म्युच्युअल फंड मराठी | Mutual Funds Information in Marathi 2024

म्युच्युअल फंड मराठी | Mutual Funds Information in Marathi

आज आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड या विषयी माहिती देणार आहे तुम्हाला सुद्धा म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करायची आहे का? तर कक्षात ठेवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी म्युच्युअल फंडांविषयी सर्व जाणून घेणे फार महत्वाचे आहे. हे तुम्हाला गुंतवणूकीचे निर्णय घेण्यात महत्वाची मदत करू शकते. तुमच्या डोक्यात अनेक प्रश्न असतील आपण त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करूया आणि जाणून घेऊया म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? म्युच्युअल फंडांमध्ये तुम्ही कशी गुंतवणूक करू शकता. मुत्यूअल फंडासंबंधी सर्व माहिती साठी हा लेख शेवटपर्यंत वाचा

म्युच्युअल फंड ही एक अशी कंपनी आहे जी वेगवेगळ्या अनेक लोकांकडून पैसे गोळा करते, आणि गोळा केलेला पैसे ती स्टॉक, बॉण्ड्स आणि इतर आर्थिक विविध प्रकारचा मालमत्तां मध्ये गुंतवनुक करते . त्या कंपनीच्या या सर्व एकत्रित होल्डिंग्ज (स्टॉक, बॉण्ड्स आणि इतर मालमत्ता) यांना त्या कंपनीचा पोर्टफोलिओ म्हणतात. प्रत्येक म्युच्युअल फंड मालमत्ता व्यवस्थापकाद्वारे व्यवस्थापित केला जातो. म्युच्युअल फंडातून पैसे कमवने हा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे. यामध्ये गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे हजारो रुपये असतीलच असे काही नसते, तर तुम्ही केवळ 500 रुपये प्रति महिना गुंतवणूक करून या योजनेचा लाभ मिळवू शकता.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी?

जर तुम्हाला म्युच्युअल फंडा विषयी अधिक माहिती मिळवून तुम्ही स्वतः कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवर जाऊन थेट गुंतवणूक करू शकता. तुम्हाला हव्या असलेल्या, तुम्ही म्युच्युअल फंड सल्लागारांच्या सेवा देखील घेऊ शकता.

जर तुम्हाला म्युच्युअल फंडा विषयी अधिक माहिती मिळवून तुम्ही थेट गुंतवणूक केली तर तुम्ही म्युच्युअल फंड योजनेच्या थेट योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करत असाल तर तुम्ही म्युच्युअल फंड योजनेच्या नियमित योजनेत गुंतवणूक करा.

जर तुम्हाला थेट गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला त्या म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. किंवा आज मोबाईल वरती अनेक ॲप ही उपलब्द आहेत तेथून ही तुम्ही गुंतवणूक करू शकता किंवा तुम्ही तुमच्या कागदपत्रांसह म्युच्युअल फंड कार्यालयातही जाऊ शकता.

म्युच्युअल फंडांच्या थेट योजनेत गुंतवणूक करण्याचा फायदा असा की तुम्हाला कमिशन भरावे लागणार नाही. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीतील तुम्हाला  परतावा चांगला मिळतो.पण अशा प्रकारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना एक समस्या अशी आहे की तुम्हाला तुमचे स्वतःचे नॉलेज म्युच्युअल फंडा विषयी सतत वाढवणे गरजेचे आहेच परंतु सतत चांगल्या शेरचे संशोधन करणे ही गरजेचे असते.

उदाहरणार्थ:

समजा ५० पेन्सिलचे एक पॅकेट आहे, ज्याची किंमत 1000 रुपये आहे. पण यांची अट अशी आहे कि संपूर्ण पॅकेटच तुम्हाला घ्यावे लागेल. आता समजा कि एखाद्या व्यक्ती कडे एवढे पैसे नाहीत कि तो पूर्ण पॅकेट घेऊ शकतो किव्हा एखाद्याला नसेल सुद्धा घ्यायचे पूर्ण पॅकेट तर तो अशा परिस्थितीत, 5 लोक एकत्रितपणे 200-200 रुपये जमा करून ते ५० पेन्सिलचे पॅकेट घेऊ शकतात.

यामुळे काय होईल कि प्रत्येकाकडे १०-१० पेन्सिल वाटल्या जातील. आणि एक Mutual Fund म्हणजे संपूर्ण पॅकेट. आणि या Mutual Fund ला सांभाळायला एक तज्ञ मॅनेजर असतो जो तुमचा नफा कसा होईल त्याकडे लक्ष ठेऊन असतो. आता तुमच्याकडे ५० पेन्सिल पैकी १० पेन्सिल असतील त्या एका वेळेनंतर विकून तुम्ही नफा कमवू शकता.

फंड मॅनेजर

प्रत्येक योजनेत पैशाची गुंतवणूक करण्याची जबाबदारी हि मुख्यतः फंड मॅनेजर ला दिली जाते. या मध्ये एकच व्यक्ती बर्‍याच योजनांचा फंड व्यवस्थापक देखील असू शकते. एका म्युच्युअल फंड कंपनी किंवा मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडे बरेच फंड मॅनेजर असतात. याव्यतिरिक्त, गुंतवणूकीच्या रणनीतीवर काम करण्यासाठी कंपनीकडे स्वतःची research team म्हणजे संशोधन टीम देखील असते.

भारतात किती प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत?

१. इक्विटी म्युच्युअल फंड

या म्युच्युअल फंड योजने मध्ये गुंतवणूकदारांचे पैसे थेट शेअर्स मध्ये गुंतवतात. या योजना अल्पावधी काळा साठी जोखमीच्या असू शकतात, परंतु दीर्घकालीन काळा साठी त्या तुम्हालातुमच्या गुतंवणूकीतून उत्तम परतावा मिळविण्यात मदत करतात. अशा म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणुकीतून मिळणारा returns हे स्टॉकच्या कामगिरीवर अवलंबून असतो.

२. Debt म्युच्युअल फंड

या म्युच्युअल फंड योजना कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. कमी काळासाठी आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी गुंतवणूकदार या योजने मध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजने मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करणे योग्य आहे. या म्युच्युअल फंड ही योजना स्टॉकच्या तुलनेने कमी जोखमीच्या असतात आणि बँकेच्या मुदत ठेवीं पेक्षा चांगला परतावा देउ शकतात.

३. हायब्रिड म्युच्युअल फंड

ही म्युच्युअल फंड योजना इक्विटी आणि Debt या दोन्ही मध्ये गुंतवणूक करतात. ही योजना निवडताना गुंतवणूकदारांनी त्यांनी त्यांची जोखिमा लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. हायब्रिड म्युच्युअल फंड योजना सहा विभागांमध्ये विभागल्या आहेत.

४. सोल्यूशन ओरिएंटेड म्युच्युअल फंड

सोल्यूशन्स वर लक्ष केंद्रित करून डिझाइन केलेला ही म्युच्युअल फंड योजना एक विशिष्ट ध्येय किंवा उपायानुसार बनविली आहे. ही निवृत्ती योजना किंवा मुलांच्या शिक्षणासाठी महत्वाची योजना असू शकतात. तुम्हाला या योजनांमध्ये किमान पाच वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल.

FAQ

Q. दीर्घकालीन म्युच्युअल फंड गुंतवणूक अधिक फायदेशीर आहे का?

उत्तर: होय, बहुतेक आर्थिक तज्ञ दीर्घकालीन गुंतवणुकीची निवड करण्याचा सल्ला देतात, विशेषतः जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड योजना निवडत असाल तर. याचे कारण असे की शेअर्सच्या किमती अल्पावधीतच नाटकीय रित्या वर-खाली होत असतात परंतु जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे ५ वर्षापेक्षा अधिक काळासाठी गुंतवणुक केलीत तर तुम्हाला अधिक नफा होईल.

Q. सर्वच च म्युच्युअल फंडमध्ये जास्त जोखीम असते का?

उत्तर: म्युच्युअल फंडच्या प्रकारानुसार जोखीम बदलते. सामान्यतः, इक्विटी-देणारे फंड हे dept केंद्रित फंडांपेक्षा अधिक धोकादायक असतात.

Q. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे काय फायदे आहेत?

म्युच्युअल फंडांच्या काही महत्त्वाच्या फायद्यांमध्ये पोर्टफोलिओ विविधता, स्टॉक मार्केटच्या तुलनेत जोखीम कमी होते, एसआयपीद्वारे कमीत कमी मासिक गुंतवणूक करण्याचा मोकळा होतो, तसेच ELSS( Equity linked saving scheme) मधील गुंतवणुकीत कर सवलतींचाही समावेश होतो.

Q. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे तोटे काय आहेत?

म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या काही तोट्यांमध्ये फंड व्यवस्थापनाचा उच्च खर्च, परताव्यात होणारा चढ उत्तर, कडक लॉक-इन कालावधी, एक्झिट लोड, विविधीकरण आणि सौम्यता यांचा समावेश होतो.

Q. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी आपल्याला किती पैशांची आवश्यकता असते?

उत्तरः आपण गुंतवलेल्या निधीनुसार किमान गुंतवणूकीची रक्कम बदलू शकते. तथापि, आपल्याकडे किमान कमीत कमी 500 रुपये तरी गुंतवणूक करण्यासाठी पाहिजेत.

Q. मी म्युच्युअल फंडात पैसे गमावू शकतो का?

म्युच्युअल फंडाची गुंतवणूक मार्केट वर अवलंबून असते. त्यामुळे, जर तुम्ही मार्केट चांगल्या प्रकारे समजून घेतले आणि धोरणात्मक आणि अभ्यास करून गुंतवणूक केली तर तुम्ही रिस्क कमी करू शकता. असे म्हटले जात आहे की, म्युच्युअल फंडांची वास्तविक क्षमता लक्षात घेण्यासाठी दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली पाहिजे.

Conclusion

तर मित्रांनो मला अशा Mutual Funds Information in Marathi च्या लेखात दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल. तुम्ही नुगताच स्टॉक मार्केट मध्ये पाऊल ठेवले असेल तर तुम्ही सुरवात mutual fund ने करा. कारण mutual fund मध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला १०-१५% या दराने परत भेटण्याची भरपुर शक्यता असते.

तुम्हाला हा लेख वाचून सुद्धा काही शंका वाटत असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्या शंकांचे लवकरात लवकर निराकरण करू.

हे पण वाचा – 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment