मराठी चित्रपट | फ्री मधे मराठी चित्रपट पाहण्याचे ५ मोबाईल अँप

आज आपण या लेखामध्ये फ्री मध्ये मराठी चित्रपट पाहण्याचे पाच मोबाइल अँप बघणार आहोत. या मोबाईल अँप वरती वरती तुम्हाला फ्री मधे तुमच्या आवडीचे मराठी चित्रपट बघता येतील चला तर बघूया.

MX Player Application
MX Player


1) एमएक्स प्लेयर(MX Player)- हे आधी व्हीडीयो चालवण्याचे अँप होते पण आता एमएक्स प्लेयर मधे पण मराठी चित्रपट आले आहेत.


हे अँप पण प्ले स्टोर मधे फ्री मध्ये उपलब्द आहे. हे अँप पण तुम्ही प्ले स्टोर मधुन डाऊनलोड करु शकता. या अँपसाठी जिओ युजर असन्याची काही गरज नाही. हे अँप सर्व ऑपरेटर ला चालते.

 हे अँप डाऊनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईल चे इंटरनेट चालू करा इंटरनेट चालू केल्यानंतर हे अँप ओपन करा.खालच्या बाजुला ‘Video’ असे लिहलेले एक चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा. 

त्यानतर ते एमएक्स प्लेयर च्या होम पेजवर जाईल वरच्या बाजुला ‘MOVIES’ असे लिहले आहे. त्यावर क्लिक करा त्यानंतर मराठी, हिंदी चित्रपटांची लिस्ट येईल वरच्या बाजुला सर्च चे चिन्ह आहे त्यात ‘Marathi movies’ असे सर्च करा.

त्यानंतर तुम्हाला सर्व मराठी चित्रपटांची लिस्ट दिसेल त्यापैकी तुम्हला जे पाहिजे ते चित्रपट तुम्ही पाहू शकता.

JIO CINEMA app
JIO CINEMA


2)जियो सिनेमा(JIO CINEMA) – जियो सिनेमा या अँप वरती तुम्ही फ्री मधे मराठी चित्रपट बघु शकता पण हे अँप वापरण्यासाठी तुमच्या मोबाईल मधे जियो सिम असणे गरजेचे आहे.

जर तुमच्या मोबाईल मधे जियो सिम नसेल तर तुम्ही हे अँप वापरू शकत नाही. जरी घेतले तरी ते चालू होणार नाही. 

जियो सिनेमा अँप घेतल्यानंतर जियो सिनेमा अँप ओपन करा त्यानंतर अँपच्या सेटींग मधे जा आणि अँप च्या सेटींग मधे गेल्यानंतर ‘Language’ मधे मराठी निवडा व ‘Movies’ वरती क्लिक करा.

तिथे तुम्हाला मराठी चित्रपर दिसतील त्यानंतर SEE ALL केल्यावर तुम्हाला सर्व लिस्ट दिसेल.

Hot-star application
Hot-Star app


3)हॉटस्टार(HOT-STAR) – हॉटस्टार या अँपवरती पण तुम्ही मराठी चित्रपट तसेच स्टार नेटवर्क च्या सर्व मालिका पाहू शकता त्यासाठी प्लेस्टोर मधे जाऊन हॉटस्टार डाऊनलोड करा.

हॉटस्टार हे तुम्ही जिओ युजर नसाल तरी पण चालेल.जिओ  युजर असण्याची गरज नाही, हे अँप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर अँप ओपन करा अँप ओपन केल्यानंतर अँप सेटींग मधे मराठी निवडा.

जर पहिल्यांदा असेल तर तुम्हाला भाषा निवडायला सांगेल त्याप्रमाणे हिंदी व मराठी निवडा आणि continue करा, त्यानंतर ‘Movies’ मधे जा आणि “Marathi movies’ असे सर्च करा.

सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्व मराठी चित्रपटांची लिस्ट येईल, त्यांनतर तुम्ही तुमच्या आवडीचे चित्रपट पाहू शकता.

ZEE5 app
ZEE5 app


4)झी फाईव्ह – झी फाईव्ह हे अँप झी मीडिया एंटरटेनमेन्ट ने बनविले आहे या अँप वरती तुम्ही मराठी चित्रपट तसेच झी चे सर्व मराठी, हिदी चॅनेल व सिरीयल बघू शकता. झी फाईव्ह हे अँप पण प्लेस्टोर वरती उपलब्ध आहे. 

हे अँप प्लेस्टोर मधुन डाऊनलोड करु शकता.हे अँप डाऊनलोड केल्यानंतर अँप ओपन कर त्यानंतर लोकेशन परमिशन द्या आणि लॉगीन करा पहिल्यांदा असाल अकाउंट बनवा किवा जीमेल निवडून डायरेक्ट लॉगिन करु शकता.

त्यानंतर होम पेज वरती जा होम पेज वरती गेल्यावर ‘Movies’ वरती क्लीक करा व खाली स्क्रोल केल्यावर Marathi movies दिसतील तिथे view All केल्यावर सर्व मराठी चित्रपट दिसतील व त्यांची लिस्ट येईल.

त्यापैकी जे नवीन चित्रपट आहे त्यासाठी तुम्हाला मेम्बरशिप घ्यावी लागेल पण जुने चित्रपट तुम्ही फ्री मधे बघु शकाल.

तसेच तुम्हाला हवे असलेला चित्रपट सर्च मधे शोधा उपलब्द असतील तर ते तुम्हाला दिसतील.अधिक माहिती वर दिलेला फोटो पहा. 

Amazon prime app
Amazon Prime app


5)अमेझॉन प्राईम व्हीडीयो(Amazon Prime Video)-अमेझॉन प्राईम व्हीडीयो हे अँप मंथली चार्जेस वाले असले तरी तुम्ही एक महिना फ्री ट्रायल घेऊन मराठी चित्रपट पाहू शकता.

सर्वप्रथम गूगल प्ले स्टोर मधून हे अँप डाऊनलोड करा.त्यानंतर अकाउंट बनवुन लॉगिन करा लॉगिन झाल्यावर सर्च मधे जाऊन ‘Marathi movies’ असे सर्च करा. 

तुम्हाला सर्व मराठी चित्रपटांची लिस्ट येईल ही लिस्ट आल्यावर तुम्हाला जो चित्रपट पहायचा आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर प्राईम मेंबरशिप घ्या असे सांगेल त्यानंतर ’30 Free trial’ वर क्लिक करा.

त्यानंतर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडा यापैकी एक भरा शक्यतो डेबिट कार्ड भरा.अकाउंट मध्ये मिनीमम १० रुपय तरी बॅलन्स पाहिजे कारण अकाउंट व्हेरिफाय केले जाते त्यासाठी १ रुपया वजा करून परत ऍड केला जातो.

अकाउंट व्हेरिफाय झाल्यावर तुम्हला आता एका महिन्याची फ्री ट्रायल मिळेल त्यानंतर एकमहिना तुम्ही फ्री मध्ये मराठी चित्रपट बघू शकता.जर तुम्हला अमेझॉन ची सर्विस आवडली तर एक महिन्यानंतर पैसे देऊन पुढे चालू ठेऊ शकता. 

अश्या प्रकारे वर दिलेल्या पाच अँप्लिकेशन मधे तुम्ही फ्री मधे मराठी चित्रपट / मूवी बघू शकता. जर तुम्हाला कुठल्या अँप मध्ये काही अडचण येत असेल तर खाली  कमेंट करा आम्ही त्याचे उत्तर नक्की देऊ. 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment