कवितेच्या ओळींचे रसग्रहण । Marathi kavita Rasgrahan 2024
Marathi kavita Rasgrahan: तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की कवितेचे रसग्रहण कसं करायचा असतो आणि ९वी आणि 10 वीच्या बोर्ड एक्झॅमिनेशन तुम्ही देत आहेत? तर तुम्हाला हा प्रश्न खूप अवघड जातो असे मी खूप जणांकडून ऐकलेले आहे. पण आता घाबरायची अजिबात गरज नाही. कारण आजच्या या लेखामध्ये मी कवितेचे रसग्रहण कसं करायचं? रसग्रहण करताना कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे? रसग्रहण कशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि आउट ऑफ मार्क्स तुम्हाला कसं मिळणार आहे हे उदाहरणासह सांगणार आहे.
तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत कि रसग्रहण म्हणजे काय?
रसग्रहण म्हणजे काय | Rasgrahan Mhanje Kay?
तर रसग्रहण म्हणजे कोणतीही कविता जी आपण लहानपणीऐकतो, मोठेपण ऐकतो, आपल्या पुस्तकात आपण वाचलेली असू शकते. तर त्या आपल्याला माहिती असलेल्या कवितेचा पूर्णपणे, पूर्ण अंगाने आस्वाद घेणे म्हणजे कवितेचे रसग्रहण करणे होय. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये, शब्दकळा, आशयाची मांडणी विस्ताराने करणे हे रसग्रहणात आवश्यकत असते. परंतु तुम्हाला आता ऐकून हे शब्द खूप कठीण किंव्हा खूप मोठे वाटतील, तर सोप्या शब्दात बोलायचे झाले तर, कोणतीही कविता तुम्ही वाचत आहात कोणती कविता तुमच्या पुस्तकात आहे ती डिटेलमध्ये समजून घेणे त्याची मांडणी तुमच्या शब्दात करणे, त्याचा पूर्ण आशय समजून घेणे म्हणजे कवितेचे रसग्रहण करणे होय.
तर नेक्स्ट मुद्दा आहे म्हणजे कवितेतील रसग्रहण करताना तीन परिच्छेदात करणे अपेक्षित असते. ते म्हणजे –
- आशयसौंदर्य
- काव्यसौंदर्य
- भाषिकसौंदर्य.
10th marathi poem Rasgrahan 2024
१. आशयसौंदर्य
आता आशयसौंदर्य म्हणजे काय? आणि आशयसौंदर्य काय असतं ते आपण पाहुयात.
आशयसौंदर्यात कवी, कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश आणि कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव इत्यादी मुद्द्यांना धरून माहिती लिहायची असते आणि प्रत्येक कवितेतील कोणत्याही पंक्तीतील हे मुद्दे सारखेच असतात. बेसिक आशयसौंदर्य म्हणजे काय? त्याच्यामध्ये तुम्हाला कवी कोण आहेत? कवितेचं नाव काय आहे आणि या कवितेतून तुम्हाला काय संदेश मिळालेला आहे हे फक्त दोन ते तीन लाईनमध्ये लिहायचे असते. जास्त लाइन आशयसौंदर्यामध्ये लिहायच्या नाही. जेमतेम दोन ते तीन लाईनमध्ये तुम्हाला आशयसौंदर्य लिहायचे असते.
२. काव्यसौंदर्य
दुसरं आहे ते म्हणजे काव्यसौंदर्य. काव्यसौंदर्य म्हणजे काय? तर ज्या तुम्हाला कवितेच्या ज्या चार पंक्ती दिलेल्या असतील त्या पंक्तीचे रसग्रहण तुम्हाला परीक्षेमध्ये करायचा असतो. तर त्या चार पंक्तीतून तुम्हाला काय कळलेला आहे त्यातून तुम्हाला काय संदेश मिळाला आहे? त्या कवितेच्या ओळींचा अर्थ काय आणि कशा प्रकारे तुम्हाला ती कविता कळलेली आहे याची मांडणी अगदी पाच ते सहा ओळींमध्ये तुम्हाला काव्यसौंदर्यामध्ये करायची असते. विविध कल्पना, प्रतिमा, विविध कवितेतील भावना या विषयांची माहिती द्यायची असते. कवितेत दिलेल्या लाइन्सच तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला काय केलेल्या आहेत हे पाच ते सहा लाइनमध्ये तुम्हाला लिहायच्या असतात.
३. भाषिकसौंदर्य
सर्वात शेवटचा असतो म्हणजे भाषिकसौंदर्य. भाषिक सौंदर्य म्हणजे काय? भाषाशैली, बोलीभाषा, संवादात्मक भाषा, चित्रशैली, शब्दालंकार जें जें त्या पंक्ती मध्ये आलेला आहेत, त्याची बोलीभाषा कशी आहे त्यातून तुम्हाला काय अर्थ कळतो? त्यातून वाक्प्रचार काय दिलाय? म्हणी काय दिलेल्या आहे? कोणत्या शब्दांचा अलंकार तिथे वापरलेला आहे. या सर्व गोष्टी भाषिक सौंदर्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात आणि या गोष्टी आपल्याला भाषिक सौंदर्याच्या परिच्छेदामध्ये लिहायच्या असतात. भाषिक सौंदर्याचा पॅरग्राफ आपल्याला तीन ते चार लाईन मध्ये लिहायचे असते.
थोडक्यात हे चार मार्क्स चा जरी प्रश्न असला तरी आपल्याला जवळपास हा प्रश्न 12 ते 13 लाईनमध्ये मांडायचा आहे. आशयसौंदर्य दोन ते तीन लाइन. भाषिक सौंदर्य पाच ते सहा लाइन, आणि भाषिक सौंदर्य दोन ते तीन लाइन.
उदाहरण । Example of Marathi poem appreciation
तुमच्या बोर्ड एक्झामिनेशनसाठी अशा प्रकारचा प्रश्न दिलेला असतो आणि बोर्ड एक्झामिनेशनमध्ये चार मार्क्ससाठी आणि 2 मार्क्ससाठी हा प्रश्न दिलेले असतात तर आता आपण हा प्रश्न आणि याचे उदाहरण डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हा उदाहरण तुम्ही समजून घेतलात तर बेसिक आयडिया येईल की कवितेचे रसग्रहण कसे करायचे?
खालील दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. (4 Marks)
उन्हातानात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरतेखोल विहिरीचे, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते.
आता आपल्याला या काव्यपंक्ती दिलेल्या आहेत आणि या काव्यपंक्तीच्या आधारे आपल्या रसग्रहण करायचं आहे. तर ते कसे मुद्दे लक्षात घेऊन करायचा आहे हे मी तुम्हाला खाली सांगणार आहे. तर या काव्यपंक्तीच्या आधारे आपण पाहूया कि आशयसौंदर्य काय आहे.
आशयसौदर्य: ‘रोज मातीत’ या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीच्या कष्टाचे वर्णन यशोचित शब्दात केले आहे. उपरोक्त ओळींमध्ये शेतात शेतकरी स्त्री चे नांदणे कसे कष्टमय असते याचे हृदय शब्दात वर्णन त्यांनी केले आहे.
जसे कि मी तुम्हाला सांगितलं होतं या कवितेच्या पंक्तीपासून आपल्याला रसग्रहण करायचं आहे आणि आशयसौंदर्यासाठी आपल्याला ती कविता कोणाची आहे. म्हणजे कवितेचं नाव काय आहे? कवियत्री कोण आहेत आणि त्याच प्रमाणे बेसिक कल्पना म्हणजे बेसिक तुम्हाला कवितेमधून काय कळलेले आहे हे दोन ते तीन लाईनमध्ये मी एक्स्प्लेन केलेला आहे. असेच, तुम्हाला आशयसौंदर्यचा लिहायचे असतो दोन ते तीन लाईनमध्ये.
आता आपण पाहुयात काव्यसौंदर्य
काव्यसौंदर्य: यामध्ये शेतकरी महिला हि आपल्या संसारासाठी शेतात अहोरात्र मेहनत घेत आहे. ती वाफ्याच्या सरीने कांदा लावते. मग दाबून उसाची कांडी जमिनीत पुरते आणि हि मैल हे सर्व कष्ट उन्हामध्ये, कशाची पर्वा न करता निरंतर करत असते. ती जमिनीत आपले आयुष्य समर्पित करते. पुढचे हिरवे स्वप्न पाहते. सुगीच्या हंगामा जेव्हा तरारलेले हिरवेगार शेत फुलते, तेव्हा जणू या हिरवेपणातच तिचे कष्टच उगवून आलेले असतात. खोल विहिरीतून पाणी उपसून ती पिकांना पाजते. आणि अशा प्रकारेच संसार फुलवण्यासाठी हि शेतकरी रोज रोज मातीत नांदत नांदून शेत फुलवत आहे.
आता तुम्ही जर हे काव्यसौंदर्य पाहिलतं तर कवितेच्या पंक्तीच्या अनुसार म्हणजे कवितेच्या आपल्या चार पंक्ती दिलेला आहेत. त्या मधून नक्की आपल्याला काय करते म्हणजे कसा अर्थ तुम्ही लक्षात घेतलेला आहे आणि कसा अर्थ तुम्हाला कळलेलं आहे हा तुमच्या शब्दामध्ये तुम्ही इथे लिहायचा आहे. अगदी सहा ते सात लाईनमध्ये मी हा अर्थ दिलेला आहे. म्हणजे काव्यपंक्तीतून आपल्याला काय कळते? कसे शेतकरी स्त्री कष्ट घेत आहे. कसे ती कष्ट घेऊन आपली शेती करत आहेत, शेती सांभाळत आहे हे मी काव्यसौंदर्यमध्ये लिहिलेले आहे. थोडक्यात काव्यसौंदर्यमध्ये काव्य पंक्तीच्या दिलेले आहेत किंव्हा जी कविता दिलेला आहे त्याचा एकंदर अर्थ काय होतो ते आपल्याला आपल्याला लिहायचे असते.
आता शेवटचा आहे भाषा सौंदर्य जसं मी तुम्हाला म्हंटल भाषासौंदर्य हे सुद्धा तुम्हाला चार ते पाच महिनेमध्ये असतो आणि भाषिक सौंदर्यमध्ये बोलीभाषा, अलंकार किंवा त्या कवितेतून तुम्हाला काय समजलं? त्यामधून काय बोध मिळाला, कशा प्रकारची कविता आहे हे लिहायचे असते.
भाषासौंदर्य: अतिशय साध्या, सोज्वळ भाषेमध्ये कवितेतील शेतकरीण आपले मनोगत व्यक्त करते. तिच्या हृदयातील बोलांमधून ती सोसत असलेले कष्ट कळून येतात. हिरवे होऊन मागे उरणे रोज मातीतदाणे नांदणे, या प्रतिमा काळीज हेलावून टाकणारे आहे. या कवितेतील प्रत्येक शब्द रचनेतून शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यांसमोर साकारतं व उलगडत जाते.
जसं की तुम्हाला मी तुम्हाला सांगितले होते कि भाषासौंदर्यमधून तुम्हाला कवितेतून काय कळेले आहे किंवा कवितेचा भावार्थ काय आहे, कवितेतून काय बोध मिळत आहे कसेतरी शेतकरी स्त्री कष्ट घेते आहे याची मांडणी केलेली आहे.
10th marathi rasgrahan pdf
Final Words
या प्रकारे तुम्ही जर कवितेचे रसग्रहण योग्य पद्धतीने तीन प्रकारे डिवाइड करून केला तो तुम्हाला चारपैकी चार मार्क्स नक्की मिळणार आहे आणि कवितेचे रसग्रहण करताना या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. तर मला अशा आहे तुम्हाला आता Marathi kavita Rasgrahan या लेखामधून Rasgrahan Mhanje Kay, Rasgrahanache Prakar, Rasgrahan kase lihayche हे कळले असेल, तरी सुद्धा तुमच्या काही शंका असतील किंव्हा या लेखात दिलेले Rasgrahanache udaharan तुम्हाला समजले नसेल तर खाली कंमेंट नक्की नक्की सांगा.
हे देखील वाचा