आज प्रत्येकजण मोबाईल आणि कॉम्प्युटरचा वापर करतो, पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही मोबाईल आणि कॉम्प्युटर सहज ऑपरेट करू शकता, त्यामागील कारण काय आहे? तर तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की मोबाईल आणि कॉम्प्युटर ऑपरेट करण्यासाठी Java Language चा वापर केला जातो आणि या Java programming language मुळेच आज जगात खूप टेकनॉलॉजी पुढे गेली आहे, मग तुमच्या मनात हा प्रश्न तर येतच असेल कि हि जावा language आहे तरी काय? या programming language ची सुरवात कधी झाली? आणि मला जावा शिकण्यासाठी काय करायला लागेल? तर आजच्या या लेखात मी तुम्हाला याच सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे, त्यामुळे कृपया करून हा लेख पूर्ण वाचा.
JAVA हि एक General Purpose Programming Language आहे. ही एक अतिशय महत्त्वाची प्रोग्रामिंग Language आहे, ती सर्वात सामान्यपणे वापरली जाणारी उच्च स्तरीय प्रोग्रामिंग भाषा आहे. हि Language अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की ती इंटरनेट मध्ये चांगले काम करू शकेल. आजच्या काळात सर्व मोबाईल किंवा कॉम्प्युटर चालवण्यासाठी Java ची आवश्यकता भासते. जावा सध्या ओरॅकल कॉर्पोरेशनच्या मालकीची आहे आणि त्यांच्या एका रिपोर्ट नुसार, जावा चा वापर करून जगभरात 3 अब्जपेक्षा जास्त उपकरणांवर चालवली जातात.
History of Java in Marathi
जून 1991 मध्ये, जेम्स गोस्लिंग यांनी OAK या नावाने जावा प्रोग्रामिंग भाषा सुरू केली होती, जीचे नाव नंतर 1995 मध्ये जावा करण्यात आले. जावा हि जेम्स गोसलिंग आणि त्यांच्या टीम सदस्य पॅट्रिक नॉटन, माइक शेरीडन यांनी एकत्रितपणे तयार केली होती.
जावा भाषा 1995 मध्ये दूरदर्शन, सेट-टॉप बॉक्स इत्यादी डिजिटल सेवांसाठी विकसित केली गेली. त्याची पहिली आवृत्ती 1995 साली आली, त्याचे नाव Java v1.0 होते. आणि आता Java ची नवीनतम आवृत्ती “Java 13 (SDK 13)” आहे.
जेव्हा Gosling आणि त्यांची टीम एकत्र येऊन या भाषेचा नाव शोधात होते, तेव्हा त्यांना त्यांच्या टीम ने अनेक नावे suggest केली जसे कि DNA, Silk तसेच Revolutionary. पण त्यांची अशी इच्छा होती कि या भाषेचे नाव असे असावे जे unique आणि तंत्रज्ञानाला दर्शवेल. शेवटी James Gosling यांच्या समोर Silk आणि JAVA अशी दोन नावे होती. यामध्ये Gosling यांना JAVA हे नाव आवडले. हे नाव इंडोनेशिया मधील जावा द्वीप वरून घेतले गेले. सुरवातीला हि भाषा Sun MicroSystem या कंपनी मध्ये बनवण्यात आली आणि आता हि Oracle कंपनीचा भाग आहे.
Components of Java in Marathi
जावा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तीन प्रकारचे मुख्य घटक आहेत, ज्याचे तपशील आम्ही खाली देत आहोत, जे खालीलप्रमाणे आहेत.
JDK
JDK चे पूर्ण रूप आहे जावा डेव्हलपमेंट किट. याचे मुख्य काम आहे जावा प्रोग्राम विकसित करणे आणि कोड चालविण्यासाठी योग्य वातावरण तयार करणे. आणि JDK फक्त Java Developers द्वारेच उपयोगात घेतले जाते.
JVM
याचे फुल फॉर्म आहे जावा व्हर्च्युअल मशीन. हे एक अॅबस्ट्रॅक्ट मशीन आहे आणि जावा प्रोग्राम तिच्याद्वारे चालवला जातो. म्हणजेच, ते तुमच्या संगणकावर जावा कोड चालवण्यासाठी व्हर्च्युअल मशीन ला Enable करते.
JRE
JRE चे पूर्ण रूप Java Runtime Environment आहे. हे एक प्रकारचे सॉफ्टवेअर पॅकेज आहे जे जावा भाषेत लिहिलेल्या प्रोग्राम्सना क्लास लायब्ररी आणि जावा व्हर्च्युअल मशीन पुरवते.
Java ची प्रमुख वैशिष्ट्ये
- जावा प्रोग्रामिंग भाषेत लिहिलेला कोड वाचणे, लिहिणे आणि शिकणे खूप सोपे आहे. आणि Java ही C, C++ भाषेसारखीच आहे. जर तुम्ही ही भाषा शिकलात तर तुम्ही जावा प्रोग्रामिंग भाषा देखील सहज शिकू शकाल.
- जावा कि साधी सोपी प्रोग्रामिंग language आहे ज्यामुळे प्रोग्रॅम ला Write, Compile आणि Debug करणे बाकी भाषांच्या तुलनेत खूपच easy आहे.
- जावा प्रोग्रामिंग सोप्या रित्या शिकता यावी यासाठी Java SE आवृत्ती 8 (JDK 8) मध्ये नवीन अपडेट केले गेले होते.
- हे Java SE आवृत्ती 8 (JDK 8) मध्ये अद्यतनित केले गेले आहे जेणेकरुन लोकांना Java प्रोग्राम सहजपणे शिकता येतील.
- जावा प्रोग्रामिंग भाषा अतिशय सुरक्षित आहे, त्यावर कोणताही हॅकर सहज रित्या हल्ला करू शकत नाही.
- जावा एक object-oriented programming language आहे त्यामुळे या language ची कार्यक्षमता उच्च दर्जाची आहे.
- या मध्ये garbage collector असल्या कारणाने memory leaks ला prevent करता येते तसेच unused data ला सुद्धा शोधता येते.
Types of Java Applications in Marathi
Java प्रोग्रामिंग भाषा वापरून, तुम्ही प्रामुख्याने 4 प्रकारचे अँप्लिकेशन तयार करू शकता.
Mobile Applications:
Java Mobile Applications हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही मोबाईलशी संबंधित कोणतेही ॲप्लिकेशन तयार करू शकता, सोप्या शब्दात सांगायचे तर, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये वापरत असलेले सर्व गेम्स किंवा कोणतेही Application फक्त Java प्रोग्रामिंग लँग्वेज वर विकसित केले गेले आहेत. Apps तयार करण्यासाठी हा एक प्रकारचा Java प्लॅटफॉर्म आहे.
Standalone Applications:
जावा स्टँडअलोन ऍप्लिकेशन्सना डेस्कटॉप ऍप्लिकेशन किंवा विंडो Based ऍप्लिकेशन असेही म्हणतात. हे ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी जावा भाषेत AWT आणि SWING वापरले जातात. MS-Office, Media Player, Antivirus, Browsers इत्यादी स्टँडअलोन ऍप्लिकेशनची उदाहरणे आहेत.
Web Applications:
जर तुम्ही इंटरनेट वर नेट बँकिंग चा वापर करत असाल तर बहुतेक Banks websites या Java Language चा वापर करूनच बनवलेल्या असतात. कारण जावा प्रोग्रामिंग language कि हॅक करणे कठीण आहे. जावा मध्ये Strong Memory Management चा उपयोग केला जातो तसेच जावा मध्ये Pointers चा उपयोग खूप कमी केला जातो ज्यामुळे या भाषेच्या सुरक्षिततेत कोणतीही कमतरता येत नाही.
Enterprise Applications:
Enterprise Application ला Develop करण्यासाठी Java Language चा वापर केला जातो. कारण हि एक High Level Security प्रदान करते. आज मार्केट मध्ये वापरात असलेले महत्वाचे Enterprise Application जसे कि Banking software, Accounting Application, Industry Application हे सर्व बनवण्यासाठी EJB(Enterprise Java Bean) चा वापर केला जातो.
Core Java काय आहे?
मित्रांनो खर सांगायचे झाले तर Core Java चे विवरण कुठेच नाही आहे कारण हा फक्त एक शब्ध आहे जो कि Java Standard Edition ला ओळख देण्यासाठी Sun Microsystems वापरात असे. हा सर्वात बेसिक Versions आहे, कारण यानेच बाकीच्या Versions च्या Foundation ला एकेकाळी सेट केले होते.
हे एक Standard Version आहे ज्यामुळे यामध्ये तुम्हाला जावा चे basics बघायला भेटतील. तस बघायला गेले तर Core Java ऐकल्यावर सर्वांच्या डोक्यात फक्त येते कि कोर जावा म्हणजे जावा चे basic Version. या नंतर खालील जावा चे अनेक Versions Release करण्यात आले होते.
- Java Enterprise Edition
- Java Micro Edition
- Java Card
- JavaFX
- PersonalJava
जावा कशी शिकायची?
यात आता कोणतीही शंका नाही आहे कि जावा लैंग्वेज आज खूप लोकप्रिय झाली आहे आणि आता IT Industry मध्ये java Developers ला खूप जास्त मागणी देखील आहे. कारण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हि भाषा शिकणे खूप सोपे आहे कारण या भाषेचे Syntax म्हणजे वाक्यरचना English भाषेसारखीच असते. त्यामुळे जर तुम्ही ठरवले आहे कि जावा शिकायची च आहे तर मी खाली काही टिप्स दिला आहेत त्या नक्की फॉलो करा.
- जावा शिकण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला या भाषेचे basics आले पाहिजेत, जर तुम्हाला fundamentals समजले तर तुम्ही लगेच हि भाषा adapt करू शकता.
- तुमची कोडींग ची स्किल सुधारण्यासाठी रोज २ तास तरी कोडींग चा सराव करा.
- तसेच तुम्ही learnjavaonline.org, w3schools.com codecademy.com, youtube tutorial ची मदत घेऊन स्टेप बाय स्टेप जावा शिकू शकता.
- तुमची कोडींग स्किल चांगली होण्यासाठी खूप महिने लागू शकतात, त्यामुळे patience ठेवा आणि आवड निर्माण करून हि भाषा आत्मसात करा.
FAQ
Q. जावा चा फुल फॉर्म काय आहे?
A. जावा चे कोणतेही फुल फॉर्म नाही आहे, हे एक Programming Language चे नाव आहे. तरी सुद्धा काही ठिकाणी J A V A च फुल फॉर्म Just Another Virtual Accelerator असे म्हटले जाते.
Q. गूगल सुद्धा Java Language चा उपयोग करतो का?
A. होय, गूगल कंपनी सुद्धा Java Language चा उपयोग करते त्यांनी Google Docs applications जावा चा उपयोग करून बनवले आहे.
Q. Java आणि Javascript यांच्यात काय फरक आहे?
A. Java हि एक ओओपी प्रोग्रामिंग भाषा आहे तर Javascript हि एक ओओपी स्क्रिप्टिंग भाषा आहे. जावा चा उपयोग करून आपण अप्लिकेशन आणि डेस्कटॉप सॉफ्टवेअर बनवू शकतो तर Javascript फक्त browser जसे कि chrome, firefox यांवर चालते.
Final Words
मी आशा करतो कि Information About Java Language in Marathi या लेखात दिलेल्या माहिती मधून सध्या सरळ सोप्या भाषेत तुम्हाला Java Language बद्दल समजले असेल आणि तुम्हाला सॉफ्टवेअर इंडस्ट्री मध्ये करिअर करायचा असेल तर Java Language तुमच्या साठी योग्य राहील. कारण आजच्या घडीला जावा डेव्हलपर ला चांगला पगार दिला जातो. मित्रांनो जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर कंमेंट करू नक्की सांगा.
हे देखील वाचा