दाखल्याची सत्यप्रत
६)साध्या कोर्या कागदावर जातीबाबत व वंशावळी बाबत स्वतःचे प्रतिज्ञापञ त्यावर
7) ५रू चे तिकीट.
अर्जदार सज्ञान म्हणजे १८ वर्षा पेक्षा मोठा असेल तर स्वताचे प्रतिज्ञापञ जर अर्जदार अज्ञान असेल तर वडिलांचे किंवा पालकाचे प्रतिज्ञापञ.
पाचवी पायरी (कार्यालयीन प्रक्रिया) –
पुर्ण भरलेला अर्ज तसेच त्या अर्जाला आवश्यक ती कागदपत्र जोडून तुमच्या जवळच्या सेतुमध्ये जा सेतुमधे गेल्यानंतर त्यावरील सर्व माहिती बरोबर असल्याची तपासनी करून घ्या.
त्यांनतर तुमच्या प्रतिज्ञापत्रावर च्या अर्जावर शिक्के देण्यात येतील तसेच तुमच्या प्रतिज्ञापत्राची तापसणी केली जाईल व त्यानंतर तुम्हाला सक्षम अधिका-याकडे सही घेण्यासाठी पाठविले जाईल.त्यानंतर सक्षम अधिकार्याची सही घ्या आणि तुमचा अर्ज सेतु कार्यालयात जमा करा.
अर्ज जमा केल्यानंतर त्याचे टोकण/पोचपावती घ्या.सदर पोचपावती वरती तुमचा जातीचा दाखला मिळण्याची तारीख दिला जाते.
ही पोचपावती जपुन ठेवा.जातीचा दाखला मिळेपर्यंत ही पोचपावती दाखवली तरी चालते.पावतीवर दिलेल्या तारखेला सेतु कार्यालयात जाऊन जातीचा दाखला घेऊन या.
वंशावळ कशी लिहावी-
मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्मलेल्या व्यक्तीशी तुमचे नाते संबध दाखवण्यासाठी वंशावळ लिहावी लागते वंशावळ ही खाली दाखवल्या प्रमाणे लिहावी.संदर्भासाठी खालील फोटो पहा.
जर तुम्हाला आणखी काही आडचणी आसतील तर खाली कमेंट करा. आम्ही त्याची उत्तरे नक्की देऊ.
हे पण वाचा-
महावितरण बिल कॉपी | महावितरण बिल चेक करणे.