इथे आम्ही मराठी विनोदी म्हणी दिल्या आहेत. आम्ही जास्तीत जास्त चांगला मराठी म्हणी संग्रह देण्याच्या प्रयत्न केला आहे. या मराठी म्हणी / Marathi Mhani तुम्हला कश्या वाटल्या आम्हला नक्की कळवा.
Proverbs in Marathi / Marathi Mhani Funny
रंग झाला फिका आणी कुणी दिना मुका
पैसा ना आडका अन बाजार भडका
एका माळचं मणी आणि ववायला नाही कुणी
झोपुन हागणार उठून बघणार
खायाला आधी झोपायला मधी आणि कामाला कधी मधी
नाजुक नार खायी चाबकाचा मार
नशीब आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला
दात नाय मुखात आणि विडी घाली खिशात
माझा ओटा बरा आणि माझा गोठा बरा
बुडाला जळतय आणि डोंगर विझवाय पळतय
दमडीचा सौदा आन येरझर्या चौदा
एक एक बात अन नऊ नऊ हात
देनं न घेणं अन फुकटंच येणं
कुञ्याचं जिणं आणि फजितीला काय उणं
एका देवळातले तेल चोरून दुसर्या देवळात दिवा लावणे
पोकळ माया आणि उपाशी निज ग बया
आपली गाय आणि लोकाचा वेल खाय
नाका पतुर पदर आणि येशी पतर नजर
देनं कुसळाच अन करणं मुसळाच
पाद्रयाला पावट्याच निमीत
न नांदनारी ला बारा बुद्या कपाळ फोडुन बांधल्या चिंध्या
पळणाराची एक वाट आणि शोधणाराच्या बारा वाटा
जित्यापणी नाही गोडवा आणि मेल्यावर आडवा
चव ना धव अन पोटभर जेव
त्याल जळतय राजाचं आन् बुड जळतय मशालीचं
कामा ना धामाचा आणि भाकरी खाय नेमाचा
चेहरा भोळा भानगडी सोळा
अंगात नाय बळ अन चिमटा काढुन पळ
कधी भी उठायच आणि खाजवत सुटायच
आलं म्हणुन हळकुंड खिसणारे
येळ ना वकत अन गाढव चालयय भुकत
येवु नक तर कोणच्या गाडीत बसु
शुभ बोल नार्या तर मांडवाला आग लागली
वाटेला फाटा अन गावाला फुकटचा हेलपाटा
शेंबुड आपल्या नाकाला अन् नावं ठेवतय लोकाला
कोरडी मया आणि उपाशी नीज ग बया
कुणाला कशाच आन बोडकीला केसाच
तोंडात ग्वाड आन मणात फाॅड
माकाड गेले लुटी आणि आणल्या दोन मुठी
खिशात नाई पावला अन मका द्यायला धावला
शेंबुड जायना नाकाचा आन शब्द माञ टोकाचा
जिकडं गुलाल तिकडं उदोउदो
नुसत्याच मोठ्या मोठ्या बाता आणि येळला घाली लाथा
चव ना धव आणि आघोरा मासा पोटभर जेव
येळ ना वखत अन् गाढव चाललय भुकत
कुञ्यांचा शिमगा आणि गावभर दंगा
जिथं वग नाय तिथं डोळं वासुन बघ
रांधता येईना ओली लाकडं
आपण दोघं भाऊ आन गठुड्याला नको हात लावु
बांधला मणी अन झालां धनी
आपलं नाही धड आन शेजार्याची कड
हाती नाय आडका आन बाजारात भडका
ज्याची बायको मुकी तोच सर्वात सुखी
उडत्या पाखराची पिसे मोजने
चोराला डसला ईचु अन तो करेणा हु का चु
काम करायचं कुसळा येवढं नावाल, अन येडं बनवतय गावाला
नाक कांपल तरी भोकयं
देणं न घेणं अन मुसळ घेऊन येणं
कुणी नाही कुणाचे वरण भात लोणचे
कुणाला कशाचं तर बोडकीला केसाचं
चावडीवर हाणायचं आणि कुणाला सांगु नको म्हणायच
कशाचं काय अन फाटक्यात पाय
लेक आली वाळुन अन अंघुळ घाली चोळुन
येडं पेरलं अन् ऊगवलं खुळ
नवरा जातोय नवरीसाठी आणि वर्हाड जातय जेवणासाठी
खाण तसी खापरं आन बाप तशी लेकरं
नागड्यानं ऊघड्याला कपडे काढुन देणे
लाज नाही लाज्याला त्याल लाव फाजाला
येडं उठलं अन चिपट्यात मुतलं
काम ना धंदा हार हार गोविंदा
सरलं सालं ओसरलं गालं
कधीही उठायचं आणि चोथ्यात मुतायंच
हे पण वाचा –