नमस्कार विद्यार्थी मिञांनो आज आपण मी झाड झालो तर निबंध मराठी / If I Become a Tree Essay in Marathi हा निबंध पाहणार आहोत. आम्ही हा निबंध अंत्यत साध्या सरळ भाषेत दिला आहे हा निबंध पाचवी पासुन बारावी पर्यंत सगळ्यांना उपयोगी आहे. हा निंबध वाचुन तुम्ही यातुन कल्पना घेऊन तुमच्या मनाप्रमाणे निंबध लिहु शकता.
मी झाड झालो तर निबंध मराठी | If I Become a Tree Essay in Marathi
मी झाड झालो तर मी देवाकडे आणखी एक गोष्ट मागेण ती म्हणजे मला झाड करायचे असेल तर कर पण नुसते झाड नको करू बोलके झाड कर म्हणजेच ते झाड बोलु पण शकेल कारण समाजात गप बसणाराचे गहु पण खपत नाहीत आणि बोलणाराचे आंबाडे पण खपतात असे आहे. कारण समाजात जे लोक अन्यायाविरूद्ध लढतात अन्याय सहन करत नाहीत अशा लोंकाशी कोणीही भांडत नाही याऊलट जे लोक अन्याय सहन करतात शांत राहुण आपले काम करत असतात अशा लोंकाना अन्याय सहन करत राहवे लागते.
झाडाचे पण तसेच आहे झाड बोलु शकत नाही ते मानवासाठी किती काम करते जसे की ऑक्सीजन, सावली, फळे, फुले, खत, पाऊस इ देऊन पण त्याला त्याच्या बदल्यात काय मिळते तर कुऱ्हाड किंवा जेसीबी. हे कितपत बरोबर आहे म्हणुन मी देवाला म्हणेल मला जेव्हा झाड बनवशील तेव्हा मला बोलणारे झाड बनव नाहीतर हे लोक मला नक्कीच संपवतील.
जर मी बोलणारे झाड झालो तर लोंकाना झाडाचे महत्व समजावुन सांगेन कारण आताच्या लोंकाचे असे झालेय इतर लोंकानो सरकारने किती पण झाडाचे महत्व सांगितले तरी समजत नाही आणि त्यांच्या डोक्यात बसत नाही जसे म्हणतात ना “कान टोचवावे तर सोनारानेच” तसेच झाडानेच जर झाडाचे महत्व सांगितले तर लोंकाना समजेल अशी आशा बाळगुया.
तसेच झाडांच्या वाढीसाठी जास्त काही नाही लागत फक्त आणि फक्त थोडेसे पाणी आणि थोडेसे संद्रीय खत ते पण दिले तर दिले नाही दिले तरी चालते आणि झाड लहान आहे तो पर्यंत थोडीसी झाडाची काळजी घ्यावी लागते झाड एकदा थोडे मोठे झाले की ते स्वताच त्याची व्यवस्था करते कारण आज जर झाडे लावली तर त्याचा फायदा पुढच्या पिढीला कायमस्वरूपी होणार आहे.
जर झाड जगेल तर पाऊस येईल पाऊस येईल तर अजुन झाडे येतील अजुन झाडे आली की अजुन पाऊस येईल पण जेव्हा मी झाड होईल तेव्हा हे महत्व सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्याला सांगेन तसेच झाडांचे जवळचे मिञ शेतकरी हे सुद्धा थोड्याश्या पिकाचे नुकसान होतेय म्हणुन झाड तोडुन टाकतात तेव्हा मला खुप वाईट वाटते.
आज थोड्याशा पिकाचा विचार करून जर तुम्ही झाडे तोडलीत तर उद्या पाऊस कुठून थेईल आणि पाऊसच नाही आला तर सर्वच पिकाचे नुकसान होईल आणि आज तुम्ही थोड्याशा पिकाचा विचार करताय पण उधा पिकच नाही राहिले तर पाऊसच नाही पडला तर सगळे पिकच संपुन जाईल म्हणुन आजच्या थोड्याशा पिकाचा विचार सोडा आणि उद्याच्या भरपुर पिकाचा विचार करा आणि जास्तीत जास्त झाडांची लागवड करा.
त्याचप्रमाणे मी झाड झालो तर सगळ्या माझ्या शेतकरी मिञांना शेंद्रीय शेतीचे महत्व सांगेन कारण आज कोणत्याही शेतकर्याला विचारायला गेले की शेंद्रीय शेती तुम्ही का नाही करत तर तो म्हणतो शेंद्रीय शेती होऊच शकत नाही अरे बाहेरच्या देशातले जाऊदे आपल्या महाराष्ट्रात कितीतरी लोक सेंद्रीय शेती करत आहेत अरे आधी प्रयत्न तरी करा लढायच्या आधीच कुठे हार मानता.
तसेच मी झाड झाल्यावर माझ्या तरून मिञ मैञिनींना हे सांगेन मिंञानो उन्हाळ्यात तुम्ही माझ्या सावलीला बसता तसेच उन्हाळ्यात गाडी लावण्यासाठी तुम्हाला माझी गरज लागते उन्हाळ्यात तुम्ही मला खुप शोधता आणि पावसाळा आला की गायब.
तरी बरे निसर्गाने झाडांचे महत्व कळावे म्हणुन पावसाळ्याच्या आधी उन्हाळा ठेवला आहे. जेणे करून उन्हाळ्यात तुम्हाला झाडांचे महत्व समजावे आणि पावसाळ्यात झाडे लावावी पण माणुस माञ पावसाळा आला की सगळेच विसरून जातो.
मी झाड असताना माझे महत्व पावसाळ्यात ओरडुन ओरडुन सांगेणच पण उन्हाळ्यात पण माझ्या जवळ जो येईल त्याला पण मी झाडाचे महत्व सांगेन कारण म्हणतात ना वाईट वेळी सांगितले की लगेच लक्षात राहते म्हणतात.
या झाडाचे आज तुम्हाला सगळ्यांना एकच सांगणे आहे आज तुम्ही सर्वजण मिळुन आम्हाला वाचवा आमची संख्या वाढवायला मदत करा. उद्या आम्ही सर्वजण मिळुन तुम्हाला मदत करू आणि करत राहु व तुमचे जीवन सुधारण्यासाठी मदत करत राहु. नाहीतर आज तुम्हा आम्हाला नाही वाचवले आज आम्ही संपलो तर उद्या तुम्ही पण संपल्याशिवाय राहणार नाही.