स्वतःची किंमत कशी वाढवायची | 8 Tips to Earn Respect in Marathi

मित्रांनो, आजच्या या २१व्या शतकात काही अपवाद सोडला तर या दोन प्रकारच्या लोकांना आदर, सन्मान, रिस्पेक्ट कधीच मिळत नाही. पहिला प्रकार म्हणजे आळशी, रिकामटेकडी, कामाची टाळाटाळ करणारी, अज्ञानी मूर्ख माणसे आणि दुसऱ्या प्रकारची माणसे म्हणजे ती जी साधी, सरळ भोळी, लोकांना मदत करणारी, नेहमी कुठेही वेळेत पोचणारी, कुणाच्या अध्यात मध्यात नसणारी. पहिल्या प्रकारच्या लोकांना माहिती तरी असते की ते कुठे चुकत आहे त्यांना अशी वागणूक का मिळत आहे? पण खरी दया येते दुसऱ्या प्रकारच्या लोकांची त्यांना कधी कळतच नाही की आपण एवढे चांगले वागूनसुद्धा, सर्व ठिकाणे वेळेत पोहचून सुद्धा आपल्या वाटेला अपमान व फसवणूक का येते?

आजच्या या लाखेमध्ये मी तुम्हाला ६ अशा शक्तिशाली टिप्स सांगणार आहे. ज्या या दोन्ही प्रकारच्या लोकांना 100 टक्के रिस्पेक्ट मिळवून देतील. लोक तुमची किंमत करायला लागतील. मित्रांनो या लेखात दिलेली प्रत्येक टीप हि तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी आहे त्यामुळे या लेख शेवटपर्यंत वाचा.

8 Tips to Earn Respect in Marathi
8 Tips to Earn Respect in Marathi

१. तुमची अनुपस्थिती लोकांना जाणून द्या

माझा एक मित्र आहे राहुल नावाचा. एका चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो. अत्यंत हुशार आणि मेहनती, त्याला सतत काम करायला आवडतं. त्याची कंपनी त्याला वर्षाला 30 सुट्ट्या भर पगारी देते पण या आपल्या पठ्ठ्याने आठवड्यातील एक रविवार सोडला तर आज पर्यंत एकही दिवस एक्स्ट्रा सुट्टी घेतली नाही आहे. सतत काम, काम आणि काम. खरे तर त्याच्या या मेहनती स्वभावाचे आपण सर्वांनी कौतुक झाले पाहिजे. या त्याच्या कंपनीमध्ये त्याचा बॉस, त्याचे सहकारी त्याला आता गृहीत धरायला लागले आहेत. कंपनीमध्ये दुसरे कुणीही सुट्टीवर गेले की त्याचे सर्व काम राहुलच्या माथ्यावर पडू लागले. राहुलला ऑफिसमध्ये कुणी किंमत देईना त्याचा रिस्पेक्ट भेटत न्हवता, यामुळे तो प्रचंड वैतागला होता. मग मी त्याला एक युक्ती सांगितली. त्याला म्हणालो की हे बघ राहुल एक काम कर ५-१० दिवस मस्त सुट्टी घे आणि बाहेर फिरायला जा आणि मजा बघ काय होते ते तुझ्या ऑफिस मध्ये.

मी सांगितल्याप्रमाणे त्याने सुट्टी घेतली आणि गंमत म्हणजे एका दिवसातच राहुलची किंमत ऑफिसमधल्या सगळ्यांना कळली, अगदी सुपर बॉस ते सहकारी यांचे रोज त्याला फोने यायला लागले व कधी येतोय तू अशी विचारणा होऊ लागली आणि अचानक तो त्या कंपनीत ला एक महत्वाचा व्यक्ती झाला कारण त्याच्यावाचून कंपनीमध्ये अनेक कामे अडकून पडली होती. तर काय मित्रांनो, आहे ना कमालीचा उपाय पण यासाठी आधी आपल्याला स्वतःची किंमत वाढवता आली पाहिजे. जी राहुल ने प्रचंड मेहनत करून आधीच वाढूवून ठेवली होती. हा उपाय तुम्हाला तुमच्या आवडीच्या मुलीला तुमच्या प्रेमात पडायला सुद्धा उपयोगी ठरू शकतो. मुलीच्या मागे मागे रिकामटेकड्यासारखे फिरणे बंद करा. जरा दुर्लक्ष करा त्या मुलीकडे, बघा तिला ती गोष्ट कुठेतरी खटकेल आणि आपसूकच तिला तुमची अनुपस्थिती जाणवेल.

२. वक्तशीरपणा

मित्रांनो, तुमच्या ग्रुपमध्ये पण असा कोणी मुलगा किंवा मुलगी आहे का की जे भेटायला ठरलेल्या वेळत कधीच पोचत नाही. त्यांना १०फोन करावे लागतात, सारखे फोन करून कोठे आहे असे विचारावा लागतो आणि मग सगळ्यात उशिरा येऊन तेच जास्त भाव खाऊन जातात. आता जर तुम्हालाही असा भाव खाऊन जायचा असेल तर कधी कधी माणसं, वेळ आणि परिस्थिती बघून थोडे वेळेवर जाणे सोडा, आता इथे मी तुम्हाला बेशिस्थ व्हायला सांगत नाही आहे. पण तुम्हाला असं वाटतं जिथे तुम्हाला अपेक्षित किंमत मिळत नाही अशा ठिकाणी थोडे उशिरा जाऊन बघा. समोरच्याला थोडा वेळ तात्कळत ठेवा. पण मी सांगितल्याप्रमाणे हा फंडा सगळ्या ठिकाणी वापरू नका. नाहीतर एखाद्या इन्टरव्ह्यूला स्वतःची किंमत वाढवायला उशीरा गेलात तर नोकरी गमावून बसाल. म्हणूनच वेळ, काळ आणि माणसे बघून कधी कुठे पोहोचायचं ते ठरवा.

३. आपले ज्ञान वाढवा

इंग्लिशमध्ये सुंदर म्हण आहे “Jack of all, master of none” म्हणजे जगातल्या सगळ्याच गोष्टीत तुम्ही पीएचडी मिळवावी असं नाही पण काही विषयांसह ओझरतं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण एखाद्या आपल्या ग्रुपमध्ये काहीतरी चर्चा करत असतो आणि अचानक एखादी व्यक्ती असं काही ज्ञान देते की सगळे तिचेच फॅन होऊन जातात तर तुम्हालाही असंच फॅन फॉलोइंग हवा असेल तर वाचन वाढवा. वर्तमानपत्र वाचा, स्टॉक संबंधी व्हिडिओस बघा , पुस्तके वाचा, संगीत, नाटक, चित्रपट, खेळ किंवा खेळाडू, अवॉर्ड्स, डाएट आणि हेल्थ अवरनेस अशा विषयांवर सतत अपडेटेड रहा. प्रत्येकवेळी कोणत्याही चर्चेत हो ला हो मन डोलवू नका. तुमचा काहीतरी वेगळा मुद्दा मांडा व न घाबरता योग्य वेळी योग्य मत प्रदर्शन करा.

४. भरपूर पैसा कमवा

तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो “ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया” ज्या व्यक्तीच्या खिसा गरम असतो त्याच्यापुढे दुनिया झुकते, सगळे त्याचा एकतात. तो किती चुकला तरी त्याच्या तोंडावर कुणीच बोलत नसतं. तर सांगायचा मुद्दा हा की पैशाशिवाय जगात किंमत नाही भरपूर पैसा कमवा. आजच्या काळात तुमचा बॅंक बॅलन्स तुमची जगातली किंमत ठरवतो. जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला हवे ते तुम्ही खरेदी करू शकता, हवी तशी लाइफ जगू शकता त्यामुळे पैसा तुम्हाला सन्मान देईल. फक्त इथे एक गोष्ट स्पष्ट करतो ते म्हणजे, तो पैसा तुम्ही स्वतः कमावलेला असावा. आई वडिलांच्या जिवावर उड्या मरणाऱ्यांना अशी हि किंमत नसते.

५. लोकांना तुमचे टॅलेंट कळू द्या.

आजच्या काळात तीच व्यक्ती यशस्वी होऊ शकते जी स्वतःला सगळ्यांसमोर कॉन्फिडन्टली मांडू शकते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्वतःला एखाद्या प्रोडक्टसारखे विकू शकते. सगळ्यांमध्ये काही ना काही सुप्त कलागुण असतात. कुणी चांगला कविता करत असतात तर कुणी चांगले गायन, कुणाला गिटार वाजवता येते, तर कोणाला चांगले जेवण बनवता येता. पण जोपर्यंत तुम्ही हे या जगाला सांगणार नाही. तोपर्यंत लोकांना कसं करणार? तुम्हाला त्याची पब्लिसिटी करावी लागणार. ज्याने तुमचे वेगवेगळे पैलू जगासमोर येतील आणि लोक तुमची किंमत करतील, तुमची वाहवा करतील.

६. सतत उपलब्ध राहू नका.

लोकांसाठी सतत उपलब्ध राहू नका. जो व्यक्ती स्वतः एका कॉलवर तुम्हाला कधीही available असतो त्याची किंमत कोणीच करत नाही. अरे हा काय कधीही भेटेल! याला काय काम असतं असं लोकांना समजू देऊ नका. थोडी स्वतःची वेळ जपा. कधी कधी नाही म्हणायला शिका, तेव्हाच लोकं तुमची कदर करतील तुमची अभ्यासाची, ऑफिसची व कॉलेज च्या वेळेला महत्त्व द्या आणि मग इतरांना.

७. भावनांवर नियंत्रण ठेवा

जेव्हा आपण एखाद्याशी बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा आपली भावना नियंत्रणात ठेवा. एखाद्या विषयावर बोलत असताना समोरच्यावर ओरडू नका किंवा तुम्हाला एख्यादा गोष्टीचा जास्त आनंद झाला आहे तर मोठ्या मोठ्याने उड्या मारू नका. सर्वप्रथम समोरच्याचे बोलणे ऐकून घ्या. तो काय बोलतोय ते समजून घ्या. या मुळे समोरच्याला समजेल कि तुम्ही एक good listener आहेत, ज्यामुळे तुमचे इंप्रेशन चांगले पडेल वर समोरचा व्यक्ती तुम्हाला जास्त आदर देईल.

८. लोकांना प्रभावित करण्याचा प्रयन्त करू नका

जर तुम्ही एक चांगली पर्सनैलिटी बनवू इच्छित असाल तर कोणाला स्वतःहून इम्प्रेस करायचा प्रयन्त करू नका. तुम्ही तुमच्या कामाशी मतलब ठेवा. या जगात लोक त्या लोकांना जास्त respect देतात के चांभारचौकश्या ना करता स्वतःच्या कामाशी मतलब ठेवतात.

मित्रांनो मला खात्री आहे. या टिप्सस च अनुकरण जर तुम्ही काही दिवस केलात तर तुम्ही तुम्ही जाल तिथे तुमची रिस्पेक्ट होईल.

Also Read, 

5 Attitude Tips in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment