हरविलेला मोबाईल कसा शोधायचा | How to Find Lost Mobile in Marathi

हरविलेला मोबाईल कसा शोधायचा | How to Find Lost Mobile in Marathi

How to Find Lost Mobile in Marathi: आजच्या या लेखात आपण हरविलेला मोबाईल कसा शोधायचा पाहणार आहोत तसेच मोबाइल हरवल्यास काय करावे हे पण पाहणार आहोत.
 
मोबाइल हरवणे ही एक सामान्य समस्या आहे रोज अनेक लोकांचे मोबाईल हरवत असतात काहींचे चोरिला जातात तर काहींचे निष्काळजी पणाने इकडे तिकडे राहुन जातात. तर आज आपण हरविलेला मोबाइल कसा शोधायचा तो पुन्हा कसा मिळावायचा हे पाहणार आहोत या लेखात आपण गुगल अंकाऊटचा वापर करुन हारविलेला मोबाइल शोधणार आहोत.

पण सुरूवातिला हरविलेला मोबाइल शोधण्यासाठी लागणा-या गोष्टी पाहु
1. जीमेल अकाऊंट- जे तुमच्या फोनमधे प्लेस्टोर ला लाॅगिनअसले पाहिजे 
2. इंटरनेट
3. जी पी एस

वरील पैकी जी पी एस चालु नसेल तरी चालेल पण बाकिच्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. ते नसेल तर हर हरविलेला मोबाईल शोधणे जरा अवघड आहे वरील पैकी तिनीही गोष्टी असतील तर अतिशय उत्तम म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाइल सापडेल अशी आशा करु शकतो.

हरवलेला मोबाईल शोधा / मोबाईल शोधण्याची प्रक्रीया / चोरीला गेलेला मोबाईल शोधने – 

मोबाइल हरवल्यानंतर दुसर्या मोबाईल वरुन किंवा लॅपटाॅप वरुन गुगल मधे Find my mobile सर्च करा गुगल मधे Find my mobile सर्च केल्यावर find my device – Google असे दिसेल.

त्यावर क्लिक करा त्यानंतर प्लेस्टोर मधे जे जिमेल अकांऊट आहे त्या अकांऊट ने लॉगिन करा त्यानंतर एक मेसेज येईल तिथे Accept करा.

आणि मोबाईल शोधने सुरु होईल त्यानंतर डाव्याबाजुला वरच्या बाजूला तुमचा मोबाईल चे स्टेटस दिसेल.

तिथे रेंज दिसेल तसेच बॅटरी किती चार्ज आहे हे पण दिसेल तसेच इंटरनेट चालु असेल तर ऑनलाइत दिसेल व तुमच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मॅपवर दिसेल.

जर जि पी एस चालु असेल तर तुम्ही तुमचा मोबाइल ची रियल टाइम लोकेशन पाहु शकता. 

त्यानंतर लोकेट वर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाइलचे आत्ताचे लोकेशन गुगल मॅपवर दिसेल तसेच मोबाइल आता कोणत्या येरीयात आहे ते पण दिसेल.

त्यावरून तुम्ही तिथे जाऊन तुमचा मोबाइल शोधू शकता.

मोबाईल चे लोकेशन पाहण्याबरोबरच आणखी काही कामे या वेबसाईट वरुन तुम्ही करु शकता ती आपण आता पाहु.

1. प्ले साऊंड ( PLAY SOUND)-
या वरती क्लिक केल्यावर तुमच्या मोबाइल ची रिंगटोन मोठ्याने वाजेल जेने करूण मोबाइल च्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला मोबाइल शोधाण्यास मदत होइल. प्ले सांऊड म्हणल्यावर तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर असेल तरी पण आवाज येइल आणि तुमचा मोबाइल तुम्हाला सापडेल.

2. सिक्युअर डिवाइस (Secure device)
या पर्यायाद्वारे तुम्ही तुमचा मोबाइल लॉक करून टाकु शकता तसेच तुमच्या मोबाइल च्या स्क्रिनवर दुसरा मोबाइल नंबर देऊन हा मोबाईल हरविलेला आहे असा मेसेज देऊ शकता. जेणे करून ज्याला हा मोबाइल सापडेल तो माणूस तुमच्याशी या नंबर वर संपर्क करेल. 

3. इरेस डिवाइस (Erase device)
वरील सर्व पर्याय वापरुन झाले तरी पण काहीच फायदा झाला नसल्यास तुम्ही तुमच्या मोबाईल मधील सगळा डाटा इरेस म्हणजेच डिलीट करुन टाकु शकता. त्यासाठी हा पर्याथ आहे Erase device वर क्लिक करा त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका आणि त्यानंतर तुमच्या मोबाइल मधील सर्व डाटा काढुन टाकण्यात येईल.

पण सर्व डाटा काढल्यानंतर पण चोर तो मोबाइल वापरु शकतो. चोराने तो मोबाइल वापरु नये म्हणून आपण तो मोबाइल कायमचा ब्लाॅक करू शकतो.

मोबाइल ब्लाॅक कसा करायचा आपण खाली पाहु 

भारत सरकारने हरविलेले मोबाइल ब्लॉक करण्यासाठी नवीन वेबसाईट तयार केली आहे त्या वेबसाईट वर जाऊन आपण हरविलेला मोबाईल ब्लाॅक करू शकतो.
हरविलेला मोबाईल ब्लॉक करणे 

जर वरील सर्व करून झाल्यानंतर पण जर तुम्हाला तुमचा हरविलेला मोबाइल सापडला नाही.
तर तुम्ही तो ब्लॉक करू शकता व त्यासाठी तुम्हाला हरविलेल्या मोबाइल ची पोलिस कंपलेन्ट किंवा तक्रार करावी लागेल व FIR ची काॅपी आणावी लागेल.

मोबाईल ब्लॉक करण्यासाठी लागणा-या गोष्टी 

1. मोबाईल खरेदी केलेले बिल
2. FIR कॉपी
वरील सर्व कागदपत्र उपलब्द झाल्या नंतर लॅपटाॅप किंवा मोबाईल वर गुगल  उघडा आणि गूगल मध्ये ceir.gov.un ही वेबसाईट उघडा. 

ही वेबसाईट उघडल्यातर वरच्या बाजुला तीन पर्याय दिसतील 
  1. Block
  2. Unblock
  3. Check status request 
जर तुम्हाला तुमचा मोबाइल ब्लाॅक करायचा असेल तर ब्लाॅक वर क्लिक करा ब्लॉक मधे गेल्यानंतर तिथे तुमचे नाव मोबाइल नंबर दोन सिम असल्यास दोन्ही नंबर नंतर दोनी IMEI नंबर टाका. 

त्यानंतर मोबाईल हरविल्याचे ठिकाण पत्ता राज्य टाका तसेच मोबाईलचे बिल व FIR ची फॉपी अपलोड करा ते अपलोड झाल्यानंतर Submit वर क्लिक करा. 

ओटीपी टाका त्या नंतर तुमची रिकवेस्ट घतली जाईल व सरकार तुमचा मोबाईल ब्लाॅक करून टाकेल आणि आता तुमचा मोबाईल कोणीही वापरु शकणार नाही.

त्याच वेबसाईट वर दुसरा पर्याय आहे unblock त्याच्या आतमधे जाऊन जर तुमचा हरविलेला मोबाईल सापडला तर तुम्ही Unblock मधे जाऊन Unblock करु शकता.

हे टॅब तुम्ही तुमचा सापडलेला मोबाइल  Unblock करण्यासाठी वापरू शकता.

त्यानंतर तिसरा पर्याय आहे Check request status यामधे तुम्ही तुमची ब्लॉक करण्यासाठी जी रिकवेस्ट दिली आहे याची माहीती पाहु शकता. 

म्हणजे तुम्ही ब्लाॅक करण्याची जी रिकवेस्ट दिली होती त्याचे काय झाले त्यावर प्रक्रिया झाली का नाही तसेच तुमचा मोबाईल सरकारने ब्लाॅक केला का नाही हे तुम्हाला या टॅब मधे दिसेल.

अशा प्रकारे वरील वेबसाईट वर तुम्ही तुमचा मोबाइल ब्लॉक करु शकता.

वरील वेबसाइट भारत सरकारने सुरू केली आहे त्याद्वारे हारवलेले मोबाईल सापडु शकतात तेसेच हरविलेले मोबाइल ब्लाॅक पण करू शकता.

Conclusion

तर मित्रांनो तुम्हाला आता समजले असेल कि हरवलेला फोन कसा ऑनलाईन आपण शोधू शकतो. पण आता एक गोष्ट महत्वाची लक्षात घेण्यासाखी आहे ती म्हणजे जर मोबाइल फोन चोरीला गेला तर या सर्व ट्रिक 90% काम नाही करणार कारण. चोरीला गेलेल्या फोन चे इंटरनेट, GPS चोर बंद करून टाकतो, तसेच फोन रीसेट करून टाकतात, ज्यामुळे तुमचा ई-मेल आयडी तुमच्या मोबाइल मधून निघून जातो. त्यामुळे तुम्ही लगेच ज्या भागात तुमचा फोन हरवला आहे त्या भागातील पोलीस स्टेशन मध्ये तुमच्या फोन ची रिपोर्ट नक्की करा. जेणे करून जर तुमच्या फोने करून जर काही illegal activity झाली तर तुम्हाला पोलीस दोष देणार नाहीत.
मित्रांनो तुमच्या अजूनही काही शंका असतील तर खाली कॉमेट करून नक्की सांगा.

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment