Quora वरून पैसे कसे कमवायचे? | How to earn Money from Quora in Marathi?

Quora वरून पैसे कसे कमवायचे? | How to earn Money from Quora in Marathi

How to earn Money from Quora in Marathi: जर तुम्हाला देखील कधी काही प्रश्न पडला असेल तर तो तुम्ही इंटरनेट वर नक्कीच सर्च केला असेल आणि त्या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना नक्कीच एक तरी वेळा तुमच्यासमोर Quora ही वेबसाईट आलीच असेल. ही एक अशी वेबसाईट आहे जी प्रसिद्ध आहे प्रश्न आणि त्यांची उत्तरे देण्यासाठी!

Quora वर तुम्ही प्रश्न विचारू देखील शकता आणि जर तुम्हाला एखाद्या प्रश्नांचे उत्तर माहिती असेल तर ते देखील देऊ शकतात. तर सांगायचे तात्पर्य हेच आहे की तुम्ही Quora च्या माध्यमातून स्वतःची माहिती देखील वाढवू शकता आणि तुम्हाला जर एखाद्या विषयाची माहिती असेल तर तुम्ही इतरांची मदत देखील करू शकतात. तर आता प्रश्न समोर उभा राहतो की नक्की आपण असे का करायचे?, का म्हणून आम्ही इतरांची मदत करायची?, का कोणी प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर आपण द्यायचे? तर याचे सरळ आणि सोपी उत्तर आहे पैसा! हो तुम्ही Quora वर प्रश्न विचारून आणि उत्तरे देऊन पैसे कमावू शकतात. आता आपण याच विषयी सविस्तर जाणून घेऊयात की Quora वरून पैसे कसे कमवतात? Quora वरून पैसे कमविण्याची अनेक माध्यमे आहेत, जसे की Youtube वरून किव्हा ब्लॉग वरून तुम्ही पैसे कमवता.

How to earn money from Quora in Marathi जाणून घेण्याच्या आधी Quora विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. जेणेकरून आपल्याला हे समजून घेता येईल की नक्की हे Quora आहे तरी काय?

Quora काय आहे? | What is Quora in Marathi

What is Quora in Marathi
What is Quora in Marathi

Quora एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे जगभरातून कोणीही प्रश्न विचारू शकतात. आणि त्यासोबत प्रश्नांची उत्तरे देखील देऊ शकतात. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास Quora एक अशी साईट आहे ज्यामध्ये कोणीही Question Answers देऊ शकतात. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नसेल तर तुम्ही ते Quora वर विचारू शकतात. जर तुम्हाला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर ते देखील तुम्ही देऊ शकता.

जेव्हा Quora वर कोणीही प्रश्न विचारत असेल आणि त्याच्या बदल्यात उत्तर देखील तिथे असेल तरी सुद्धा तुम्हाला त्यावर पूर्णपणे विश्वास करायला नको. कारण quora सुद्धा त्यावर मिळणाऱ्या उत्तरांची पुष्टी करत नाही. त्यामुळे quora वर तुम्हाला जे काही प्रश्न आणि उत्तरे मिळतील त्याला तुम्ही फक्त एक मत म्हणून समजायला हवे. त्यामुळे कोणताही व्यक्ती जेव्हा Quora वर उत्तर देत असतो तेव्हा तो फक्त एक त्याच मत म्हणून ते उत्तर देत असतो. जर Quora वर एखादे उत्तर योग्य असेल तर इतर लोक त्यावर upvote करू शकतात. त्यामुळे ज्या उत्तरावर जास्त upvote आहेत ते उत्तर योग्य आहे हे तुम्ही समजू शकता.
तर आता तुम्हाला हे समजले असेल की नक्की Quora काय आहे? आता आपण जाणून घेऊयात की quora वरून पैसे नक्की कसे कमवायचे?

Quora वरून पैसे कमविण्याचे मार्ग

Quora वरून पैसे कमविण्याचे मार्ग
Quora वरून पैसे कमविण्याचे मार्ग

Quora पार्टनर प्रोग्राम मधून पैसे कमवा

जर तुम्ही कधी Quora वापरुन पहिले असेल तर तुम्हाला हे समजले असेल की Quora वेबसाईट वर जाहिराती देखील आहेत. यातूनच Quora वेबसाईट पैसे कमवत असते. Quora ने आता आपल्या वेबसाईट वर असलेल्या साइडला जाहिराती विषयी एक नवीन प्रोग्राम सुरू केला आहे. यामध्ये quora वर उत्तरे देणारे आणि प्रश्न विचारणारे असे जे काही मुख्य लोक आहेत ज्यांच्या माध्यमातून Quora देखील पैसे कमवीत आहे अशांना पार्टनर प्रोग्राम मध्ये जोडून घेतले जात आहे. यानुसार त्या वापरकर्त्यांने जे काही प्रश्न विचारले असतील किंवा उत्तरे दिली असतील त्यातून quora ला होणारी अर्निंग ही त्या व्यक्तीला दिली जाईल. ही पूर्ण नसून यातील काही भाग हा त्या वापरकर्त्याला दिला जाईल.

Quora चा पार्टनर प्रोग्राम जॉईन करण्यासाठी काही प्रक्रिया आपल्या हातात नाही. जर तुम्हाला देखील quora पार्टनर प्रोग्राम सोबत कनेक्ट व्हायचे असेल तर Quora वर active राहून प्रश्नांची उत्तरे देत रहा. जर तुम्हाला देखील यातून तुमच्या प्रोफाईल वर जास्तीत जास्त views घेऊन येता आले तर Quora स्वतः तुम्हाला पार्टनर प्रोग्राम साठी इनव्हाईट करेल. यातून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे देखील कमवू शकता. मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणत्याही प्रकारे शॉर्टकट जर तुम्ही वापरण्याचा प्रयत्न केला तर तुमचे खाते Quora स्वताहून बंद करेल. Quora पार्टनर प्रोग्राम मधून जी देखील रक्कम तुम्हाला मिळणार आहे ती तुम्ही स्वताच्या बँक खात्यात घेऊ शकतात.

Quora Space मधून पैसे कसे कमवतात?

Quora space हे देखील Quora चे एक नवीन फीचर आहे. यालाच तुम्ही एक प्रकारे पर्सनल ब्लॉग सुद्धा म्हणू शकतात. यामध्ये तुम्ही ब्लॉगर प्रमाणेच ब्लॉग च्या माध्यमातून लेख प्रकाशित करू शकतात. सोबतच यामध्ये तुम्ही इतरांना invite देखील करू शकतात. हे एका ग्रुप प्रमाणेच आहे. जर तुम्हाला यामध्ये चांगल्या प्रकारे Views मिळाले आणि upvotes देखील आले तर तुम्हाला यातून सुद्धा पैसे मिळू शकतात .

यामध्ये जेव्हा तुमची कमाई ही 10 डॉलर्स होईल तेव्हा ती रक्कम तुम्ही बँक खात्यात पाठवू शकतात. पहिले फक्त Quora पार्टनर प्रोग्राम मधूनच असलेले लोक quora च्या माध्यमातून पैसे कमावत होते मात्र आता Quora space च्या माध्यमातून देखील लोक पैसे कमवत आहेत. Quora space मध्ये देखील Quora पार्टनर प्रोग्रामप्रमाणेच जॉईन होण्यासाठी काही डायरेक्ट मार्ग नाही. त्यासाठी तुम्हाला देखील Quora वेबसाईटचा वापर करावा लागेल आणि वाट बघावी लागेल जोपर्यंत तुम्ही Quora पार्टनर प्रोग्राम साठी पात्र होत नाहीत. त्यानंतर तुम्ही पात्र झाल्यास तुम्हाला invitation मिळेल. जर तुम्ही देखील Quora Space प्रोग्राम किंवा Quora पार्टनर प्रोग्राम मध्ये सहभागी होऊ शकत नसाल तर काही हरकत नाही. तुम्ही सुद्धा Quora च्या माध्यमातून पैसे कमवू शकतात. यासाठी तुम्हाला प्रोग्राम मध्ये जॉईन होण्याची देखील गरज नाही.

Quora मधून पार्टनर प्रोग्राम शिवाय पैसे कसे कमवतात? 

जरी तुम्ही Quora पार्टनर प्रोग्राम किंवा Quora space मधून पैसे कमवू शकत नाही तरी सुद्धा तुम्हाला इतर मार्ग खुले आहेत, जसे की adsense नसताना सुद्धा लोक blogging मधून ब्लॉगर्स पैसे कमवतात अगदी तसेच Quora पॅटर्नर प्रोग्राम शिवाय देखील तुम्ही पैसे कमवू शकता. जसे की

  • ब्लॉग च्या माध्यमातून – जर तुमच्याकडे एखादा ब्लॉग असेल तर Quora च्या माध्यमातून ब्लॉग वर ट्रॅफिक घेऊन जाऊन तुम्ही पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला quora वर जाऊन प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यामध्ये मग तुम्हाला तुमच्या ब्लॉग ची लिंक देखील द्यायची आहे. यामधून मग तुम्ही ब्लॉगची ट्रॅफिक वाढवाल आणि तुमची अर्नींग होईल.
  • Affiliate marketing – जसे की ब्लॉग वर Adsense approval मिळत नसेल तर affiliate marketing मधून पैसे कमविता येतात. त्याच प्रमाणे quora वर सुद्धा तुम्ही affiliate link शेअर करून earning करू शकता.
  • Paid Review – लोकांकडून त्यांच्या प्रोडक्ट विषयी किंवा सर्व्हिसेस विषयी अभिप्राय लिहून तुम्ही Quora वर पब्लिश करू शकता. त्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ शकतात.
  • YouTube – तुमचा जर एखादा यूट्यूब चॅनल असेल तर तुम्ही Quora वर तुमच्या युट्यूब चॅनल वर बनवलेल्या व्हिडिओशी निगडीत प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. त्याच व्हिडिओची लिंक द्या आणि मग त्यातून तुमच्या युट्यूब चॅनल वर views घेऊन या. या सर्व पद्धतीने तुम्ही Quora च्या माध्यमातुन पैसे कमवू शकता.

आता तुम्हाला quora च्या माध्यमातून पैसे कसे कमवू शकता हे समजले असेल. Quora च्या माध्यमातून पैसे कमवू तर शकता मात्र तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस देखील प्रमोट करू शकतात.

Conclusion

मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आता Quora वरून पैसे कसे कमवतात या प्रश्नांचे उत्तर मिळाले असेल. तरी सुद्धा जर तुमच्या मनात Quora विषयी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून विचारू शकता. मी लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन.

हे देखील वाचा

Information About Share Market in Marathi

Money Saving Tips In Marathi

Top 10 Blogging Tools in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment