यशासाठी प्रयन्त तर करावेच लागतात । Best Motivational Article in Marathi
स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वप्न बघणे आवश्यक आहे. जर तुम्ही स्वप्न बघायची हिम्मत करत असाल तर ती पूर्ण करण्याचे धैर्य देखील तुमच्याकडेच असते. तुम्हाला कितीही पुढे जायचे असेल किव्हा कोणतेही स्वप्न पूर्ण करायचे असतील तर ती तुम्ही पूर्ण करू शकता.
याने काही फरक पडत नाही कि तुमचे स्वप्न काय आहे, याने काहीच फरक पडत नाही कि तुमच्या समोर आव्हान किती मोठे आहे, याने काहीच फरक पडत नाही कि तुमच्याकडे संसाधने आहेत कि नाहीत, तुमचे वय किती आहे, तुम्ही दिसता कसे. या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही कि लोक आपल्याबद्दल काय विचार करतात. तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहे ना तर तुम्हाला हिम्मत केलीच पाहिजे. तुम्ही एक स्टेप मागे गेलात किव्हा तुम्ही कोणती गोष्ट हरवून बसला असाल तर न डगमगता तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा. जरतुम्हाला तुमच्यावर आत्मविश्वास कायम असेल तर तुम्ही कितीही मागे गेलात किव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट हरवून बसला असाल तर ती तुम्हाला पुन्हा मिळवता येऊ शकते.
आपल्याला जे मिळवायचे आहे त्यासाठी जर तुम्ही जर पात्र असाल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमची क्षमता सिद्ध करावी लागेल आणि जगाला दाखवून द्यायला लागेल कि बघा माझ्यात देखील माझी स्वप्न पूर्ण करण्याची धमक आहे. लोक म्हणतात की वेळ येईल तेव्हा संधी मिळेल, परंतु जर आपण संधीच्या शोधत असाल तर ही योग्य वेळ तुमच्या समोरच असेल .
पहा! आयुष्य कोणाचेही सोपे नाही, जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्या छतावरून पाणी टपकत आहे, तर मित्रा जगात असे काही लोक देखील आहेत ज्यांच्याकडे साधे छत असलेले घर देखील नाही आहे. जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्याकडे ब्रांडेड शूज नाहीत, तर तुम्हाला सांगू इच्छितो कि आपल्या अवती भोवती असे लोक देखील सापडतील ज्यांना पायात घालायला शूज देखील नसतात आणि तुम्हाला असे वाटते कि तुमच्या कडे कार नाही आहे तर बघा आपल्या शहरात असे बरेच लोक आहेत ज्याच्या कडे साधी सायकल देखील नाही आहे आणि काही तर असे आहेत ज्यांचा कडे पाय देखील नाही आहेत.
जे लोक आयुष्यातील छोट्या छोट्या अडचणींबद्दल रडत असतात, त्यांना मी सांगू इच्छितो आज तुम्ही आज तुमच्या स्वप्नांच्या मागे धावतंय, पण जगात असे देखील खूप लोक आहेत जे आपले पोट भरण्यासाठी संघर्ष करत आहेत. आयुष्य कोणासाठी कधीच सोपे नव्हते! आयुष्य कठीण आहे, परंतु आपण आयुष्यापेक्षा सामर्थ्यवान आहात यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.
Self motivation Positive Motivational Quotes in Marathi
तुम्ही तुमच्या छोट्या छोटया अडचणींपेक्षा मोठे आहात. लोक स्वतःच्या अपयशाला जबाबदार स्वतःच्या दारिद्र्य,गरिबी, शिक्षण, दुर्दैव आणि जगाला देतात. परंतु हे मान्य करण्यासाठी तुमच्याकडे खूप साहस पाहिजे की आपल्या वाईट परिस्थितीसाठी जबाबदार दुसरे कोणी नाही तर आपण स्वतः आहोत. आपण आपले जीवन स्वतःच्या हिशोबानुसार जगू शकता, आपण जे काही आपल्याला हवे ते साध्य करू शकता आणि यासाठी आपल्याला कोणावरही अवलंबून राहण्याची किव्हा कोणाच्याहि Favor ची आवश्यकता नाही आहे.
आपल्याला आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कोणाच्याही सहानुभूतीची आवश्यकता नाही, आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण स्वत: जबाबरदार आहोत आणि केवळ आपणच आहात जे स्वतःचे जीवन 100% बदलू शकता. स्वतःच्या अंर्तमनात झाकून बघा तुम्ही स्वत:ला इतरांपेक्षा चांगले समजू शकता आणि सकारात्मक विचार करून तुमच्या ध्येयाला तुमच्या समोर नतमस्तक व्हायला भाग पाडा.
होय, मी इतरांपेक्षा वेगळा आहे. मी माझ्या कृतींचा, माझ्या शरीराचा आणि स्वप्नांचा एकमेव स्वामी आहे. मी माझ्या परिस्थिती आणि माझ्या अपयशाचे कारण आहे. मी स्वत: ला बदलू शकतो, ही स्वप्नातील कार, स्वप्नातील बंगला माझ्यासमोर खूपच लहान आहे आणि ज्यांच्यामध्ये ताऱ्यापर्यंत उडण्याचे सामर्थ्य आहे त्यांच्यासाठी छोटे डोंगर चढणे हि काही मोठी गोष्ट नाही आहे.
पुढे चालत राहा आणि देशात नव्हे तर जगात देशाचे नाव बनवा. तुम्ही स्वतःच स्वतःच्या सर्व दु:ख आणि आनंदाचे कारण आहात. जर या संपूर्ण जगात एखादी व्यक्ती आपल्या जीवनात पूर्णपणे बदलू शकते तर ती स्वतःशिवाय इतर कोणीही नाही आहे. जेव्हा आपल्याला असे वाटते की आपले प्रयत्न व्यर्थ जात आहेत तेव्हा डगमगून जाऊ नका. कारण प्रयन्त कधीच व्यर्थ जात नाहीत तुम्ही जे काही करत असाल त्यातून तुम्हाला जो अनुभव भेटेल त्याचा उपयोग तुम्ही पुढच्या वेळी करू शकता. आज आपण कितीही अडचणींना सामोरे जात आहात हे महत्त्वाचे नाही कारण कोणाचे आयुष्य सोपे नाही, जेव्हा आपण आतून मजबूत असता तेव्हाच तुम्हाला तुमचे आयुष्य सोपे वाटते.
जर तुम्हाला मृत्यूनंतरही अमर राहायचे असेल तर आपल्याला जगताना बर्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल आणि विश्वास ठेवा की त्या गोष्टी आणि सवयी सोडणे इतक्याही अवघड नाही आहेत. बहुतेक लोकांच्या अपयशाचे कारण हे आहे कि ते त्यांच्या छोट्या छोट्या यशानंतर हुरळून किव्हा अडकून जातात, परंतु जर आपल्याला मोठे यश हवे असेल तर आपल्याला अशा गोष्टींमध्ये अडकून न जाता मोठ्या उद्दीष्टांसाठी कठीण मार्गातून जावे लागेल.
आपण आता निराश आहात आणि म्हणून तुम्ही लक्षापासून भरकटले आहेत पण हि तुमची चूक नाही आहे कारण बहुतेक लोक या जगात तेच करतात परंतु काही लोक प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी पोहोचतात जिथे बरेच लोक पोहोचण्याचे फक्त स्वप्न पाहतात. ज्यांचे इरादे मजबूत आहेत ते जिंकल्याशिवाय गप्प बसत नाहीत. म्हणून अपयशाकडे दुर्लक्ष करा, आपल्या ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी एक योजना बनवा. आणि जो पर्यंत तुम्ही तुमचे ध्येय जिंकत नाहीत तोपर्यंत लढत राहा. तुम्ही यशस्वी होणारच!
शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एकदा एक व्यापारी एका राजाकडे एक मोठा सुंदर दगड घेऊन गेला. राजाला ते दगड बघून खूप आनंद झाले आणि त्याने त्या दगडापासून विष्णूची मूर्ती बनवायचे ठरवले त्यासाठी त्याने त्याचा एक खास मंत्र्याला बोलवून ते काम त्याला दिले.
मंत्र्याने क्षणाचा हि विचार न करता राज्यातील सगळ्यात चांगल्या मूर्तीकाराला हे काम दिले आणि सांगितले कि या बदल्यात तुम्हाला ५०० सोन्याची नाणी दिली जातील. हे ऐकून मूर्तिकार खुश झाला आणि आपले अवजार काढून कामाला लागला. सगळ्यात आधी त्याने तो दगड तोडण्यासाठी हातोडा काढला आणि त्या दगडावर मारला, पण तो दगड एवढा मजबूत होता कि त्याला काहीच झाले नाही, नंतर त्याने परत जोर लावून त्याच दगडावर हातोडा मारला पण तरीसुद्धा तो दगड काही हलला नाही. तरी सुद्धा मुर्तीकाराने हिम्मत न हारता त्या दगडावर ५० वार केले पण तो दगड काही फुटला नाही. मग मुर्तीकाराने घाबरून हे सर्व त्या मंत्र्याला सांगितले.
ते सर्व ऐकून त्या मंत्र्याला सुद्धा काही कळेना कि आता काय करावे, जर राज्यातला एवढा चांगला मूर्तिकार जर या दगडापासून मूर्ती बनवू शकला नाही तर आता कोण बनवून देईन. त्याला काही कळेना त्याने नंतर तो दगड एका छोट्या मूर्तिकाराकडे घेऊन गेला. त्या छोट्या मुर्तीकाराने पहिल्याच वारामध्ये ते दगड तोडले आणि त्यापासून एक सुंदर विष्णूची मूर्ती बनवली. मग तिथे तो मंत्री आला आणि विचारात पडला कि आपल्या मुर्तीकाराने ५० वार करून सुद्धा हा दगड तुटला नाही आणि या मुर्तीकाराने कसा काय हा दगड तोडला?
त्या मंत्र्याला राहवले नाही आणि त्याला विचारले कि “जेव्हा 50 हातोडे मारून सुद्धा हे दगड तुटले नाही, तर तू फक्त एकच हातोडा मारून हा दगड कसा काय तोडल्यास?”
तर तो शिल्पकार म्हणाला, “सरकारचे उत्तर अगदी स्पष्ट आहे, मी या दगडावर प्रथम नाही तर 51 वे वार केले पूर्वीच्या शिल्पकाराने अजून एकदा प्रयन्त केला असता तर हा दगड मोडला असता परंतु त्याने अजून प्रयन्त न करता हार मानली.”
तर मित्रांनो तुम्ही सुद्धा तीच चूक करणार आहेत का? नाही ना? तर या गोष्टीवरून आपल्याला शिकायला भेटले कि कधीच हार मानायची नाही. पर्यंत करत राहायचे तुम्हाला तुमचे लक्ष नक्की भेटेल.
मित्रांनो मला अशा आहे Best Motivational Article in Marathi वाचून तुम्हाला हे आता लगेच असेल कि “यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कठोर परिश्रम आणि कठोर परिश्रमांसाठी नो शॉर्टकट.”
हे देखील वाचा,