जमिनीचे क्षेत्रफळ कसे काढायचे | How To Calculate Land Area in Marathi

जमिनीचे क्षेत्रफळ कसे काढायचे | How To Calculate Land Area in Marathi

How To Calculate Land Area in Marathi: मित्रांनो आजचा लेख हा आपल्या शेतकरी मित्रांसाठी आहे शेतकरी मित्रांना किंवा कोणालाही ज्याला जमीन मोजायची आहे त्याला बऱ्याच वेळेस अडचण येते परंतु तुम्ही तुमची जमीन घरच्याघरी मोजू शकता. जमीन मोजण्याचे सोपे उपाय आम्ही इथे सांगितले आहेत जमिनीची मोजणी ही दोन पद्धतीने केली जाते.

How To Calculate Land Area in Marathi

 

 जमिनीचे क्षेत्रफळ कसे काढायचे | How To Calculate Land Area in Marathi

अ) चार बाजू असणारी जमीनीची मोजणी

जमिनीचा आकार कसाही असो, फक्त ती ला चार बाजू असने गरजेचे आहे.अशा जमिनीची मोजणी पद्धत इथे सांगितली आहे.आता आपण पहिला प्रकार पाहूयात

उदा.  समजा तुमच्या जमिनीची एक बाजू 300 फूट आहे व दुसरी बाजू 400 फूट आहे.

तिसरी बाजू 300 आणि चौथी बाजू 400 फूट आहे असे आपण गृहीत धरूया.

या जमिनीचे क्षेत्रफळ आपण एका सूत्राच्या माध्यमातून काढूया.

यासाठी तुम्ही तुमच्या शेताच्या बाजू मोजून घ्या आणि त्या एका कागदावर लिहून घ्या.

आपल्याला समोरासमोरील बाजूंच्या सरासरी काढायचे आहे.

300+400=700 याची सरासरी काढायची आहे म्हणून त्याला दोनने भागायचे 700÷2=350 = 350 फूट एवढी आपल्याला सरासरी मिळाली आहे.

ही झाली आपली रुंदी. आता आपल्याला लांबी काढायची आहे. त्यासाठी सुद्धा अशाच प्रकारे आपल्या लागतात बाजूंची सरासरी काढायची आहे.

संख्या समान असल्यामुळे त्याची सरासरी सुद्धा 250 फूट राहील.त्याचे क्षेत्रफळ काढण्याचे एक सूत्र आहे.

चौकोनाचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी तर, आपली लांबी आलेली आहे 350 आणि रुंदी सुद्धा 350 आलेली आहे.

350 × 350= 1,22,500 चौ.फूट एवढे उत्तर येते.

जर तुम्हाला तुमची जमीन किती गुंठे आहे हे पाहिचे असेल तर आलेल्या संख्येला आपण 1089 ने भागले तर आपल्याला गुंठ्यामध्ये उत्तर मिळते.

उदा. 1,22,500÷1089=112.48 एवढे उत्तर मिळते.

म्हणजेच आपली जमीन जी आहे ती गुंठ्यान मध्ये 112 गुंठे एवढी आहे.

तर ही अगदी सोपी पद्धत होती. किती गुंठे आहे मोजण्याची

आता आपण जमिनीचे क्षेत्रफळ काढूयात

उदा. जमिनीची लांबी 500 फुट व रुंदी 300 फुट आहे असे मानू

आता आपण क्षेत्रफळ काढूया त्यासाठी लांबी ×रुंदी = एकूण चौ.फुट क्षेत्रफळ हे सुत्र वापरु.म्हणजेच

500 × 300 = 1,50,000 चौरस फूट

आता या संख्येला एक गुंठा म्हणजेच 1089 चौ.फूट ने भाग देऊ.

150000 ÷ 1089 = 137.741

40 गुंठे = 1 एकर म्हणून

137.741 = 2.50 (अडीच) एकर 17 गुंठे 741 चौ.फूट हे क्षेत्रफळ आहे

ब) तीन बाजू असणारी जमीनीची मोजणी 

आता आपण जर तुमची जमीन त्रिकोणी असेल तर त्याचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते पाहू

त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया×उंची हे आपल्याला माहितच असेल मग तुमची जमीन त्रिकोणाकृती असेल,

तर पहिल्यांदा उंची मोजायची आणि नंतर त्याची पाया मोजायचा आणि

या सूत्रांमध्ये तुमच्या जमिनीच्या पायाची लांबी आणि उंची टाका किंवा फुटामध्ये असेल तर ते टाका.

उदा.जमिनीचा पाया हा 200 फूट आहे आणि त्याची उंची 500 फूट आहे.

तर दोघांचा गुणाकार करून त्याला दोन्ही 2 ने भागायचे म्हणजेच

उंची 500 × पाया 200 = 100000

100000÷2 = 50000 चौ.फूट

आता याचे जर आपल्या गुंठ्यामध्ये रूपांतर करायचे असेल तर याला पुन्हा 1089 ते भागयचं

50000÷1089= 45.91 गुंठे.

अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या जमिनीचे मोजणी स्वतःहा करू शकता.

हे पण वाचा –

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment