पर्यावरण निबंध मराठी | Essay on Environment in Marathi Language

Essay on Environment in Marathi Language

 

नमस्कार विदयार्थी मित्रांनो या लेखात आपण पर्यावरण निबंध मराठी / Essay on Environment in Marathi Language पाहणार आहोत. इथे आम्ही हा पर्यावरण निबंध मराठी अतिशय सध्या आणि सोप्या भाषेत दिला आहे.
 
पर्यावरण आपला सगळ्यात जवळचा मिञ आहे ज्याच्या शिवाय आपले जीवन अशक्य आहे. पर्यावरण म्हणजे काय तर सजीव सृष्टीला जगण्यासाठी आजुबाजुला असलेल वातावरण होय. पर्यावरण म्हणजे काय हेच बर्याच लोंकाना समजत नाही पर्यावरण म्हणजे तुमच्या आजुबाजुला आसलेली झाडे, डोंगर, पाणी, जंगल, झुडपे आणि हवा हे सगळे म्हणजे पर्यावरण. थोडक्यात सांगायचे झाले तर आज सजिव सृष्टी टिकुन आहे ते पर्यावरणामुळे जर तुम्ही पर्यावरणाची काळजी नाही घेतली तर माञ पर्यावरणाबरोबरच सजीव सृष्टीचा सुद्धा शेवट निश्चीत आहे.
 
पर्यावरणाचे महत्व – पर्यावरण हा सजीव सृष्टीसाठी अतिशय महत्वाचा घटक आहे. सजीवसृष्टीसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट पर्यावरण देत असते. पर्यावरण स्वता पण जगतेच आणि सोबतच आपल्याबरोबर प्रत्येक सजीव सृष्टी मधील जीवाची ते काळजी घेत असते. 
 
पर्यावरण वाचवा चळवळ

 

सजीवसृष्टीला लागणार्या प्रत्येक गोष्टीसाठी तो पर्यावरणावर अवलंबुन असतो आणि पर्यावरण निस्वार्थीपणे आपल्याला ते देत असते. हेच पर्यावरण पृथ्वीच्या निर्मीतीपासुन आजपर्यंत जगाला आणि सजीव सृष्टीला जगविण्याचे काम करत आहे. पर्यारणाकडुन आपल्याला लागणार्या हवा, पाणी ,अन्न , वस्ञ , निवारा, विवीध साधनसंपत्ती आपल्याला मिळत असते.
 
पर्यावरणाची सध्यस्थिती – पण आताची पर्यावरणाची सध्यस्थिती बदलत चाललीय पुर्वीच्या काळी लोक जेवढे पर्यावरणाकडुन घेत असत त्याच्या कितीतर पटीने पर्यावरणाला देत असे. तसेच पर्यावरणाकडुन गोष्टी घेत असताना त्या तेवढ्याच प्रमाणात घेतल्या जात ज्यातुन माणसाचे जीवन सुखी होईल आणि पर्यावयणाचे संतुलन पण चांगल्या प्रकारे टिकुन राहिल. काही वर्षा पर्यंत हे ठीक ठाक चालले होते पण मध्यंतरीच्या काळात लोकसंख्येचा विस्फोट झाला.
 
भूमी प्रदूषण

 

त्यामुळे जास्त लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी लागणार्या गोष्टी पर्यावरणाकडुन कशाही आणि कोणत्याही प्रमाणात घेण्यात आल्या. पर्यावरण संतुलनाचा आणि भविष्याच विचारच केला गेला नाही. पर्यावरणाकडुन खुप मोठ्या प्रमाणात फक्त घेण्यात आले आणि त्याबदल्या सरंक्षण करणे किंवा संतलन राखणे खुपच कमी झाले. त्यामुळे पर्यावरणाचा नाश होत गेला पर्यावरण विकास होण्याएवजी अधोगतीला गेला आणि आता तो अशा परिस्थितीत आहे की लवकरात लवकर त्याच्याकडे लक्ष नाही दिले तर तो तर जाईलच सोबत पृथ्वी ला पण घेऊन जाईल.
 
पर्यावरण विकासाची गरज – पण म्हणतात ना राञीनंतर दिवस उगवतो तसा पर्यावरणाच्या नाशानंतर ही गोष्ट काही चांगल्या लोंकाच्या लक्षात आली त्यांना पर्यावरण विकासाची गरज लक्षात आली आणि त्यांनी पर्यावरण रक्षणाचे आंदोलन पुर्ण जगभर उभे कले. कारण त्यांना माहित होते की जर पर्यावरणाचा नाश थांबवुन त्याचा विकास नाही केला तर लवकरच सजीव सृष्टीचा नाश झाल्याशिवाय राहणाय नाही. कारण पर्यावरण जगेल तर सर्व जग जगेल.
 
environmental movements in india

 

म्हणुन आता शासकीय यंञना लोक जागे झालेत तसेच अलिकडच्या काळात सोशल मिडीयाद्वारे पण लोक पर्यावरणाच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य करत आहेत आणि तसेच आपआपल्या परिसरात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करत आहेत. तसेच शासकीय यंञनेने सुद्धा सर्व शाळेत पर्यावरण विषय शिकविणी सक्तीचे केले आहे.
 
पर्यावरण दिन – तसेच या सगळ्या चळवळीतुन पर्यावरण दिन अस्तित्वात आला दरवर्षी ५ जुन हा पर्यावरण दिन म्हणुन संपुर्ण जगभर साजरा केला जातो आणि त्या दिवशी संपुर्ण जग पर्यावरणाचे संरक्षण करण्याची वाचवण्याची आणि विकासाची शपथ घेते.
 
पर्यावरण दिनी मुली झाडे लावताना

 

या पर्यावरण दिनामुळे माणसाला एक दिवस का होईना पर्यावरणाची आठवण होते. माणसाने फार काय नाही पण पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने पर्यावरण दिनाला एकच झाड जरी लावले तरी पर्यावरणाची स्थिती पुर्वीप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही.
 
पर्यावरण विकासासाठी उपाय – पर्यावरण विकास करायचे ठरविले पण करायचे काय आता शासकीय यंञना त्यांचे काम करत आहेत पण आपण सुद्धा कामाला लागले पाहिजे कारण पर्यावरणाच्या नुकसानाला शासनच नाही तर आपण सुद्धा जबाबदार आहोत.
 
पर्यावरण दिनी मुली झाडे लावताना

 

म्हणुन जोमाने कामाला लाग आणि त्यासाठी करायचे एवढेच आहे दर वर्षी पर्यावरण दिनाला तुमच्या घरात जेवढी माणसे आहेत तेवढी झाडे तुमच्या आजुबाजुच्या परिसरात किंवा डोंगर रांगावर जाऊन लावायची. तसेच गडकिल्यावरपण झांडाच्या हिरव्या मशाली तयार करायच्या. जर ही गोष्ट प्रत्येक माणसाने दरवर्षी वर्षातुन एकदा जरी केली तरी पर्यावरणाचे रक्षण होईल आणि त्याचा नाश थांबुन विकास होईल.
 
 
हे पण वाचा – 
 

Leave a Comment