जीवनात Attitude चे महत्व । 5 Attitude Tips in Marathi

मित्रांनो, आपल्या ॲटिट्यूड ही आपल्यातली एक अशी गोष्ट असते जी आपल्याला इतरांपासून वेगळं बनवते. आता बघा ना सिहं हा जंगलातला सगळ्यात उंच प्राणी नाही आहे आणि नाही हा सगळ्यात मोठा प्राणी आहे तरीही तो जंगलाचा राजा(king of the jungle) असे म्हटला जातो. का माहिती आहे का? तर ते फक्त त्याच्या ॲटिट्यूडमुळे. पक्ष्यांचा राजा गरूडाला मानला जातो, का? तर त्याच्या ॲटिट्यूडमुळेच. मित्रांनो ॲटिट्यूड आयुष्यात खूप जास्त मॅटर करतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपला ॲटिट्यूड खूप महत्वाचा असतो आणि जर आपण आपल्या ॲटिट्यूडला अट्रॅक्टिव्ह बनवला तर? तर आपण कुणालाही आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतो तेही खूप सोप्या प्रकारे.

आज मी तुम्हाला तुमचे Attitude चांगले बनवण्यासाठी ५ अशा गोष्टी सांगणार सांगणार आहे ज्यांचा अवलंबन करून तुम्ही तुमचीक सुंदर व्यक्तिमत्व घडवू शकता. आता ता 5 टिप्स पैकी काही तुमच्यात असतीलही. पण ज्या काही नसतील त्या जर तुम्ही स्वतः डेव्हलप केल्या तर तुम्ही तुमच्या ॲटिट्यूडने लोकांना तुमच्याप्रती अट्रॅक्ट करू शकता. त्यामुळे मग जर तुम्हाला सर्वांचा favorite person बनायचं असेल ना तर हा लेख शेवट्पर्यंत वाचा.

1. कॉन्फिडन्ट राहा

बघा या जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक असें जें कुणाशीही खूप confidently बोलून घेतात. त्यांच्या समोर कोणीही आले तरी त्यांना अनकम्फर्टेबल फिल होत नाही. ते समोरच्याशी अगदी बिनधास्तपणे बोलतात. मग टॉपिक कुठलाही असू द्या आणि दुसरे असे लोक असतात ज्यांना कोणाही समोर बोलायला अनकम्फर्टेबल फील होते. ज्यांना कोणाच्याही समोर लगेच बोलता येत नाही. हे सगळं का होतं? कारण त्यांच्यात कॉन्फिडेंसची कमी असते. बरेच जण बऱ्याच जणांसमोर बोलायला घाबरतात. खास करून एखादी अनोळखी व्यक्ती असली किव्हा बर्याचदा आपण अशा ठिकाणी जातो जिथे आपल्याला नवीन नवीन व्यक्ती भेटतात आणि त्यांच्यासमोर बऱ्याचदा आपल्याला काही बोलता येत नाही. आपल्याला त्यांच्यात मिक्स होता येत नाही आणि अशा वेळी आपल्यासाठी गरजेचा असतो “कॉन्फिडन्स”.

मग तुम्हाला काय करायचे आहे? जेव्हाही तुम्ही कुठे जाल तेव्हा कॉन्फिडन्ट राहा. मग भलेही तुम्ही बोलू काही नका पण समोरच्याला असे दाखवू नका की तुम्ही त्याच्याशी बोलायला घाबरतात किंवा तुम्हाला अनकम्फर्टेबल फिल होत आहे. त्या ठीकान समोरच्याला असे दाखवूच नका. अगदी कॉन्फिडन्ट राहा. समोरच्या असे दाखवा की तुम्ही कॉन्फिडंट आहात, तुम्ही घाबरत नाही आहात. मग भलेही मनामध्ये तुम्हाला कितीही भीती वाटत असली तरी समोरच्याला दाखवू करू नका. समोरच्याला असंच दाखवा की तुम्ही कॉन्फिडंट आहे कारण एक कॉन्फिडन्स पर्सन प्रत्येकाला आवडतो. एक कॉन्फिडन्स पर्सनकडे प्रत्येकजण attract होतो

2. एखाद्या स्पेसिफिक व्यक्ती समोर तुम्ही जसे आहात तसेच राहा

बघा कोणताच व्यक्ती परफेक्ट नसतो आणि बऱ्याचदा आपण समोरच्याला attract करण्यासाठी, त्याला इम्प्रेस करण्यासाठी, आपण त्याला कमी लेखात नाही. आपण त्याला फक्त आपली पॉजिटिव साइड शो करत असतो. आपले चांगले गुण त्याला दाखवत असतो आणि ही गोष्टही खरी की ज्यावेळी आपण समोरच्याला फक्त आपले चांगले गुण शो करतो त्यावेळी तो आपल्याला attract होतोच पण जास्त वेळासाठी नाही. मित्रांनो बघा, आजकालच्या जगात प्रत्येक जण सोशल मीडियावर स्वत ला परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकजण स्वतः बद्दल बढाई मारत असतो, तो indirectly लोकांना सांगत असतो कि बघा मी किती पर्फेक्ट आहे.

पण या सगळ्यामध्ये जर आपल्याला असं कुणीतरी भेटले की जो स्वतः त्याच्या insecurities बद्दल सांगतो, जो स्वतःमध्ये असेलेल्या कमींबद्दल सुद्धा बोलतो तर असा व्यक्ती कुठे तरी आपल्याला आवडतो. अशा व्यक्तीकडे आपण जास्त attract होतो जो त्याच्या पॉजिटिव साइटबरोबरच त्याच्या निगेटिव्ह साइडबद्दलही बोलतोय. तो त्याच्या चांगल्या गोष्टी सांगतोय तर त्याच्या वाईट गोष्टी देखील सांगत आहे. अशा व्यक्तीमुळे आपल्याला असं वाटतं की हा पण आपल्यासारखाच आहे, कारण कमी हि प्रत्येकामध्ये असते. जर अशा एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला इम्प्रेस करायचं आहे, आपल्याकडे अट्रॅक्ट करायचे आहे, त्याला आपण आपला नेगेटिव्ह गोष्टी देखील सांगितल्या पाहिजेत जेणे करून समोरच्याला तुम्ही किती genuine आहेत हे समजायला मदत होईल.

3. नको तिथे बोलू नका

मित्रांनो नको ते बोलू नका, जास्त बोलू नका, म्हणजे गरजेपुरतेच बोला जितकी गरज आहे तितकीच बोला, जिथे बोलायला हवं तिथेच बोला. तुम्हाला सांगतो माझी एक फ्रेंड. ती सतत बोलत असते. तिला खूप जास्त बोलण्याची सवय आहे तिच्या समोर कुणीही असूद्या ती बोलत असते ती काही ना काही बोलत असते आणि यामुळे काय झाला माहित आहे का? यामुळे बरेचजण तिला कंटाळून होऊन गेले प्रत्येकाला माहिती झाले की हि नको तिथे नको ते सतत बोलत असते म्हणून तिच्याकडे बरेच जण दुर्लक्ष करतात आणि कधी कधी मीसुद्धा आणि यामुळे काय होते ती स्वतःची value कमी करून घेतात आणि ती ज्या वेळी काहीतरी चांगले बोलते त्यावेळी सुद्धा तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही त्यावेळी सुद्धा सगळे जण तिच्या मुद्दा महत्वाचा असून सुद्धा दुर्लक्ष करतात. कारण ती सतत बोलत असते आणि तिच्या विरुद्ध माझी एक दुसरी फ्रेंड जास्त बोलत नाही, जिथे गरज असते तिथेच बोलते, नको ते बोलत नाही पण ती जेव्हा कधी बोलते ना तेव्हा सगळे जण तीच बोलणं लक्ष देऊन ऐकतात. कारण की गरजे पुरतेच बोलते आहे.

याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप कमी बोला. तुम्ही फ्रेंड्स मध्ये असाल तेव्हा खूप सारे बोलू शकता पण बऱ्याचदा सिचुएशन अशा असतात जिथे आपल्या शांत राहणे गरजेचे असते तिथे आपण बोललो तरी काही फायदा होत नसतो किंवा जिथे आपले बोलणे मनावर घेतले जाणार नसतील अशा ठिकाणी बोलून आपण आपली स्वतः ची वॅल्यु कमी करून घेतो आणि जर आपण नको तिथे नको ते सतत बडबड करत असलो ना तर आपण लोकांना अजिबात आवडत नाही आणि आपण जास्त बोलून कधीही कुणाला आपल्याकडे अट्रॅक्ट नाही करू शकत. तुम्हाला सांगतो जर तुम्हाला खरोखर एखाद्या व्यक्तीला attarct करायचं आहे ना तर तुमच्या बोलण्यापेक्षा तिचे ऐकून घ्या. सतत तुमच्या गोष्टी सांगण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला तिच्या गोष्टी विचारा, तिच्या गोष्टी ऐकून घ्या आणि जर तुम्ही त्या व्यक्तीचे ऐकायला शिकलात ना, जर तुम्ही समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्यायला लागलात ना तर त्या व्यक्तीला तुमच्या प्रती अट्रॅक्ट होण्यापासून ती स्वतःसुद्धा रोखू शकत नाही.

4. शो ऑफ करू नका

बऱ्याच जणांना सवय असते शो ऑफ करण्याची. ते सतत स्वतःबद्दल नेहमी काहीतरी वाढवून चढवून सांगत असतात. मी असा मी तसा, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, मी असा केले होते. असे लोक आजच्या काळात कोणालाही आवडत नाही आणि अशा लोकां प्रती आपण अट्रॅक्ट होत नाही. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण जर मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल सगळं काही समोरच्याला सांगून टाकले तर समोरच आपल्याकडे अट्रॅक्ट होईल, पण असं काही नसतं. तुम्ही स्वतःबद्दल कितीही खर सांगत असाल पण ते जर खूप मोठमोठय़ा सांगत असाल ना तर समोरच्याला असं वाटतं की अरे हा काय शो करतो! हा का इतकी बढाई मारतो! यांना अशी सवय आहे! आणि तो दुसऱ्यांच्या जवळ जाऊन तुमच्याबद्दल हेच सांगेल की तो सतत शो ऑफ करत असतो.

बघा तुमच्या कडे असेल तुमच्याकडे खरोखर भरपूर गोष्टी असतील पण त्या समोरच्याला बोलून सांगू नका. त्या समोरच्याला आपोआप समजल्या पाहिजेत आणि जर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या सतत संपर्कात येत असाल तर त्या व्यक्तीला आपोआप कळेल की तुमच्याकडे काय आहे. तुम्ही काय आहात. तुम्ही कोण आहात. हे त्यांना आपोआप समजेल आणि ज्या व्यक्तीला तुम्ही न सांगता समजेल ना त्या वेळी तिच्या मनात तुमच्या प्रति जास्त रिस्पेक्ट वाढेल व तुमच्या प्रती जास्त अट्रॅक्ट होऊन जाईल. त्या व्यक्तीला असं वाटेल की हा तर कधीच त्याच्याबद्दल इतकं सांगत नाही. तिला असं वाटेल की त्याच्याकडे इतकं असूनहीमी असा असूनही स्वतःबद्दल कधी शो ऑफ करत नाही आणि ती व्यक्ती नक्कीच तुमच्या प्रत्येक ट्रॅक्टर

5. स्वतःची किंमत करा.

बघा जेव्हा आपण स्वतः ची वॅल्यु करू तेव्हा इतर लोक आपली वॅल्यू करतील. जर आपण स्वतःच्या कामाची किंमत केली नाही, स्वतःच्या वेळेची किंमत केली नाही तर इतरही आपल्या वेळेला महत्वाचे समजणार नाही. तुम्ही कितीही टिप्सचा वापर करा पण जर तुम्ही स्वतःची वॅल्यु करत नसाल ना तर कधीही कुणी तुमची वॅल्यू करणार नाही. कधी कुणी तुमच्या प्रती अट्रॅक्ट होणार नाही. तुम्ही जर प्रत्येकासाठी available असाल ना तर कुणालाही तुमची किंमत राहणार नाही आणि कुणीही तुमच्या प्रती अट्रॅक्ट सुद्धा होणार नाही आणि त्या व्यक्तीला सुद्धा असेल शो करा तुम्हाला अट्रॅक्ट करायचं तुम्हाला तुमच्या कामाची वॅल्यू आहे तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा तुमचं काम आहे असं त्या व्यक्तीला शो करा. आणि फक्त शो करू नका खरोखर तुमच्या कामाची किंमत करा?

सगळ्यात जास्त महत्त्व तुमच्या वेळेला द्या. तुमच्या स्वतःला द्या, स्वतःवर काम करा स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःच्या ध्येयाकडे कॉन्सन्ट्रेट करा. बघा एकदा विचार करा की आपल्याला कसे लोक आवडतात, आपण कशा व्यक्ती प्रती अट्रॅक्ट होतो, आपल्यालाही अशीच व्यक्ती आवडतीचं काम करत असे ती तिच्या कामावर फोकस करत असेल. आपल्याला कधीही अशी रिकामी व्यक्ती आवडत नाही, आपल्याला स्वतः सुद्धा अशी एखादी व्यक्ती आवडत नाही जी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकासाठी available असेल. नाही आवडत. आणि आपण स्वतः सुद्धा तीची वॅल्यु करत नाही आणि जर आपण स्वतःच तसे असू तर इतर कुणी आपल्यावर कसे attract होईल.

Final words 

म्हणून जर तुम्हाला कोणाला तुमच्याप्रती अट्रॅक्ट करायचं असेल ना तर या ५ गोष्टी लक्षात ठेवा. कॉन्फिडन्ट राहा, तुम्ही जसे आहात तसेच इतरांसमोर शो व्हा, शो ऑफ करू नका, जास्त बोलू नका नको, तिथे बोलू नका आणि स्वतःची किंमत करा.

तर मला अशा आहे 5 Attitude Tips in Marathi या लेख वाचून तुम्हाला आता जीवनात Attitude चे महत्व समजले असेल. तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

8 Tips to Earn Respect in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment