ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे

ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे

 

आज या लेखात आपण घरबसल्या ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट कसे करायचे ते पाहणार आहोत. हि प्रक्रिया तुम्ही इंटरनेट असलेल्या मोबाइल किंवा लॅपटॉप वरून सहजपणे करू शकता. चला तर पाहूया घरबसल्या ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे
 
सर्वात आधी तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉप वरून गुगल क्रोम ब्राउझर उघडा आणि त्यामध्ये गुगल उघडा. 
 
त्यानंतर गुगल मध्ये mahafood.gov.in ही वेबसाईट उघडा आणि तुमचा उजव्या हाताला खालील बाजूस ऑनलाईन सेवा असे लिहले असेल तिथे जावा.
 
ऑनलाईन सेवा मध्ये गेल्या नंतर ऑनलाईन शिधा व्यवस्थापन प्रणाली असे लिहले असेल तिथे क्लिक करा. अधिक माहितीसाठी खाली दिलेला फोटो पहा.
 
ऑनलाईन रेशन कार्ड
Image credit – mahafood.gov.in

 

त्यांनतर एक नवीन वेबसाईट उघडेल नवीन वेबसाईट वरती वरच्या बाजूला साइन इन किंवा रजिस्टर असे लिहले असेल त्यावर क्लिक करा.अधिक माहितीसाठी खाली दिलेला फोटो पहा.
 
ऑनलाईन रेशन कार्ड 2
Image credit – mahafood.gov.in

 

 

त्यावर क्लिक केल्यावर ऑफिस लॉगिन आणि सार्वजनिक लॉगिन असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी सार्वजनिक लॉगिन वर क्लिक करा.

 
सार्वजनिक लॉगिन वर क्लिक केल्यावर नवीन पेज उघडेल त्या पेजवर नवीन युझर येथून प्रवेश मिळवा वर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचे रेजिस्ट्रेशन करून घ्या.
 
तुमचे रेजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन व्हा. लॉगिन झाल्यावर होम पेज वरती नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करण्याचा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
 
त्यानंतर एक नवीन फॉर्म उघडेल होईल उघडलेल्या फॉर्म मध्ये ज्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची आहे त्याची संपूर्ण माहिती भरा.
 
त्यानंतर जी लागणारी कागदपत्रे तिथे दिली असतील त्याची स्कॅन कॉपी अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
 
फॉर्म समाविष्ट झाल्यानंतर तुम्हाला एक रेजिस्ट्रेशन नंबर मिळेल तो नंबर जपून ठेवा त्यावरून तुम्ही तुमच्या फॉर्म चे स्टेटस चेक करू शकता.
 
फॉर्म आणि कागदपत्रे अन्न व वितरण विभागाचे अधिकारी चेक करतील जर तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर असेल तर तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल आणि पोस्टाने रेशन कार्ड तुमच्या पत्यावर येईल.
 
सूचना – वरती दिलेली प्रक्रिया शहरी भागात लगेच लागू होईल ग्रामीण भागात थोडासा वेळ लागू शकतो किंवा प्रक्रियेत बदल असू शकतो अधिक माहिती हि तुमच्या अन्न पुरवठा दुकानदाराकडे उपलब्ध होईल.
 
 
हे पण वाचा – 
 

Leave a Comment