म्युच्युअल फंड मराठी | Mutual Funds Information in Marathi

आज आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड या विषयी माहिती देणार आहोत तुम्ही म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करता का? म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी म्युच्युअल फंडांविषयी जाणून घेणे फार महत्वाचे आहे. हे तुम्हाला गुंतवणूकीचे निर्णय घेण्यास महत्वाची मदत करू शकते. तुमचा डोक्यात अनेक प्रश्न असतील आपण त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करूया जाणून घेऊया म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? म्युच्युअल फंडांमध्ये तुम्ही कशी गुंतवणूक करू शकता.हे आपण पाहू.

म्युच्युअल फंड मराठी | Mutual Funds Information in Marathi

 

म्युच्युअल फंड मराठी | Mutual Funds Information in Marathi

म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय?

म्युच्युअल फंड ही एक अशी कंपनी आहे जी वेगवेगळ्या अनेक लोकांकडून पैसे गोळा करते, आणि गोळा केलेला पैसे ती स्टॉक, बॉण्ड्स आणि इतर आर्थिक विविध प्रकारचा मालमत्तां मध्ये गुंतवनुक करते . त्या कंपनीच्या या सर्व एकत्रित होल्डिंग्ज (स्टॉक, बॉण्ड्स आणि इतर मालमत्ता) यांना त्या कंपनीचा पोर्टफोलिओ म्हणतात. प्रत्येक म्युच्युअल फंड मालमत्ता व्यवस्थापकाद्वारे व्यवस्थापित केला जातो.म्युच्युअल फंडातून पैसे कमवण्याचा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे. यामध्ये गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे हजारो रुपये असतीलच असे काही नसते, तर तुम्ही केवळ 500 रुपये प्रति महिना गुंतवणूक करून या योजनेचा लाभ मिळवू शकता.

 

म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी?

जर तुम्हाला म्युच्युअल फंडा विषयी अधिक माहिती मिळवून तुम्ही स्वतः कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवर जाऊन थेट गुंतवणूक करू शकता. तुम्हाला हव्या असलेल्या, तुम्ही म्युच्युअल फंड सल्लागारांच्या सेवा देखील घेऊ शकता.

जर तुम्हाला म्युच्युअल फंडा विषयी अधिक माहिती मिळवून तुम्ही थेट गुंतवणूक केली तर तुम्ही म्युच्युअल फंड योजनेच्या थेट योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करत असाल तर तुम्ही म्युच्युअल फंड योजनेच्या नियमित योजनेत गुंतवणूक करा.

जर तुम्हाला थेट गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला त्या म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. किंवा आज मोबाईल वरती अनेक ॲप ही उपलब्द आहेत तेथून ही तुम्ही गुंतवणूक करू शकता किंवा तुम्ही तुमच्या कागदपत्रांसह म्युच्युअल फंड कार्यालयातही जाऊ शकता.

म्युच्युअल फंडांच्या थेट योजनेत गुंतवणूक करण्याचा फायदा असा की तुम्हाला कमिशन भरावे लागणार नाही. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीतील तुम्हाला  परतावा चांगला मिळतो.पण अशा प्रकारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना एक समस्या अशी आहे की तुम्हाला तुमचे स्वतःचे नॉलेज म्युच्युअल फंडा विषयी सतत वाढवणे गरजेचे आहेच परंतु सतत चांगल्या शेरचे संशोधन करणे ही गरजेचे असते.

 

देशात किती प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत?

१. इक्विटी म्युच्युअल फंड

या म्युच्युअल फंड योजने मध्ये गुंतवणूकदारांचे पैसे थेट शेअर्स मध्ये गुंतवतात. या योजना अल्पावधी काळा साठी जोखमीच्या असू शकतात, परंतु दीर्घकालीन काळा साठी त्या तुम्हाला तुमचा गुतंवणूकीतून उत्तम परतावा मिळविण्यात मदत करतात. अशा म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणुकीतून मिळणारा तुमचा परतावा स्टॉकच्या कामगिरीवर अवलंबून असतो.

२. कर्ज म्युच्युअल फंड

या म्युच्युअल फंड योजना कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. कमी काळासाठी आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी गुंतवणूकदार या योजने मध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजने मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करणे योग्य आहे. या म्युच्युअल फंड ही योजना स्टॉकच्या तुलनेने कमी जोखमीच्या असतात आणि बँकेच्या मुदत ठेवीं पेक्षा चांगला परतावा देउ शकतात.

३. हायब्रिड म्युच्युअल फंड

ही म्युच्युअल फंड योजना इक्विटी आणि डेट या दोन्ही मध्ये गुंतवणूक करतात. ही योजना निवडताना गुंतवणूकदारांनी त्यांनी त्यांची जोखिमा लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. हायब्रिड म्युच्युअल फंड योजना सहा विभागांमध्ये विभागल्या आहेत.

४. सोल्यूशन ओरिएंटेड म्युच्युअल फंड

सोल्यूशन्स वर लक्ष केंद्रित करून डिझाइन केलेला ही म्युच्युअल फंड योजना एक विशिष्ट ध्येय किंवा उपायानुसार बनविली आहे. ही निवृत्ती योजना किंवा मुलांच्या शिक्षणासाठी महत्वाची योजना असू शकतात. तुम्हाला या योजनांमध्ये किमान पाच वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल.

 

हे पण वाचा – 

 

Leave a Comment