इडली रेसिपी मराठी | Idli Recipe in Marathi

इडली रेसिपी मराठी | Idli Recipe in Marathi

Idli Recipe in Marathi: इथे आम्ही इडली रेसिपी मराठी दिली आहे. इथे आम्ही सर्वाना येईल अशी सोपी रेसिपी दिली आहे.या रेसिपी साठी वेगळे असे काही लागत नाही घरतील पदार्थ वापरून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता.दिलेल्या स्टेप नुसार बनवा म्हणजे तुमची इडली तयार होईल.

लागणारे साहित्य:

  • 2 कप तांदूळ
  • १ कप उडीद डाळ
  • १ चमचा मेथी बियाणे
  • १ कप पोहे
  • १ चमचा मीठ

इडली बनवण्याची प्रक्रिया | rice idli recipe in marathi

१. एका भांड्यात तांदूळ घ्या आणि ते पाण्याने चांगले धुवा आणि पाणी घालून 4 तास भिजवा.

२. उडीद डाळ घेऊन मेथी बिया घाला आणि चांगले मिक्स करा आणि त्यांना पाण्याने चांगले धुवा आणि हे पण पाणी घालून 4 तास भिजवा.

३. पोहे घ्या आणि पाण्याने धुवा सुमारे ५ मिनिटे भिजवा.

४. ४ तास झाल्यावर डाळ एका मिक्सरचा भांड्यात घ्या आणि त्यात पाणी घाला बारीक पेस्ट करून घ्या

५. मिक्सरच्या भांड्यात तांदूळ आणि पोहे घ्या आणि हे पण थोडे पाणी घालून बारीक करून घ्या

६. आधी केलेल्या डाळीचा पेस्ट मध्ये ही तयार झालेली पेस्ट मिसळा आणि चांगले एकत्र करून घ्या

७. एक झटकून घ्या आणि सुमारे ४-५ मिनिटे चांगले मिसळा.

८. हे मिश्रण १०-१२ तास झाकून ठेवा आणि आंबवा.

९. १०-१२ तासानंतर मीठ घालून मिक्स करावे.

१०. इडली स्टँड घ्या आणि इडली साचात तेल चांगले लाऊन घ्या आणि तयार केलेले मिश्रण त्यात घाला

१२. इडली कुकरमध्ये तळाशी थोडे पाणी घाला आणि त्यात इडली साचा ठेऊन दया

१३. गॅस चालू करून मध्यम आचेवर २० मिनिटे वाफवुन काढा.

१४. कुकरच्या बाहेर इडली भांडे कडून घ्या आणि ५ मिनिटानंतर इडली कडून घ्या

१५. गरमागरम सांबार आणि खोबर्‍याची चटणी बरोबर सर्व्ह करा.

हे पण वाचा –

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment